वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. ९-११
  • बेकारीपासून मुक्‍तता कशी व केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बेकारीपासून मुक्‍तता कशी व केव्हा?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नोकरीच्या शोधात
  • भावनात्मक आधाराचे महत्त्व
  • बेकारीच्या धास्तीतून मुक्‍तता
  • बेकारीची पीडा
    सावध राहा!—१९९६
  • बेकारी का?
    सावध राहा!—१९९६
  • मला नोकरी कशी मिळवता (आणि टिकवता!) येईल?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • कामाविषयी संतुलित दृष्टिकोन कसा निर्माण करावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. ९-११

बेकारीपासून मुक्‍तता कशी व केव्हा?

आपल्या निर्माणकर्त्याप्रमाणे, मानव स्वतःच्या कामात आनंद अनुभवू शकतो, ज्याची व्याख्या उचितपणे “देवाची देणगी” म्हणून केली आहे. (उपदेशक ३:१२, १३; योहान ५:१७) एखादे आवडते काम आपल्याला आनंद देऊ शकते आणि आपण उपयोगी व हवेहवेसे आहोत असे भासवू शकते. एखाद्याला आपले काम इतके आवडत नसले, तरी कोणालाही ते गमवावे असे वाटत नाही. मोबदला देण्याव्यतिरिक्‍त, पगाराची नोकरी एखाद्याच्या जीवनात पद्धतशीरपणा आणते व त्यास उद्देश आणि स्वत्वाची जाणीव देते. बहुतेक वेळा, “बेकार लोकांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा नोकरीची अधिक आवश्‍यकता असते” हा काही योगायोग नव्हे.

नोकरीच्या शोधात

आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, श्रमिक बाजारातील स्थिती फारच गुंतागुंतीची आहे. परिणामस्वरूप, नोकरी शोधण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण पद्धती आहेत. सरकारी बेकारीकरता असलेल्या सरकारी तरतूदी जेथे कोठे उपलब्ध असतील तेथे ज्यांचा हक्क आहे ते त्यांचा उपयोग करू शकतात; तसेच जेथे लागू होते तेथील लोक बेकारी कार्यालयात नाव नोंदवून प्रस्तुत केल्या जाणाऱ्‍या सेवांचा लाभ घेऊ शकतात. इतरजण त्यांच्या स्वतःचा रोजगार निर्माण करून नोकरी मिळवतात. परंतु, सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बहुधा, स्व-रोजगार असलेल्यांना फेडण्यास इतके सोपे नसलेले प्रारंभीचे भारी खर्च भरावे लागतात. सरकारी वसूलासंबंधी आणि करांचे नियम जाणणे व त्यांचा आदर करणे देखील आवश्‍यक आहे—काही देशांमध्ये ते इतके सोपे नाही!—रोमकर १३:१-७; इफिसकर ४:२८.

काम शोधण्यासाठी काहींनी नोकरी शोधणे यालाच कठीण काम केले आहे व पद्धतशीरपणाने आणि चिकाटीने स्वतःला त्यासाठी वाहिले आहे. इतरांनी कामगारांच्या शोधात असलेल्या कपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे किंवा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या आहेत—यातील नोकरीच्या विनंत्यांच्या काही जाहिराती मोफत छापल्या जातात. सावध राहा! नियतकालिकाने बहुधा तरुणांना तसेच प्रौढांना देखील या विषयावर उपयुक्‍त आणि व्यावहारिक सल्ला दिला आहे.a—पेट्या पाहा, पृष्ठ ११.

तुम्ही जुळवून घेणारे असले पाहिजे—सर्व प्रकारची कामे, तुम्हाला नापसंत असणारी कामे देखील करण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. नोकरीच्या मुलाखतीत, पूर्वीच्या कामाचा अनुभव आणि बेकारीचा कालावधी हे प्रथम विचारले जाते असे तज्ज्ञ म्हणतात. संभाव्य मालक, कामाच्या तालबद्धतेची उणीव असण्याला चांगले चिन्ह मानत नाहीत.

ज्या व्यक्‍तीने शाळेत कुशलता प्राप्त करण्यात आपला वेळ सुज्ञपणे वापरला आहे, तिला पहिलीच नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असते. अल्बर्टो मेयोकी हे अर्थशास्त्रांचे शिक्षक म्हणतात, “बेकारीचा परिणाम विशेषतः अकुशल कामगारांवर होतो.”

भावनात्मक आधाराचे महत्त्व

सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. याचा नोकरी मिळण्यावर आणि न मिळण्यावर प्रभाव पडू शकतो. नोकरी नसलेले भावनात्मक आधाराची अतिशय कदर करतात ज्यामुळे स्वतःला अलिप्त न ठेवण्यास किंवा उदासीन न होण्यास त्यांना मदत मिळते. तसेच स्वतःची तुलना नोकरी न गमावलेल्या इतरांशी केल्याने जो स्वाभिमान गमावला जातो त्यावरही मात करण्याचे ते साध्य करते.

काटकसरीने जगणे सोपे नसेल. “मी चिंताग्रस्त होतोच, पण माझ्याजवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासही मला अतिशय कठीण वाटले,” असे स्तेफनो म्हणतो. “परिस्थितीमुळे माझ्यावर इतका ताण आला की, मी माझ्या प्रिय मित्रांना दोषी ठरवू लागलो,” असे फ्रॅन्सेसको आठवून सागंतो. अशा वेळी कुटुंबाचा आधार महत्त्वाचा ठरतो. कमी पगारामुळे राहणीमानाचा दर्जा कमी करण्यासाठी कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी जुळवून घेण्याची गरज आहे. एकाच कंपनीत २३ वर्षे काम केल्यावर काढून टाकण्यात आलेला ४३ वर्षांचा फ्रँको म्हणतो, “मला कामावरून काढून टाकले त्या वेळेपासून माझी पत्नी सकारात्मक आणि उत्तेजनाचा एक मोठा स्रोत होती.” अर्मानडोच्या पत्नीने “खरेदी करण्यात अधिक सुज्ञता दाखवल्याने” तो विशेषतः तिचे आभार मानतो.—नीतिसूत्रे ३१:१०-३१; मत्तय ६:१९-२२; योहान ६:१२; १ तीमथ्य ६:८-१०.

बायबल तत्त्वे आपल्याला सकारात्मक आत्मा राखण्यास आणि अधिक महत्त्वपूर्ण मूल्यांना न विसरण्यास मदत करू शकतात. सावध राहा! नियतकालिकाने मुलाखत घेतलेल्या वर उल्लेखित लोकांनी बायबलमधून सांत्वनपर आश्‍वासन प्राप्त केले आहे. याने त्यांना देवाच्या नजीक असण्याची भावना दिली आहे. (स्तोत्र ३४:१०; ३७:२५; ५५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७) यहोवा देवासोबत निकट नातेसंबंध राखणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे, कारण तो अभिवचन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्रीयांस १३:५.

एखादी व्यक्‍ती बेकार असो किंवा नसो, तरी देवाचे वचन प्रत्येकाला दैनिक जीवनात उपयुक्‍त ठरणारे गुण विकसित करण्यास उत्तेजन देते. यहोवाच्या साक्षीदारांना शोधले जाते आणि प्रामाणिक कामगार म्हणून त्यांची प्रशंसा केली जाते हा काही योगायोग नव्हे. ते, मेहनती व विश्‍वसनीय असण्याचा व आळशी होऊ नये हा बायबलमधील सल्ला अनुसरतात.—नीतिसूत्रे १३:४; २२:२९; १ थेस्सलनीकाकर ४:१०-१२; २ थेस्सलनीकाकर ३:१०-१२.

बेकारीच्या धास्तीतून मुक्‍तता

कामाच्या अभावाचे एक मूळ कारण आहे—मानवी स्वार्थ आणि लोभ. बायबल म्हणते त्याप्रमाणे, “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”—उपदेशक ८:९.

आता ‘शेवटल्या काळात’ मानवी वर्चस्व काढून टाकण्याद्वारे बेकारीची समस्या—तसेच इतर समस्या देखील—नाहीशा केल्या जातील. (२ तीमथ्य ३:१-३) खरोखर नवीन जगाची आवश्‍यकता आहे. होय, असे जग जेथे नीतिमान मानवी समाज, न्याय्य आणि रास्त आधिपत्याखाली जगू व काम करू शकेल व जेथे लोभ नसेल. (१ करिंथकर ६:९, १०; २ पेत्र ३:१३) यास्तव, देवाचे राज्य यावे व पृथ्वीवर त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे अशी प्रार्थना करण्यास येशूने लोकांना शिकवले.—मत्तय ६:१०.

मानवजातीच्या काही प्रमुख समस्यांचा समूळ नाश केल्याचे भविष्यसूचकपणे वर्णन करून देवाचे वचन त्या राज्याच्या परिणामांचे स्पष्टीकरण देते: “ते घरे बांधतील आणि त्यांत राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही. . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.” (यशया ६५:२१-२३) बेकारीची धास्ती लवकरच सर्वकाळासाठी नाहीशी होईल. तुम्हाला देवाच्या उपायाविषयी अधिक जाणून घ्यावयाचे असल्यास, कृपया तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.

[तळटीपा]

a पाहा ऑक्टोबर २२, १९९४ चे सावध राहा!, पृष्ठे १६—१८; ऑगस्ट ८, १९९१, पृष्ठे ६—१०; जानेवारी २२, १९८३, पृष्ठे १७—१९; आणि जून ८, १९८२, पृष्ठे ३-८.

[११ पानांवरील चौकट]

घरी काम निर्माण करणे

• बाळाला सांभाळणे, बाळाची निगा

• घरी उत्पन्‍न केलेल्या भाज्या किंवा फुले विकणे

• शिवणकाम, ऑल्टर करणे आणि कपड्यांची दुरुस्ती करणे

• उत्पादकांसाठी उक्‍ते काम करणे

• बेकींग आणि खाद्य पदार्थ बनवणे

• रजया तयार करणे, क्रोशर, विणकाम; मॅक्रेमे बनवणे, मातीची भांडी तयार करणे; इतर हस्तकला

• सरंजामाचे सामान तयार करणे

• जमाखर्च, टंकलेखन, गृह संगणक सेवा

• दूरध्वनी सेवा

• केशरचना

• वसतिगृह चालवणे

• जाहिरात देणाऱ्‍यांकरता पत्ते लिहून पाकीटे भरणे

• कार साफ करणे आणि त्यास मेण लावणे (ग्राहक तुमच्या घरी गाडी आणतो)

• पाळीव प्राण्यांची निगा आणि व्यायाम

• कुलुपांची दुरुस्ती आणि चावी तयार करणे (घरी कर्मशाळा)

• अशा कामाच्या अधिकांश जाहिराती सप्ताहांताच्या खरेदी वृत्तपत्रांमध्ये अथवा अधिविपणीच्या (सुपरमार्केट) फलकांवर विनामूल्य किंवा कमी खर्चात दिल्या जाऊ शकतात

[११ पानांवरील चौकट]

घराबाहेर काम निर्माण करणे

• घराची देखरेख (लोक सुटीसाठी बाहेर जातात आणि त्यांच्या घराची देखभाल करावयास त्यांना कोणी हवे असते तेव्हा)

• साफ-सफाई: दुकाने; कार्यालये; बांधकामानंतर, आग लागल्यावर, लोक घरे रिकामी करतात तेव्हा घरे आणि अपार्टमेंट; घरकाम (इतरांच्या घरांमध्ये); खिडक्या (व्यापार आणि घरांच्या)

• दुरुस्ती: सर्व प्रकारच्या उपकरणांची (ग्रंथालयांमध्ये दुरुस्तीविषयी सोपी पुस्तके असतात)

• लहानसहान कामे: घरांच्या भिंतींना बाहेरून फळ्या किंवा पत्रे लावणे; लहान खोल्या, दरवाजे, पोर्च बांधणे; रंग देणे; कुंपण घालणे; छत बसवणे

• शेती काम: पीक, फळे तोडणे

• इंटिरियर लँडस्केपींग आणि झाडांची काळजी: कार्यालये, बँका, शॉपिंग प्लाझा आणि अट्रीयम्स, दालने येथे

• मालमत्तेचे व्यवस्थापन: द्वारपाल, व्यवस्थापक (काहीवेळेस मोफत निवासस्थाने असतात)

• विमा, स्थावर मालमत्ता

• गालिचे घालणे, साफसफाई

• वृत्तपत्र देणे (प्रौढ तसेच मुले), इतर पोचवणी सेवा: जाहिराती, महानगरपालिकांसाठी बिल

• सामान हलवणे, सामान सुरक्षित ठेवणे

• बागेला रमणीय स्वरूप देणे, झाडांची छाटाछाट करणे, गवताच्या पटांगणाची काळजी घेणे, लाकूडतोड करणे

• शालेय-बस चालक

• छायाचित्रण (तैलचित्र अथवा जाहीर घटना)

• मासेमाऱ्‍यांना माशांसाठी आमिष पुरवणे

• बदली काम: विद्युत कामासाठी कारची दुरुस्ती, प्लंबिंगकरता शिवणकाम वगैरेंची अदलाबदल

[१० पानांवरील चित्र]

“माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.”—यशया ६५:२२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा