वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. ६-८
  • बेकारी का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बेकारी का?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समस्येची कारणे
  • सामाजिक पीडा
  • दृष्टिपथात काही उपाय आहेत का?
  • बेकारीची पीडा
    सावध राहा!—१९९६
  • बेकारीपासून मुक्‍तता कशी व केव्हा?
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. ६-८

बेकारी का?

अनेक देशांमध्ये, पुष्कळ लोकांना दीर्घ काळासाठी शीण आणणाऱ्‍या गतीने कठीण शारीरिक काम करून, कदाचित कमी पगारात एखादे धोक्याचेही काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास भाग पाडले जाते. अलीकडील काळापर्यंत, इतर देशांतील अनेकांना अशी खात्री होती, की एखाद्या मोठ्या कंपनीने किंवा सरकार चलित विभागाने त्यांना कामावर घेतल्यावर निवृत्त होईपर्यंत त्यांना सुरक्षित नोकरी असेल. परंतु, आज उपयुक्‍त रोजगार आणि कोणत्याही टप्प्यात सुरक्षितता सादर करू शकणारे व्यापार अथवा नगरपालिका असल्याचे आढळून येत नाही. का बरे?

समस्येची कारणे

हजारो तरुणांना—त्यांच्याकडे विद्यालयीन पदवी असली किंवा नसली तरी—पहिलीच नोकरी मिळत नाही. उदाहरणार्थ, इटलीत, बेकार असलेल्या एक तृतीयांशापेक्षा अधिक लोक १५ ते २४ या वयोगटातील आहेत. आधीच काम करत असलेल्यांचे आणि आपल्या नोकऱ्‍या टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असलेल्यांचे सरासरी वय वाढतच आहे, आणि म्हणून तरुण लोकांना श्रमिक बाजारात प्रवेश मिळवणे अधिक कठीण बनत आहे. श्रमिक बाजारातील अधिकाधिक स्त्रियांमध्येही, बेकारीचे मोठे प्रमाण आहे. यास्तव, नवीन कामगारांचा असाधारणतः मोठा लोंढा आता प्रवेश मिळविण्याची झटापट करत आहे.

पहिल्या औद्योगिक यंत्रांच्या काळापासून, तांत्रिकी नवउपक्रमांमुळे कामगारांची आवश्‍यकता कमी झाली आहे. दीर्घकालीन शीण आणणाऱ्‍या पाळ्या कराव्या लागत असताना, यंत्रांमुळे काम कमी होईल अथवा काम उरणारच नाही अशी आशा कामगार करत होते. स्वयंचलित यंत्रांमुळे उत्पादनात वाढ झाली आहे तसेच अनेक धोके नाहीसे झाले आहेत, पण त्यामुळे काम देखील कमी झाले आहे. जे अनावश्‍यक कामगार होतात ते नवीन कौशल्ये शिकत नाहीत तोपर्यंत त्यांना दीर्घकालीन बेकारीचा धोका असतो.

आम्हा लोकांना वाणिज्य उत्पादनांच्या अतिरिक्‍त विपुलतेने झाकले जाण्याचा धोका आहे. आपण आधीच वाढीच्या मर्यादा गाठल्या आहेत असे काहींना वाटते. त्याशिवाय, कमी कामगार असल्याने, खरेदीदार देखील कमी आहेत. यास्तव, बाजारपेठ, खप होऊ शकतो त्यापेक्षा अधिक उत्पन्‍न करते. उत्पादनातील अपेक्षित वाढी हाताळण्यास बांधण्यात आलेले आर्थिकरित्या सुसाध्य, मोठे कारखाने बंद पाडले जात नाहीत किंवा त्यांचे रूपांतर केले जात नाही. अशाप्रकारच्या रूढींमुळे बेकार होणारे बळी पडतात. आर्थिक मंदीत, कामगारांची मागणी नाहीशी होते, तसेच मंदींमध्ये गमावलेली कामे वाढीच्या काळात क्वचितच पुनर्निर्मित केली जाऊ शकतात. अशाप्रकारे बेकारीची अनेक कारणे आहेत हे स्पष्ट आहे.

सामाजिक पीडा

बेकारी कोणावरही येऊ शकत असल्यामुळे, ती एक सामाजिक पीडा आहे. काही देश अद्यापही काम करत असलेल्यांना संरक्षण देण्याकरता विविध पद्धती पुरवतात—उदाहरणार्थ, कमी पगारात कमी तास काम करणे. तथापि, यामुळे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या भवितव्याला हानी पोहंचू शकते.

रोजंदार असलेले आणि बेकार असे दोघेही कामाशी संबंधित समस्यांविषयी वारंवार तक्रार करतात. बेकार नवीन नोकऱ्‍यांची मागणी करतात, तर नोकरी असलेले आपले संरक्षण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात—हे दोन्ही उद्देश नेहमीच सुसंगत नसतात. “नोकरी असलेल्यांना बहुधा जादा तास काम करण्यास सांगितले जाते. जे बेकार आहेत ते बेकारच राहतात. समाजाचे दोन विभाग होण्याचा धोका आहे . . . एका बाजूला, अधिक रोजगार असलेले आणि दुसऱ्‍या बाजूला, अस्वीकृत बेकार जे पूर्णतः इतरांच्या सदिच्छेवरच अवलंबून असतात,” असे एक इटालियन नियतकालिक पॅनोरमा म्हणते. तज्ज्ञांच्या मते, युरोपमध्ये, आर्थिक वाढीच्या परिणामांचा फायदा रोजगार नसलेल्यांनी घेण्याऐवजी रोजगार असलेल्यांनी आधीच मिळवून घेतला आहे.

या शिवाय, बेकारी ही स्थानिक अर्थव्यवस्थेशी निगडित आहे, जेणेकरून विशिष्ट राष्ट्रांमध्ये, जसे की जर्मनी, इटली आणि स्पेनमध्ये एका भागातील गरजा आणि दुसऱ्‍या भागातील गरजांमध्ये जमीनअस्मानाचा फरक असतो. कामगार नवीन कौशल्ये शिकण्यास किंवा दुसऱ्‍या भागात अथवा दुसऱ्‍या देशात स्थानांतर करण्यास तयार आहेत का? हे बहुधा एक निर्णायक कारण ठरू शकते.

दृष्टिपथात काही उपाय आहेत का?

बहुतांशी, आर्थिक सुधाराबद्दल आशा बाळगल्या जातात. परंतु, काही लोक साशंक असतात आणि २००० या सालापर्यंत अशा प्रकारचा सुधार घडून येणार नाही असा विचार करतात. इतरांच्या मते सुधारणेची सुरवात झालेली आहे, पण इटलीतील रोजगारात अलीकडेच घट झाल्यावरून स्पष्ट होते त्याप्रमाणे परिणाम फार हळूहळू दिसून येतात. आर्थिक सुधारणा म्हणजे बेकारीत घट झालीच पाहिजे असे नाही. मर्यादित वाढ असली, तरी व्यापारसंस्था, इतरांना कामावर घेण्याऐवजी त्यांच्याजवळील कामगारांचा जास्त फायदा घेऊ इच्छितात—म्हणजे, “विना नोकरीची वाढ” आहे. शिवाय, बेकारांची संख्या निर्माण केल्या जाणाऱ्‍या नवीन नोकऱ्‍यांच्या संख्येपेक्षा जलद गतीने वाढते.

आज राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचे सार्वत्रीकरण होत आहे. काही अर्थशास्त्रज्ञ असा विचार करतात, की नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (एनएएफटीए) आणि एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोओपरेशन (एपीइसी) यांसारखी सर्व राष्ट्रांवर हुकूमत चालवणारी मोठी, नवीन अधिकारी संस्थांची व्यापारी क्षेत्रे निर्माण केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला देखील प्रेरणा मिळू शकेल. तथापि, ही वहिवाट महामंडळांना कामगार स्वस्तात उपलब्ध असतील तेथे स्थापित होण्यास प्रवृत्त करते, व परिणामतः उद्योगप्रदान राष्ट्रे नोकऱ्‍या गमावतात. त्याचवेळी, जे कामगार अधिक कमावत नाहीत त्यांची असेल नसेल ती अपुरी मिळकतही नाहीशी होत असल्याचे त्यांना दिसते. अनेक देशांमध्ये, पुष्कळांनी हिंसात्मकरितीने देखील या व्यापार समेटांविरुद्ध मते व्यक्‍त केली आहेत हा काही योगायोग नव्हे.

बेकारीविरुद्ध लढा देण्यासाठी तज्ज्ञ अनेक उपाय सुचवतात. काही तर परस्परविरोधी देखील आहेत पण हे अर्थशास्त्रज्ञांनी, राजकारणी व्यक्‍तींनी किंवा खुद्द कामगारांनी सुचवली आहेत यावर अवलंबून असते. असे काही आहेत जे कंपन्यांना कराचे ओझे कमी करून कामगारांत वाढ करण्यास प्रेरणा देण्याचे सुचवतात. काही, सरकारचा प्रचंड हस्तक्षेप असावा असे सांगतात. इतर, कामाची वेगवेगळी विभागणी करण्यास आणि कामाचे तास कमी करण्यास सुचवतात. मागील शतकात, बेकारीत घट न होता कामाचा हप्ता सर्व उद्योगप्रदान राष्ट्रांमध्ये पद्धतशीररित्या कमी करण्यात आला असला, तरी काही मोठ्या कंपन्यांमध्ये हे आधीच करण्यात आले आहे. “कालांतराने, प्रत्येक धोरण व्यर्थ ठरते, व फायद्यांपेक्षा खर्च अधिक असतो,” असे अर्थशास्त्रज्ञ रेनेटो ब्रुनेट्टा ठासून सांगतात.

“आपण स्वतःची फसणूक करून घेऊ नये, समस्या कठीण आहे,” असा निष्कर्ष एल’प्रेस्सो हे नियतकालिक काढते. निरसन करता येणार नाही इतकी कठीण? बेकारीच्या समस्यावर उपाय आहे का?

[८ पानांवरील चौकट]

एक प्राचीन समस्या

बेकारी ही एक जुनी समस्या आहे. शतकांपासून, लोकांना अधूनमधून ते स्वतः अनिच्छेने बेकार असल्याचे आढळून आले आहे. एकदा काम संपले, की मोठ्या बांधकामाच्या प्रकल्पांमध्ये उपयोगात आणलेले लाखो लोक—निदान त्यांना दुसरीकडे काम मिळेपर्यंत तरी स्वतः बेकार होत होते. या दरम्यान, थोडक्यात सांगायचे तर, त्यांचे अस्तित्व अतिशय असुरक्षित असते.

मध्ययुगात, “आधुनिक अर्थाने बेकारीची समस्या नसली, तरी,” बेकार अस्तित्वात होते. (ला डिसओक्युपाझायोने नेल्ला स्तोऱ्‍या [इतिहासात बेकारी]) तथापि, त्या काळी काम न करणाऱ्‍यांना कामचुकार आणि उडाणटप्पू असेच समजले जात होते. १९ व्या शतकातही, पुष्कळ इंग्रज मूलतत्त्वशोधकांनी, “बेकार लोकांना ‘मवाली’ आणि उनाड जे बाहेर झोपत व रात्री-अपरात्री रस्त्यांवर भटकत अशा लोकांमध्ये गणले,” असे प्राध्यापक जॉन बर्नेट यांनी स्पष्ट केले.—रिकामटेकडे हात (इंग्रजी).

“बेकारीचा शोध” १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा २० व्या शतकाच्या सुरवातीला लागला. समस्येचा अभ्यास करून तिचे निरसन करण्याकरता खास सरकारी चौकशी मंडळे स्थापली होती जसे, १८९५ मध्ये, “रोजगाराच्या अभावामुळे होणारी दुर्दशा” यावरील ब्रिटीश लोकप्रतिनिधीच्या सभागृहाची निवडक समिती. रोजगार नसणे एक सामाजिक पीडा बनली होती.

ही नवीन जाणीव, विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर नाट्यमयरित्या पसरली. या झगड्याने शस्त्रांचे वेडेपिसे करणारे उत्पादन करून बेकारीचा प्रत्यक्षात नायनाट केला होता. पण १९२० च्या दशकात सुरवात होऊन, पाश्‍चिमात्य जगाने एकामागोमाग एक लागोपाठ मंदींचा सामना केला ज्याचे पर्यवसान महामंदीत झाले, तिची सुरवात १९२९ मध्ये होऊन तिने जगाच्या सर्व उद्योगप्रदान अर्थव्यवस्थांना ग्रासले. दुसऱ्‍या महायुद्धानंतर, अनेक देशांनी नवीन आर्थिक भरभराट अनुभवली आणि बेकारीचे प्रमाण कमी झाले. पण “आजच्या बेकारीच्या समस्येच्या सुरवातीचे मागमूस मध्य-१९६० च्या दशकात लावले जाऊ शकते,” अशी आर्थिक सहकार्य आणि विकासाची संघटना म्हणते. श्रमिक बाजाराला १९७० च्या दशकातील तेलाच्या संकट प्रसंगामुळे आणि संगणकीकरण माहिती स्फोटाच्या परिणामस्वरूप कामगारांना कामावरून काढण्यात आले त्यामुळे नवा टोला बसला आहे. बेकारीची निरंतर वाढ होत चालली आहे तसेच एके काळी सुरक्षित समजल्या जाणाऱ्‍या पांढरपेशांच्या आणि व्यवस्थापक क्षेत्रांमध्येही ती शिरली आहे.

[७ पानांवरील चित्र]

अधिक कामाची मागणी केल्याने बेकारीची समस्या सुटणार नाही

[चित्राचे श्रेय]

Reuters/Bettmann

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा