बायबलचा दृष्टिकोन
“नाजूक पात्र” स्त्रियांचा अपमान?
“स्त्रियांची योग्यता त्यांचा अनुभव, शक्ती व बुद्धी यावरून न्याय ठरविण्याऐवजी त्यांच्या जातीवर का ठरविले जाते?”—बेट्टी ए.
“निश्चितच स्त्रियांना त्या कमी प्रतीच्या आहेत असा विचार करण्यास भाग पाडले जाते.”—लीन एच.
बायबलमधील “नाजूक पात्र” ही अभिव्यक्ती स्त्रीला कमी लेखते का? १ पेत्र ३:७ बायबलमधील वचन विवादास्पद आहे जे म्हणते: “नवऱ्यांनो, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्याबरोबर सुज्ञतेने राहा; बायको अधिक नाजूक पात्र आहे; आणि तुम्ही जीवनाच्या कृपेचे सोबतीचे वतनदार आहात असे समजून तुम्ही त्यांना मान द्या; तुमच्या प्रार्थना खुंटू नयेत म्हणून असे करा.” (पं.र. भाषांतर)
जेव्हा पेत्राने सहख्रिश्चनांना हे शब्द लिहिले, तेव्हा स्त्रियांना खूपच कमी हक्क होते ते फक्त खोट्या धर्माच्या जगातच नव्हे तर धर्मत्यागी यहुदी समाजामध्येही होते. पेत्र व सुरवातीचे ख्रिस्ती तेव्हाचा स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन याचे समर्थन करत होते का?
कमी दर्जांची पात्रे?
पहिल्या शतकातील वाचक पेत्राच्या “नाजूक पात्र” या अभिव्यक्तीचा कसा अर्थ लावत होते? पात्र यासाठी ग्रीक शब्द (स्कुयास) ग्रीक शास्त्रवचनामध्ये पुष्कळ वेळा वापरलेला आहे व तो वेगवेगळया पेट्या, उपकरणे, भांडी व साहित्य याला सूचित करतो. स्त्रियांना “नाजूक पात्र” असे उच्चारताना पेत्र त्यांना कमी लेखत नव्हता; परंतु ही अभिव्यक्ती पतीही अशक्त व नाजूक होते याला सूचित करते. बायबलमधील इतर वचने स्त्री व पुरूष दोघांनाही उल्लेखताना “मातीचे पात्र” (२ करिंथकर ४:७ पं.र. भाषांतर) व “दयेची पात्रे” अशा प्रकारचा दृष्टांत उपयोगात आणते (रोमकर ९:२३). होय, पेत्र स्त्रियांचे “नाजूक” असे वर्णन त्यांच्या स्त्रीजातीमुळे करत आहे. परंतु रोमकर ५:६ मध्ये “नाजूक” हा शब्द सर्व मानवांना—स्त्री व पुरूषांना उल्लेखून आहे. म्हणूनच सुरवातीच्या ख्रिश्चनांनी “नाजूक पात्र” ही संज्ञा स्त्रियांसाठी मानहानीकारक या दृष्टीने विचारात घेतली नसेल.
तर उलट, पेत्राचे शब्द स्त्रियांच्या स्थानाला उच्चता देणारे आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले असावे. पेत्राच्या दिवसात स्त्रियांना आदर दिला जात नव्हता. फार पूर्वी देवाने पाहिले होते त्याप्रमाणे, पतींनी नेहमी पत्नींवर अधिकार चालविला व शारीरिक, नैतिक व भावनिकरित्या त्यांना वाईट वागणूक दिली आहे. (उत्पत्ती ३:१६) याप्रमाणे, पेत्राचा सल्ला ख्रिस्ती पतींना असा लागू होतो: जगीक समाजाने पुरूषांना दिलेल्या शक्तीचा त्यांनी स्त्रियांची पिळवणूक करण्यासाठी वापर करु नये.
“नाजूक” ह्या संज्ञेकडे आपण बारकाईने पाहूया. पेत्र या वचनामध्ये भावनिकरित्या नव्हे तर शारीरिकतेचे लक्षण यास सूचित करत होता. पुरूष हे कमजोर पात्र आहेत; पंरतु त्यांच्या तुलनेत स्त्रिया अधिक नाजूक पात्र आहेत. ते कसे काय? पुरूषाची हाडे व स्नायुंची रचना अशाप्रकारची आहे जी त्यांना अधिक शक्ती बहाल करते. तथापि, पेत्र येथे नैतिक, आध्यात्मिक व मानसिक शक्ती यांची तुलना करत होता असे दिसते. खरे पाहता, घटनेबद्दल भावनिक प्रतिक्रिया ह्या स्त्रिया व पुरूषांपेक्षा वेगळ्याच आहेत असे त्यांचे वर्णन होऊ शकते त्या नाजूक किंवा बलवान आहेत याचा येथे संबंध येत नाही. बायबल सुदृढ असा नैतिक स्वभाव असणाऱ्यांचे, धीर धरणाऱ्यांचे व देवाच्या मार्गांचे अनुकरण करणाऱ्या स्त्रिया—सारा, दबोरा, रुथ, एस्तेर—यांचे वर्णन करते. नम्र पुरुषांना स्त्रिया त्यांच्यापेक्षा अधिक हुशार आहेत हे ओळखण्यास अवघड वाटत नाही.
तरी देखील, स्त्रियांचा “नाजूक” असा उल्लेख त्या कमी प्रतीच्या आहेत असे सूचित होते असा काही विश्वास बाळगतील. परंतु हे उदाहरण विचारात घ्या. एका व्यक्तीकडे दोन उपयुक्त डब्बे आहेत. एक मजबूत आहे व दुसरा त्यापेक्षा नाजूक आहे. तर मग दुसरा डब्बा हा तितका मजबूत नसल्याने तो कमी प्रतीचा होतो का? खरे म्हणजे नाजूक असणारा डब्बाच नेहमी मजबूत असणाऱ्या डब्यापेक्षा अधिक काळजीने व आदराने वापरला जातो. त्याचप्रमाणे स्त्रियांची शारीरिक शक्ती पुरूषांपेक्षा कमी आहे त्यामुळे त्या कमी प्रतीच्या आहेत का? निश्चितच नाही! पेत्राने “नाजूक पात्र,” ही अभिव्यक्ती स्त्रियांना कमी लेखण्यासाठी नव्हे तर आदर वाढविण्यासाठी वापरली आहे.
“त्याचप्रमाणे . . . सुज्ञतेने राहा”
पेत्राने पतींना विनवणी केली की,“त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्याबरोबर [त्यांच्या पत्नी] सुज्ञतेने राहा.” “त्याचप्रमाणे” म्हणजे कोणाप्रमाणे? पेत्र आधीच्या वचनांमध्ये ख्रिस्ताची शिष्यांबद्दलच्या प्रेमळ काळजीची चर्चा करत होता व पतींना त्यांच्या पत्नींची काळजी “त्याचप्रमाणे” घेण्याची सूचना दिली. (१ पेत्र २:२१-२५; ३:७) ख्रिस्ताने नेहमी स्वतःच्या व्यक्तिगत आस्था व पसंतीपेक्षा त्याच्या शिष्यांचे हित व आस्था प्रथम ठेवली. तो त्यांच्या आध्यात्मिक व शारीरिक हिताबद्दल आस्था राखून होता व त्याने त्यांची मर्यादा लक्षात घेतली. पतींनी त्यांच्या पत्नींबरोबर “त्याचप्रमाणे” वागण्यास ख्रिस्ताच्या प्रेमाचे अनुकरण करायचे आहे.
सुरळीत चालत असणारा विवाह अचानक घडून येत नाही. पती व पत्नी या दोघांनाही यशस्वी विवाहास हातभार कसा लावावा याची माहिती असावी. म्हणून पेत्राचा पतींना सल्ला आहे, की त्यांनी त्यांच्या पत्नींबरोबर “सुज्ञतेने” सहवास ठेवावा. पतींना, यहोवा व त्याचा पुत्र येशूने स्त्रियांबरोबर कसा व्यवहार केला या उदाहरणाचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांच्या पत्नींना कसे वागवावे असे देव अपेक्षितो याची त्यांना जाणीव असावी.
या शिवाय, पतींनी त्याच्या पत्नींच्या —भावना, शक्ती, मर्यादा, आवडनिवड चांगल्या प्रकारे ओळखाव्यात. त्यांच्या पत्नींची बुद्धी, अनुभव व त्यांचे मोल याला आदर दाखवण्याची गरज आहे. बायबल म्हणते: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करितो”—इफिसकर ५:२५, २८, २९.
त्यांना आदर द्या
जेव्हा पेत्राने स्त्रियांचा “नाजूक पात्र” असा उल्लेख केला तेव्हा त्याने असे देखील म्हटले, की पतींनी त्यांना “आदर द्यावा.” ग्रीक शब्द टाईम हे नाम आदर, प्रशंसा, मोल व बहुमूल्य हा अर्थ सूचित करते. दुसऱ्या शब्दात, आदर दाखविणे हे केवळ कृपेचे एकच कृत्य नव्हे तर त्यांना जे द्यावयाचे आहे त्याला मान्यता देणे होय. पौलाने सर्व ख्रिश्चनांना म्हणजे स्त्री-पुरूषांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन दिले: “प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोमकर १२:१०
यहोवा स्त्रियांना निश्चितच शोभीवंत वस्तूप्रमाणे विचारात घेत नाही. इज्राएलामध्ये यहोवाचा नियम, दोषी असणाऱ्या सर्व स्त्री-पुरूषांना जे व्यभिचारी, गुन्हेगारी, पशुतुल्य वर्तन करणाऱ्यांना व इतर दुष्टृकत्ये करणाऱ्यांना सारख्याच प्रमाणात लागू पडला. (लेवीय १८:६-१७, २३, २९; २०:१०-१२) शब्बाथ, नाजीरावर नियंत्रण करणारे नियम, सण व नियमशास्त्राच्या इतर तरतुदी या फायद्यांचा अनुभव स्त्रिया घेऊ शकत होत्या. (निर्गम २०:१०; गणना ६:२; अनुवाद १२:१८; १६:११, १४) आई, त्याचप्रमाणे वडिलांना आदर व मान द्यायचा होता.—लेवीय १९:३; २०:९; अनुवाद ५:१६; २७:१६; नीतीसूत्रे १:८.
नीतीसूत्रे अध्याय ३१ वचने १० ते ३१ मध्ये “सद्गुणी स्त्रीला” तिचा विश्वास, मेहनत व पुष्कळ जबाबदाऱ्या पार पाडण्यामुळे आदर मिळतो. यथायोग्यतेने, कौटुंबिक व्यवहार त्याचप्रमाणे इतर आर्थिक गोष्टींच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये तिचा जो सहभाग होता त्याद्वारे तिची ओळख होत होती. ज्यांना स्त्रिया ह्या फक्त एक शोभा आणणारे अलंकार आहे असे वाटते त्या काही पुरूषांच्या प्रवृत्यांपेक्षा हे किती वेगळे आहे! नंतर पूर्वीच्या ख्रिस्ती मंडळीमध्ये ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने स्त्रियांना पवित्र आत्मा बहाल केला होता. (प्रेषितांची कृत्ये १:१४, १५; २:३, ४; पडताळा योएल २:२८, २९.) याप्रमाणे काही स्त्रियांना पुरूषांचे, स्त्रियांचे व देवदूतांचेही स्वर्गीय न्यायाधीश होण्याची नियुक्ती करण्यात आली आहे. (१ करिंथकर ६:२, ३) हे खरे की, स्त्रियांनी मंडळीच्या गटामध्ये शिकवायचे नव्हते; परंतु अशा काही परिस्थिती होत्या जेव्हा ख्रिस्ती स्त्रिया प्रार्थना किंवा संदेश देऊ शकत होत्या. तरुण स्त्रियांना, मुलांना व जे मंडळी बाहेरचे आहेत त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती.—मत्तय २४:१४; १ करिंथकर ११:३-६; तीताला पत्र २:३-५; पडताळा स्तोत्र ६८:११.
त्यांना आदर द्या, असे जेव्हा पेत्राने म्हटले तेव्हा त्याच्या मनात काय होते याचा दुसरा चांगला पुरावा २ पेत्र १:१७ मध्ये आम्ही वाचतो की यहोवाने इतर उपस्थितीत असताना येशूला संमती व आदर दर्शवून म्हटले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे.” त्याचप्रमाणे पतींनी त्याच्या कृतीने सार्वजनिक व खाजगीपणे त्यांच्या पत्नींना आदर देत असल्याचे दाखवावे.
जीवनाचे वारस
संपूर्ण इतिहासामध्ये पुरूषांनी स्त्रियांना नेहमी कमी मान व आदर—दास, किंवा पुरुषांना खूष करणारे साधन या दृष्टीने पाहिले आहे. स्त्रियांना अधिक आदर दाखवण्याची ख्रिस्ती कल्पना निश्चितच आदराच्या उच्च पातळीकडे निरविते. बार्नस यांचे नवीन करारावरील टिपण (इंग्रजी) निरीक्षण करते, की पेत्राच्या सूचनेत “स्त्री जातीबद्दल खूपच महत्त्वाचे सत्य समाविष्ट आहे. ख्रिस्ती धर्म व्यवस्थेव्यतिरिक्त इतर सर्व धर्मपद्धती खाली पुरूषांपेक्षा स्त्रियांना सर्व मार्गाने कमी दर्जांचे मानले आहे. ख्रिस्ती धर्म शिकवितो . . . जे धर्म देऊ शकतो त्या सर्व आशेसाठी व अभिवचनासाठी त्यांना अधिकार आहे. . . हे एकच सत्य स्त्रीजातीला सर्व निकृष्ट दर्जांपासून वर आणिल व मानवजातीच्या अर्ध्या दुष्ट कृत्यांचा ताबोडतोब अंत करू शकेल.”
ख्रिस्ताचा दोन्ही स्त्री-पुरूषांवर अधिकार असल्याने, ख्रिस्ताची मालमत्ता समजून पतींनी त्यांच्या पत्नीची चांगल्याप्रकारे काळजी घेण्याचे गंभीर कारण आहे. पेत्राने स्त्रियांचा “नाजूक पात्र” असा उल्लेख केल्यावर लगेचच पुढे त्याचे शब्द म्हणतात: “तुम्ही उभयतां जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७ब) पेत्राने हे दर्शविले, की पतींनी त्यांच्या पत्नींना गैरवागणूक दिल्याने त्यांचा देवाबरोबरचा नातेसंबंध बिघडविला जातो व त्यांच्या प्रार्थनांमध्ये अडखळणे येतात.
“नाजूक पात्र” ही अभिव्यक्ती कुठल्याही अर्थाने स्त्रियांचा अपमान करण्यास वापरलेली नाही. जसे यहोवाने पतीला कुटुंबाचे मस्तक असे बनविले आहे तसे स्त्रियांना गैरवागणूक देण्याची मान्यता त्यांना दिली नाही. त्या उलट, तो दर्शवितो की पुरूषाने, स्त्रीच्या ज्ञानाने तिला आदर दाखवून तिची काळजी घ्यावी.
बायबल विवाहीत व सडे दोघाही पुरुषांना दर्शविते, की त्यांनी स्त्रियांना कमी न लेखता त्यांना मान द्यावा. जे स्त्री-पुरूष प्रामाणिकपणे देवाची भक्ती करतात व आपणापेक्षा दुसऱ्यांना श्रेष्ठ समजतात त्यांना यहोवाकडून आशीर्वाद मिळतील.—पडताळा १ करिंथकर ७:१६. (g94 10/8)
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Miss G. E. K. I Artist: Alice D. Kellogg 1862-1900
Courtesy of Joanne W. Bowie