वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 ४/८ पृ. २०
  • आईस्क्रिमचा इतिहास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आईस्क्रिमचा इतिहास
  • सावध राहा!—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आईस्क्रिम बनवण्याची कला
  • समुद्राचे स्फटिकी महाल
    सावध राहा!—१९९६
  • आहार चिंतेचा प्रश्‍न
    सावध राहा!—१९९७
  • ब्रुनॉस्ट स्वादिष्ट नॉर्वेजियन चीझ
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२००५
सावध राहा!—१९९४
g94 ४/८ पृ. २०

आईस्क्रिमचा इतिहास

आईस्क्रिम हे त्याच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा आता फारच सुधारले आहे. प्राचीन रोमी लोकांनी सॉरबेटचा शोध लावला. बर्फ, फळ आणि मधापासून तयार करण्यात आलेले हे निम्मे गोठलेले डिसर्ट कधीकधी श्रीमंतांच्या मेजावर दिसून येत असे. पुष्कळ कालांतराने सॉरबेटचे उत्पादन सुधारण्यात आले. स्पष्टपणे, मध्ययुगात अरबच्या आचाऱ्‍यांनी त्याचा कळस गाठला. “सॉरबेट” व “शरबत” हे दोन्ही शब्द मूलतः अरबी असावेत.

असे म्हटले जाऊ शकते की, हे उत्कृष्ट सॉरबेट जे विशेषतः पाण्याने तयार केलेले आहे, ते आधुनिक दिवसातील आईस्क्रिमचे पूर्वज आहे. दूध, अंडी, साखर, रुची आणण्यासाठी घातलेले पदार्थ यामुळे मलईयुक्‍त, चविष्ट मिश्रण तयार होते. या सर्वांच्या उपयोगामुळे त्याने एक वेगळेच वळण घेतले. फ्रेंच राजा, लुईस १४ वा याच्या दरबारात तुम्ही १६०० च्या काळात जगला असता तर, आईस्क्रिमची उच्च समाजातील सुरवात तुम्ही पाहू शकला असता. त्यावेळी वैद्यकीय डॉक्टर व इतर विद्वानांमध्ये आईस्क्रिम हे पचनासाठी चांगले आहे की नाही याबद्दल मतभेद होते.

शीतपेटीच्या आईस्क्रिमची यंत्रे नसताना आईस्क्रिम बनवणे तेव्हा कसे शक्य होते? सुरवातीला, लाकूड किंवा कासे यांनी बनवलेली दोन पात्रे उपयोगात आणली जात होती. एकाच्या आत दुसरे ठेवले जात होते. लहान पात्रात आईस्क्रिमचे मिश्रण तयार केले जाई. दोन्हींमधील जागा बर्फ व मिठाने भरत. सर्व घटक मिसळल्यावर, ते मिश्रण त्या पात्रात तसेच ठेवत व आईस्क्रिम तयार होत असे. परंतु, बर्फ कोठून मिळायचा? पुष्कळ शतकांआधी लोकांना हे आढळले की, बर्फ बनवला जाऊ शकत होता. हिवाळ्यात बर्फ गोळा करून, साठवून त्यांना खड्यांमध्ये घालून वरून गवताच्या पेंढ्यांनी व ओकच्या फांद्यांनी झाकले जात होते. १९ व्या शतकात बर्फ तयार करणाऱ्‍या यंत्रांचा शोध लागला व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास त्यांचा उपयोग होऊ लागला. घरी, लाकूड व बुचाने बनवलेल्या बर्फाच्या पेटींमध्ये बर्फ साठवण्यात येत असे.

या शतकात, आईस्क्रिम बनवण्याच्या तंत्रांमध्ये फारच सुधारणा झाली आहे. शीतपेट्या, आईस्क्रिमची यंत्रे व इतर साधनांमुळे आज दोन्ही कारखान्यातील व घरातील आईस्क्रिमचे उत्पादन सोयीस्कर झाले आहे. त्याचे आरोग्याचे सुधारित दर्जे देखील आहेत.

आईस्क्रिम बनवण्याची कला

एका कुशल आईस्क्रिम बनवणाऱ्‍याला त्याचा व्यवसाय माहीत असला पाहिजे. याचाच अर्थ त्याने, हलवाई, आचारी, कलाकार, व काही प्रमाणात रसायनशास्त्रज्ज्ञ व सूक्ष्मजन्तुशास्त्रज्ज्ञ देखील असावयास हवे. आईस्क्रिम इतके घट्ट, मलईयुक्‍त व स्वादिष्ट कसे बनते? कारखान्यात बनवलेल्या आईस्क्रिमचेच उदाहरण घ्या. उत्पादनाच्या वेळी, ते मिश्रण घट्ट बनवण्याकरता स्निग्ध पदार्थ व वनस्पतीचे संहत अर्क त्यात घातले जातात. योग्य प्रमाणात अंडी, साखर, व जरुर भासल्यास, नैसर्गिक रंग व कोको, कॉफी व फळे यांसारखे रुची आणणारे पदार्थ देखील मिसळले जातात. शेंगदाण्याच्या लोणीचे आईस्क्रिम देखील असते.

ते मिश्रण ७०°सेल्सियसच्या तापमानात चांगल्याप्रकारे मिसळले जाते. नंतर, त्यात असणाऱ्‍या कोणत्याही जंतूंचा नाश करण्यासाठी त्यास ९०°सेल्सियसच्या तापमानावर आणले जाते. काही तासांसाठी ४°सेल्सियसपर्यंत त्यास थंड करण्यात आल्यावर ते गोठते. या प्रक्रियेची दुसरी स्थिती, थिजवण्याची आहे. मिश्रण हळूहळू ढवळले जात असताना, तापमान जलद रितीने −६° पासून −१०° सेल्सियसपर्यंत कमी केले जाते. यामुळे त्यात हवा शिरते. आईस्क्रिम असे विशिष्ट मलाईयुक्‍त होण्यासाठी ही गोष्ट त्यास हातभार लावते.

रोमी लोकांनी सॉर्बटचा आस्वाद घेऊन व लुईस १४ व्याच्या दरबारात आईस्क्रिमला प्रस्तुत करून पुष्कळ शतके उलटून गेली आहेत. परंतु, पुढच्या वेळी, सॉर्बट किंवा आईस्क्रिम असे तुमचे आवडते गोठलेले डिसर्ट खात असताना, त्या प्राचीन रोमी लोकांनी अशा तजेलदार कल्पनेचा शोध केल्यामुळे त्यांचे आभार माना! (g94 3/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा