वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ७/८ पृ. ३
  • आहार चिंतेचा प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आहार चिंतेचा प्रश्‍न
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • स्वास्थ्यकारी आहार निवडणे
    सावध राहा!—१९९७
  • लठ्ठपणा अपायकारक ठरतो तेव्हा
    सावध राहा!—१९९७
  • आईस्क्रिमचा इतिहास
    सावध राहा!—१९९४
सावध राहा!—१९९७
g97 ७/८ पृ. ३

आहार चिंतेचा प्रश्‍न

“उपदेशक ९:७ येथे बायबल म्हणते, “जा, तू आनंदाने आपली भाकर खा.” अर्थात, खाणे ही केवळ आवश्‍यकता नसून जीवनातली एक सुखकारक गोष्टही आहे.

चौतीस वर्षांच्या थॉमसचा जरा विचार करा. मटण म्हणजे त्याचा जीव-की-प्राण. दररोज त्याला मटण लागते—दिवसातून पुष्कळवेळा लागते असेच म्हणा ना. त्याचा अगदी ठरलेला नाष्टा म्हणजे दूध, भरपूर अंडी, बटरचा थर असलेला ब्रेड किंवा टोस्ट आणि सॉसेज किंवा बेकन. फास्ट-फूड्‌समध्ये त्याची चीझबर्गर्स, फ्रेंच फ्राईस आणि मिल्क शेकची ऑर्डर ठरलेली. हॉटेलात गेल्यावर, बीफस्टेक हमखास घेणारच. त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये, अगदी त्याच्याच पसंतीनुसार ६८० ग्रॅमचे स्टेक, एक भाजलेला बटाटा आणि त्यावर दही सर्व्ह केले जाते. शिवाय, चॉकलेट केकवर चॉकलेट आइस्क्रीम हा त्याचा मनपसंत गोडपदार्थ.

थॉमस १७८ सेंटीमीटर उंच असून त्याचे वजन ८९ किलो आहे; १९९५ अमेरिकन सरकारच्या आहारसंहितेनुसार त्याचे वजन ९ किलो जास्त आहे. “मला माझ्या प्रकृतीची मुळीच काळजी नाही,” असे थॉमस म्हणतो. “माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. गेल्या १२ वर्षांत मी कामाला गेलो नाही असं एकदाही झालं नाहीय. मला बहुधा थकल्या-भागल्यासारखं वाटत नाही—फक्‍त, ६८० ग्रॅमचे स्टेक खाल्ल्यावर मात्र वाटतं.”

पण थॉमसच्या या आहारामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन हळूहळू त्याला हृदयविकाराच्या झटक्याचा धोका संभावत आहे का? आपण कसे मरतो (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. शर्वन न्यूलंड ‘आत्मघातक जीवनपद्धतींविषयी सांगतात’ आणि त्यात ‘रेड मीट, बेकनच्या मोठमोठाल्या चकत्या आणि बटर’ या आहाराचाही समावेश करतात.

विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे पुष्कळांना हृदयविकाराचा झटका का संभावतो? या खाद्यपदार्थांमध्ये हानीकारक असे काय आहे? या प्रश्‍नांवर चर्चा करण्याआधी स्थूलपणामुळे आरोग्याला कोणते धोके आहेत त्याचे आधी परीक्षण करू या.

[३ पानांवरील चित्र]

असला हा आहार चिंतेचा प्रश्‍न का आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा