तरुण लोक विचारतात. . . .
आत्महत्या हे उत्तर आहे का?
“मला दररोज सकाळी उठण्याचा कंटाळा येतो. मला काय करावे ते कळत नाही. मला राग येतोय. माझ्या हृदयात वेदना होतात. . . . म्हणून मी सोडून जाण्याचा विचार करीत आहे. . . . मला सोडून जावेसे वाटत नाही, परंतु मला जायला हवं असे मला वाटतय. . . . मी पुढे भविष्यात पाहतो तर मला फक्त अंधकार व दुःख दिसत आहे.” —२१ वर्षीय पीटरची आत्महत्येची चिठ्ठी.a
तज्ज्ञ असा दावा करतात की, अमेरिकेत २० लाख तरुण लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यापैकी ५,००० जण दर वर्षी यशस्वी होतात. परंतु, तरुण लोकांमधील आत्महत्या ही अमेरिकेपुरतीच मर्यादित नाही. भारतात १९९० मध्ये काही ३०,००० युवकांनी आत्महत्या केली. इस्राएल, कॅनडा, थायलँड नेदरलँडस्, न्यूझीलंड, फीनलँड, फ्रान्स, स्पेन व स्वीत्झरलँड यासारख्या देशांमध्ये तरुण लोकांतील आत्महत्येचे प्रमाण नाट्यमयरितीने वाढले आहे.
एखाद्याला दुःखाने भारावून गेल्यासारखे किंवा दुःखाच्या जाळ्यात अडकल्यासारखे वाटत असले तर काय? तसेच, त्यातून निसटण्याचा कोणताही मार्ग दिसत नसल्यास काय? आत्महत्या मोहविणारी वाटू शकेल. परंतु, वास्तविक पाहता ती दुःखद नाशाशिवाय आणखी काही नाही. त्याच्या परिणामांती ती, मित्र व कुटुंबियांसाठी कष्ट व दुःखाशिवाय काही देत नाही. भविष्य कितीही अंधकारमय दिसले व त्रास कितीही भीतीदायक वाटला तरी, स्वतःला मारून टाकणे हे त्याचे उत्तर नव्हे.
काहींना असे का वाटते
धार्मिक पुरुष, ईयोबाला निराशेचा अर्थ माहीत होता. त्याचे कुटुंब, त्याची मालमत्ता व त्याचे चांगले आरोग्य गमावल्यामुळे, तो म्हणाला: “माझा गळा दाबून मला मारिले तरी माझ्या जिवास पुरवेल; माझ्या या अस्थिपंजरापेक्षा मला मरण पुरवेल.” (ईयोब ७:१५) आजच्या काही तरुणांना असेच वाटले आहे. एका लेखकाने त्याबद्दल असे म्हटले: “दबाव . . . दुःखाकडे (दुःख आणि भीतीच्या भावना) निरवते [जे] बचावाकडे (दुःख टाळण्याचे प्रयत्न) निरवते.” अशाप्रकारे, असह्य दुःख टाळण्यासाठी आत्महत्या हा एक चुकीचा प्रयत्न आहे.
अशा दुःखाचे कारण काय? कोणतीही घटना त्यासाठी कारणीभूत होऊ शकते, जसे की, एखाद्याच्या पालकांबरोबर, प्रियकराबरोबर किंवा प्रेयसीबरोबर त्वेषयुक्त वादविवाद होणे. प्रेयसीसोबत संबंध तुटल्यावर, १६ वर्षीय ब्रॅड निराशेत बुडाला. तरीसुद्धा, त्याने त्याच्या भावना कधीही व्यक्त केल्या नाहीत. त्याने स्वतःला गळफास लावून त्या सर्वाचा अंत केला.
एकोणीस वर्षीय सुनीताचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध होते. तिच्या पालकांना याबद्दल कळाल्यावर ती उदासीनतेत बुडाली. ती आठवून सांगते, “मला माहीत आहे की, मी जसे जीवन जगत होते तसेच मला जगायचे नव्हते. म्हणून मी एके रात्री घरी येऊन ॲस्प्रिनच्या गोळ्या गिळल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रक्ताच्या उलट्या करीत होते. मी, माझ्या जीवनाचा नव्हे तर माझ्या जीवनक्रमणाचा अंत करू पाहात होते.”
शाळेमुळे देखील तीव्र दबाव येऊ शकतो. तरुण आशिशने डॉक्टर बनावे यासाठी त्याच्या पालकांनी, (जे स्वतः डॉक्टर आहेत) त्यावर दबाव आणला. त्याला निद्रानाशाचा रोग झाला. तो इतरांपासून दूर राहू लागला. त्याच्या पालकांच्या विद्यालयीन अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाही. यासाठी, आशिशने झोपेच्या गोळ्यांचा अधिक डोस घेतला. हे, एखाद्याला पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे १५:१३ मधील गोष्ट आठवून देते: “मनातील खेदाने हृदय भंग पावते.”
कौटुंबिक दुःख
पालकांचा घटस्फोट किंवा फारकत, कौटुंबिक सदस्याचा मृत्यू, किंवा जागा बदलून नवीन जागी जाणे, अशाप्रकारचा कौटुंबिक गोंधळ युवकांमधील आत्महत्येचे आणखी एक कारण आहे. उदाहरणार्थ, वर उल्लेखिलेल्या ब्रॅडने एका मोटार गाडीच्या अपघातात त्याच्या दोन जवळच्या मित्रांना व नातेवाईकाला गमावले होते. नंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्या येऊ लागल्या. ब्रॅड केवळ दुःखाने ग्रासून गेला होता. स्तोत्रकर्त्याने आक्रोश केला त्याप्रमाणे त्यालाही वाटले असावे: “माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे . . . त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकिले आहे.”—स्तोत्रसंहिता ८८:३, १७.
पुष्कळ युवकांची संख्या, इतर प्रकारच्या—शारीरिक, भावनिक व लैंगिक गैरवागणूकीच्या दबावाच्या अधीन आहेत. भारतातील केरळ राज्यात, त्या देशातील सर्वात अधिक युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे. पुष्कळ यौवनावस्थेतील मुलींनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी गैरवागणूक केल्यामुळे स्वतःला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात, मुलांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गैरवागणूकीचे प्रमाण साथीप्रमाणे फैलावत आहे. त्याच्या निष्पाप बळींसाठी हे दुःख असह्य असू शकते.
दुःखाची इतर कारणे
परंतु, सर्वच आत्महत्येच्या भावनांसाठी बाह्य कारणे कारणीभूत नाहीत. अविवाहित युवकांबद्दल एक संशोधनाचा अहवाल असा सांगतो: “लैंगिक संयोग आणि मद्य प्राशन न करणाऱ्यांपेक्षा, त्यात गोवलेल्या स्त्री व पुरुषांना [आत्महत्येचा] अधिक धोका होता.” सुनीताने स्वैराचारी संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली. तो गर्भ तिने गर्भपाताद्वारे काढून टाकला. (पडताळा १ करिंथकर ६:१८.) तिला दोषी असल्याचे वाटू लागले. तिला मरायचे होते. त्याप्रमाणे, ब्रॅड देखील १४ वर्षांचा असल्यापासून मद्य प्राशन करीत होता. तो नियमितपणे पार्ट्यांना जात असे. होय, गैरवापर केल्यावर मद्य, ‘सर्पासारखे दंश करू’ शकते.—नीतीसूत्रे २३:३२.
एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या “चिंतांनी” देखील आत्महत्येच्या भावना उफाळू शकतात. (स्तोत्रसंहिता ९४:१९) डॉक्टर असे म्हणतात की, कधीकधी विविध जीवशास्त्रीय कारणांमुळे खिन्नतेचे विचार उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, सुरवातीला उल्लेखिलेल्या पीटरला त्याच्या आत्महत्येआधी मेंदूमध्ये रासायनिक असमतोलपणा असल्याचे निदान झाले होते. खिन्नतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यावर त्या तीव्र होऊ शकतात. आत्महत्या ही एक वैकल्पिक गोष्ट असल्याचे वाटू लागते.
मदत मिळवणे
तरीपण, आत्महत्या हा विकल्प समजला जाऊ नये. आम्हाला याची जाणीव असो वा नसो तरी, आपणा सर्वांना, ॲलन एल. बर्मन आणि डेवीड ए. जोब्स् म्हणतात त्याप्रमाणे, ‘दबाव व विरोध यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आंतरिक व बाह्य तरणोपाय आहेत.’ कुटुंब व मित्र हा एक तरणोपाय असू शकतो. नीतीसूत्रे १२:२५ म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.” होय, समजूतदार व्यक्तीच्या एका चांगल्या शब्दामुळे सगळी परिस्थितीच बदलू शकते!
यास्तव, कोणी खिन्न किंवा चिंतातुर असेल तर, त्याने एकट्याने ते सर्व सहन करू नये हे इष्ट आहे. (नीतीसूत्रे १८:१) सहन करणाऱ्या व्यक्तीने, तो भरवसा ठेवू शकेल अशा व्यक्तीजवळ त्याचे मन मोकळे करावे. कोणाशी बोलल्याने एखाद्याच्या भावनांची तीव्रता कमी होण्यात मदत होते. त्यामुळे एखाद्याला समस्यांबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल. कोणाला मित्र गमावल्याचे किंवा प्रिय व्यक्तीच्या मृत्युमुळे खूप दुःख झाले असेल तर, त्याने त्याबद्दल एका भरवशाच्या व्यक्तीसोबत बोलणी करावी. अशा गमावलेल्या गोष्टींना मान्य करून त्यावर दुःख व्यक्त केले गेले तर, एखाद्या व्यक्तीला सांत्वन मिळते. (उपदेशक ७:१-३) आत्महत्येची तीव्र इच्छा परत उद्भवल्यास भरवस्याच्या व्यक्तीला निश्चित भेटल्याने मदत मिळू शकते.
हे खरे की, कोणावरही भरवसा ठेवणे कठीण आहे. परंतु जर जीवनच धोक्यात आहे तर, ही जोखीम उचलणे बरे नसेल का? त्याचप्रमाणे गोष्टी बोलून दाखवल्यावर स्वतःचे नुकसान करण्याची इच्छा निघून जाईल. काहीजण विचारतील, ‘परंतु कोणाशी?’ एखाद्याचे पालक देव-भिरु असतील तर, त्यांना ‘आपले चित्त देण्याचा’ प्रयत्न का करू नये? (नीतीसूत्रे २३:२६) पुष्कळ विचार करतात त्यापेक्षा ते अधिक चांगले समजू शकतील व मदत करू शकतील. डॉक्टरांकडून तपासणी करणे अशी अधिक मदतीची गरज असेल तर, ते त्यासाठी व्यवस्था करू शकतील.
ख्रिस्ती मंडळीतील सदस्य, मदतीचा आणखी एक स्रोत आहे. मंडळीतील आध्यात्मिकरित्या वडिलधारी माणसे, दुःखित जणांना मदत व आधार देऊ शकतात. (यशया ३२:१, २; याकोब ५:१४, १५) सुनीताला तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर एका पूर्ण-वेळेच्या सुवार्तिकाकडून (पायनियर) मदत मिळाली. सुनीता म्हणते: “तिने मला सर्वात चांगली साथ दिली. तिने ते केले नसते तर, मला खरोखरीच वेड लागले असते.”
सामना करणे
आंतरिक तरणोपायांवर देखील विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, काही चुकीच्या कामामुळे दोषीपणाची भावना सहन करावी लागते का? (पडताळा स्तोत्रसंहिता ३१:१०.) अशा भावनांना निर्माण होऊ देण्याऐवजी, एखाद्याने त्यात सुधारणा करण्यासाठी कार्य केले पाहिजे. (यशया १:१८; पडताळा २ करिंथकर ७:११.) एखाद्याच्या पालकांसमोर चूक कबूल करणे हे एक सकारात्मक पाऊल असेल. हे खरे की, सुरवातीला ते अस्वस्थ होतील. परंतु ते मदत देण्यावर अधिक जोर देतील. आम्हाला ही देखील खात्री आहे की, खरोखरीच पश्चात्तापदग्ध असणाऱ्यांना ‘यहोवा भरपूर क्षमा करितो.’ (यशया ५५:७) येशूचे खंडणी यज्ञार्पण पश्चात्तापदग्ध जणांची पापे झाकून टाकते.—रोमकर ३:२३, २४.
ख्रिश्चनांना मदत मिळवण्यासाठी विश्वास, शास्त्रवचनांचे ज्ञान व यहोवा देवासोबतचा त्यांचा नातेसंबंध देखील आहे. अनेक प्रसंगी स्तोत्रकर्ता दावीद इतका दुःखी होता की त्याने म्हटले: ‘वैऱ्याने . . . माझे जीवन धुळीस मिळवले आहे.’ तो निराश झाला नाही. त्याने लिहिले: “मी आपल्या वाणीने परमेश्वराला [यहोवा, NW] आरोळी मारितो; आपल्या वाणीने परमेश्वराची [यहोवा, NW] विनवणी करितो.” “मी . . . तुझ्या कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हाताच्या कृतीने चिंतन करितो.”—स्तोत्रसंहिता १४२:१; १४३:३-५.
स्वतःचे नुकसान करण्याची इच्छा तीव्र झाली तर, एखाद्याने यहोवाला प्रार्थना करावी. त्याला दुःखाची जाणीव आहे तसेच, सहन करणाऱ्याने जगावे अशी त्याची इच्छा आहे! (स्तोत्रसंहिता ५६:८) दुःखाला तोंड देण्यासाठी तो “सामर्थ्याची पराकोटी” पुरवू शकतो. (२ करिंथकर ४:७) स्वतःहून ओढवून घेतलेल्या मृत्यूमुळे एखाद्याच्या कुटुंबाला, मित्रांना व स्वतः यहोवाला त्याचे किती दुःख होईल याबद्दल देखील एखाद्याने विचार केला पाहिजे. अशा गोष्टींवर विचार केल्यामुळे त्या व्यक्तीला जिवंत राहण्यास मदत मिळेल.
काहींना असे वाटू शकेल की, ते दुःख कधीच संपणार नाही. परंतु त्यांना यामुळे खात्री मिळेल की, पुष्कळांनी त्याचप्रकारचे दुःख अनुभवले आहे. ते अनुभवावरून हे सांगू शकतात की, परिस्थिती बदलू शकते व बदलते. अशा दुःखदायक परिस्थितीतून पार होण्यासाठी इतरजण मदत देऊ शकतात. खिन्न झालेल्यांनी त्यांना योग्य ती आवश्यक मदत घ्यावी—व जिवंत राहावे! (g94 4/8)
[तळटीपा]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.
[१८ पानांवरील चित्र]
एखाद्यासोबत दुःखदायक भावनांबद्दल बोलणे चांगले आहे