मला बदलावेसे न वाटणारे आयुष्य
पुष्कळ लोकांना, त्यांनी त्यांचे जीवन ज्याप्रकारे व्यतीत केले त्याचा पश्चात्ताप होतो. ते असे म्हणू शकतील: ‘मी पुन्हा नव्याने जीवन जगण्यास सुरवात करू शकलो असतो तर, किती तरी गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या!’ परंतु, माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास ते इतके सोपे नव्हते तरी, ते असे जीवन होते जे मला बदलावेसे वाटणार नाही.
माझ्या पालकांनी मला यहोवाची साक्षीदार या नात्याने लहानापासून मोठे केले. माझ्या हृदयात बाळपणापासून देवाचे नियम रुजवले होते. (२ तीमथ्य ३:१५) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना व अधिवेशनांना मी कधी गेले नाही, अशी एकही वेळ मला आठवत नाही. तरुण मुलगी असून देखील, देव राज्याखालील नंदनवनमय पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाच्या पवित्र शास्त्रीय आशेबद्दल लोकांना शिकवण्यात मदत करण्यास भेटी देण्यासाठी मी वृद्ध साक्षीदारांसोबत जात होते. (मत्तय २४:१४) पाच वर्षाची असताना, इतरांना देवाचे राज्य, जगाची आशा (इंग्रजी) ही पुस्तिका दिल्याचे मला अजूनही आठवते.
माझ्या पालकांनी १९१७ मध्ये सर्वात प्रथम देव राज्याबद्दलचे सत्य ऐकले. चर्चला जाणारे असले तरी, ब्रीजटन, न्यू जर्सी, अमेरिका येथे वॉचटावर संस्थेच्या एका प्रवासी प्रतिनिधीने दिलेल्या भाषणाद्वारे त्यांनी सत्याचा गजर ओळखला. माझ्या आजोबांनी तेच भाषण ऐकले. त्यांनी जे ऐकले तेच सत्य आहे याची खात्री त्यांना देखील पटली. नंतर, १४ वर्षांची असताना, डेट्रॉईट, मिशिगन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात, मी यहोवाला माझे जीवन समर्पित केले आहे ते चिन्हांकित करण्यासाठी बाप्तिस्मा घेतला.
त्या काळी पवित्र शास्त्र अभ्यासासाठी आमच्या साप्ताहिक सभा आमच्या बैठकीच्या दालनात भरवल्या जात होत्या. कालांतराने एक दुकान विकत घेऊन त्याचे राज्य सभागृहात परिवर्तन केले गेले. त्यावेळी फारच कमी राज्य सभागृहे होती. परंतु आज, जगभरात, अशा हजारो सभागृहांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या ७०,००० मंडळ्या आहेत.
पूर्ण-वेळेची सेवा सुरवात करणे
माझ्या आईने १९३९ मध्ये पूर्ण-वेळेची सेवक या नात्याने तिचे जीवनध्येय सुरू केले, व मरेपर्यंत म्हणजे वयाच्या ८५ वर्षापर्यंत तिने तेच केले. माझा भाऊ, डिक व मी, आम्ही पूर्ण-वेळेचे आमचे जीवनध्येय एप्रिल १, १९४१ पासून सुरु केले. तेव्हा, दुसरे महायुद्ध युरोपमध्ये सुरू झाले होते. राजकीय बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेमुळे त्यांच्याविरुद्ध सर्वत्र विरोध फैलावलेला होता.
आमच्या मंडळीतील तीन तरुण साक्षीदार पुरुषांना त्यांच्या तटस्थतेमुळे पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. त्यातील दोघांना अजूनही मंडळीत वडील या नात्याने सेवा करीत असलेले पाहणे किती उत्तेजनदायक आहे! माझ्याने भावाने नंतर, यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क येथील जागतिक मुख्यालयाच्या ब्रुकलिन बेथेल येथे सेवा केली. तसेच तो अजूनही मिलवील, न्यू जर्सी या आमच्या गावी वडील या नात्याने सेवा करत आहे.
त्या युद्धकाळात इतरत्र होते तसेच अमेरिकेमध्ये देखील यहोवाच्या साक्षीदारांसाठी फारच कठीण होते. गर्दी करून हल्ला करणे ही सर्वसामान्य गोष्ट होती. मुलांना शाळेतून काढून टाकले होते. (लील्यन गोबीटस क्लोज यांच्या जीवनावरील जुलै २२, १९९३ चे अवेक! पाहा.) आमच्या आध्यात्मिक बांधवांपैकी हजारोजण तुरुंगात गेले, त्यामुळे आम्हा स्त्रियांना मंडळीतील विविध गोष्टी हाताळाव्या लागत होत्या. यासाठीच, मी लहान वयातच साहित्य सेवक बनले. यहोवाच्या मदतीने आम्ही त्या कठीण युद्धकाळातून बचावलो. तुरुंगातून बांधव परतल्यावर सर्व बाबतीत प्रगती होऊ लागली.
याच वेळी बेथेलमधील लीमॅन स्वींगल यांनी आमच्या मंडळीला भेट दिली. त्यांनी मला ब्रुकलिनला येऊन, दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील आमच्या सहसाक्षीदारांसाठी केल्या जात असलेल्या मदतीच्या कामात साहाय्य करण्यासाठी उत्तेजन दिले. त्यासाठी, मार्च १९४८ मध्ये मी ब्रुकलिन येथे गेले.
नवीन मंडळीतील आनंदी वर्षे
मला ब्रुकलिन सेंटर या नवीन मंडळीत नेमणूक देण्यात आली. पहिल्या महायुद्धाआधी, न्यूयॉर्क शहरात व आजूबाजूच्या भागांमध्ये ती सर्वात पहिली मंडळी होती. परंतु, तिचे वेगळे नाव होते. त्यावेळी ती ब्रुकलिन हाईट्सच्या भागात स्थापिलेली होती. परंतु, मी १९४८ मध्ये ब्रुकलिन सेंटर येथे आले तेव्हा ती ब्रुकलिनमध्ये पाचव्या मार्गावर व आठव्या गल्लीत होती. येथून थोड्या अंतरावर, नवीन सभागृह घेईपर्यंत, जवळजवळ ३० वर्षांसाठी ती भाड्याने घेतलेली जागाच आमच्या सभेचे ठिकाण होते.
ब्रुकलिन मध्ये, हेन्री स्ट्रीटवरील प्रचार कार्यातील माझा पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. लहान गावात साक्षकार्य करण्यापेक्षा ते फारच वेगळे होते. परंतु लवकरच मला एक तरुण गृहिणी भेटली जिने पवित्र शास्त्रीय साहित्य स्वीकारले व ती गृह पवित्र शास्त्राभ्यासासाठी तयार झाली. कालांतराने, ती व तिची दोन्ही मुले यहोवाचे समर्पित सेवक बनले. तिचा मुलगा, ऑर्थर आयनोनी सध्या ब्रुकलिन बेथेल येथे त्याच्या पत्नीसोबत व मुलगा आणि सुनेसोबत सेवा करीत आहे.
आम्ही प्रचार केले त्या मंडळीचे क्षेत्र मोठे व फलदायी होते. यहोवाच्या मदतीने, माझ्या पुष्कळ पवित्र शास्त्रीय विद्यार्थ्यांना सत्य शिकून बाप्तिस्मा घेताना मी पाहू शकले. आजपर्यंत, या देशात काहीजण पूर्ण-वेळेचे सेवक या नात्याने सेवा करीत आहेत. इतरजण दूरदूरच्या देशात मिशनरी आहेत. काहीजण मंडळीत वडील बनले. देव राज्याच्या सुवार्तेचे विश्वासू घोषक या नात्याने पुष्कळांनी इतर क्षेत्रांमध्ये सेवा केली आहे.
ही वाढ अती आश्चर्यकारक होती. न्यूयॉर्क शहर व आजूबाजूच्या भागांसाठी जेथे एकच मंडळी होती तेथे, आता न्यूयॉर्क शहरातच जवळजवळ ४०० मंडळ्या आहेत. यातील काही विस्तारांमध्ये सहभाग घेतलेल्याच्या किती सुंदर आठवणी माझ्याजवळ आहेत!
फ्रेंच भाषिकांची आस्था बहरते
मंडळीच्या क्षेत्रात, १९६० च्या दशकात, हायतीमधून आलेले पुष्कळ फ्रेंच बोलणारे लोक आम्हाला भेटू लागले. पुष्कळजण फारच कमी इंग्रजी बोलत होते किंवा मुळीच बोलत नव्हते. येथे एक आव्हान होते. पवित्र शास्त्राबद्दल त्यांना अधिक शिकण्यास आम्ही त्यांची मदत कशी करू शकत होतो? मी फ्रेंच बोलत नव्हते. परंतु, त्या काळातील सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते या मूळ पवित्र शास्त्रीय पाठ्यपुस्तकाची इंग्रजी प्रत एका हातात व फ्रेंचमधील सत्य पुस्तक दुसऱ्या हातात घेऊन मी पवित्र शास्त्राभ्यास चालवू शकले.
तथापि, या लोकांना आध्यात्मिकतेत वाढण्यासाठी मदत करण्यास फ्रेंचमध्ये कोणत्याही सभा नव्हत्या. यास्तव, ब्रुकलिन येथे भेटणाऱ्या कोणत्याही मिशनरीला फ्रेंच बोलता येत असले तर, त्यास लगेचच मदत देण्यासाठी सांगितले जात असे. नीकोलॉ ब्रीसार यांनी सर्वात प्रथम आमची मदत केली. ग्वॉडेलोप येथील शाखा समितीचे ते संयोजक आहेत. त्यांनी, बहीण बर्था ल्वीडोन यांच्या घरी फ्रेंचमध्ये सर्वात प्रथम भाषण दिले. ती अजूनही विश्वासूपणाने यहोवाची सेवा करत आहे. सत्तावीस व्यक्ती तेव्हा उपस्थित होत्या.
तरीपण, त्यावेळी न्यूयॉर्क शहरात स्पॅनीश शिवाय इतर कोणत्याही परकीय भाषेच्या मंडळ्या नव्हत्या. त्यासाठी, फ्रेंच बोलणाऱ्या मंडळीची अधिकृतपणे स्थापना करण्याची कल्पना करणे देखील कठीण होते. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी आम्हाला सांगितले की, त्यावेळचे धोरण या देशातील लोकांना इंग्रजी शिकण्यास उत्तेजन देण्याचे होते. खरे म्हणजे त्यामुळे, आणखीनच हिरमोड झाला.
बंधू फ्रेड डब्ल्यू. फ्रान्ज हे उत्तेजनाचा उगम ठरले. ते नंतर वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष बनले. ते म्हणाले: “मेरी, यहोवाची इच्छा असली तर, फ्रेंच मंडळी नक्की होईल.” ब्रुकलिन सेंटरच्या मंडळीचे अध्यक्षीय पर्यवेक्षक, बंधू हॅरी पेलोयननी देखील उत्तेजन दिले. ते म्हणाले की, राज्य सभागृह वापरले जात नाही त्या सायंकाळी आम्ही अनौपचारिक रितीने मंडळीचा पुस्तक अभ्यास घेऊ शकतो. त्याचप्रमाणे, फ्रेंच बोलणारे असे कोणी भेट देण्यासाठी आले तर, जाहीर भाषणे देखील होऊ शकतात.
आतापर्यंत, हायतीमधून आलेले पुष्कळ बाप्तिस्मा प्राप्त बंधू आमच्यासोबत होते. परंतु, फ्रेंच भाषेत संघटनात्मक पुढाकार घेण्याइतके कोणीच अनुभवी नव्हते. मग, पॅरीसमध्ये प्रापंचिक शाळा पूर्ण केलेले व आता ब्रुकलिन बेथेल कुटुंबाचे सदस्य असणारे बंधू तीमथ्यी गलफस यांना आमच्या परिस्थितीबद्दल कळाले. प्रत्येक शनिवारी, बेथेलमध्ये काम केल्यावर ते आम्हाकडे येत असत. आम्ही, येथे राहात असलेल्या परंतु कोठे एकत्रित व्हावयाचे ते माहीत नसलेल्या, हायतीयन बंधू व बहिणींना शोधून काढत होतो.
लवकरच आम्हासोबत ४० व्यक्ती संघटित झाल्या. संस्थेने आम्हास अधिकृतपणे मंडळीचा पुस्तक अभ्यास फ्रेंच भाषेत घेण्यास अनुमती द्यावी याकरता, आम्ही विभागीय पर्यवेक्षकांना संस्थेला लिहिण्यास सांगितले. याला मान्यता मिळाली तेव्हा आम्ही किती आनंदित झालो! नंतर, नियमित जाहीर भाषणे आणि साप्ताहिक टेहळणी बुरुज अभ्यास घेण्यासाठी देखील आम्हाला परवानगी मिळाली.
पहिली फ्रेंच मंडळी
डिसेंबर १, १९६७ मध्ये आम्हाला फ्रेंच भाषेची मंडळी प्रस्थापित करण्यासाठी मान्यता मिळाली. ती अमेरिकेतील सर्वात प्रथम मंडळी होती. ब्रुकलिन सेंटर आणि प्रॉस्पेक्ट मंडळ्यांसोबत ती सभागृहाची सहभागिता करणार होती. आम्ही अगदी खुश झालो! आम्हाला माहीत होते की, सर्वांना समजण्याजोग्या भाषेत ते अधिक आध्यात्मिक प्रगती करतील. त्या सर्व वाढत्या कष्टाच्या काळात, हॅरी पेलोयन, जॉर्ज हदाद आणि कॉरलोस क्वील्स् सारख्या बंधुंच्या पाठिंब्याची खूप प्रशंसा केली गेली. त्यांची मिळून ब्रुकलिन सेवा समिती तयार झाली.
आमची फार लवकर वृद्धी झाली. लवकरच, न्यूयॉर्कमध्ये, मनहत्तन, क्वीन्स् व न्याक येथे फ्रेंच मंडळ्या प्रस्थापित झाल्या. या विस्तारामध्ये मदत देणारे ब्रुकलिन बेथेलचे जेफ केल्ट्स व टॉम सेसील हे होते. बंधू केल्ट्स यांनी विभागीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा केली व बंधू सेसील यांनी आमच्या प्रांतीय अधिवेशन समितीमध्ये सेवा केली आहे. इतर देशातून अमेरिकेला आरोग्याच्या समस्यांमुळे आलेल्या मिशनऱ्यांनी देखील मदत दिली. ते फ्रेंच बोलणाऱ्या देशातून आले होते. त्यांची मदत किती मौल्यवान ठरली! त्यांच्यापैकी स्टॅन्ली बोगस हे आहेत. ते अध्यक्षीय पर्यवेक्षक व पर्यायी विभागीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा करतात.
पाचव्या मार्गावरील व ८ व्या गल्लीतील तो लहानसा फ्रेंच गट वाढून त्याच्या डझनभर मंडळ्या व दोन विभाग झालेले पाहण्यास ती किती आनंददायक वेळ होती. वास्तविकतेत, एप्रिल १९७० मध्ये फ्रेंचमधील आमचे पहिले विभागीय संमेलन होते. वॉचटावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष, बंधू नेथन एच. नॉर यांनी शुक्रवारी रात्री आमच्यासाठी भाषण दिले आणि शुभेच्छा दिल्या. त्या उन्हाळ्यात, न्यू जर्सी येथे जर्सी शहरातील रुसवेल्ट स्टेडियमच्या छप्पर नसलेल्या जागेत आमचे पहिले प्रांतीय अधिवेशन देखील भरवण्यात आले. तेव्हा फारच उकाडा व धुळकट होते. परंतु, २०० पेक्षा अधिक उपस्थितांना संपूर्ण कार्यक्रम शिवाय नाटक फ्रेंचमध्ये ऐकण्यास आनंद वाटला.
आम्हाला आमच्या प्रांतीय अधिवेशनासाठी, जर्सी शहरातील यहोवाच्या साक्षीदारांचे संमेलन सभागृह वापरण्यास १९८६ मध्ये अनुमती दिली गेली तेव्हा देखील तो आनंदाचा काळ होता. मागच्या वर्षी एका फ्रेंच अधिवेशनासाठी ४,५०६ जण उपस्थित होते व १०१ जणांचा बाप्तिस्मा झाला. त्याचवेळी, फ्लोरिडा येथे आणखी एक फ्रेंच अधिवेशन भरवण्यात आले.
माझ्या खोलीतील विश्वासू सोबती
पूर्ण-वेळ सेवेत असणाऱ्या इतर बहिणींसोबत ब्रुकलिनमध्ये एकाच फ्लॅटमध्ये राहणे हा देखील माझ्या जीवनातील आनंदी भाग होता. पहिल्या दोघी (रोझ लूईस पेलोयन आणि मॅडलन मरडक वाईल्डमन) बेथेलला गेल्या. नंतर आणखी दोघी (लाईला रॉजर्स मॉलहन व मॉरग्रेट स्टेलमा) या देखील बेथेल कुटुंबाच्या सदस्य झाल्या. आणखी दोघी (बॉरब्रा रपासकी फोर्ब्स व वर्जीनिया बेल्ट्रामेली) वॉचटावरच्या गिलीयड पवित्र शास्त्र प्रशालेसाठी गेल्या व अजूनही त्या प्रत्येकी ग्वातेमाला व उरुग्वे येथे सेवा करीत आहेत.
आमच्या दिवसाची सुरवात करण्यासाठी आम्ही बहिणी नेहमी एका शास्त्रवचनावर चर्चा करण्यास वेळ काढत होतो. त्यानंतर, आम्ही आमच्या कामावर व सेवाकार्यात जात होतो. रात्री परतल्यावर आम्ही थकलेले व भुकेलेले, परंतु आनंदित होतो! आमच्याकडे सांगण्यासाठी असे पुष्कळ उभारणीकारक अनुभव होते! उदाहरणार्थ, एके प्रसंगी मी एलीजा बोमॉन फरीना या तरुण स्त्रीसोबत अभ्यास करीत होते. तिने तिचा अभ्यास रात्रीच्या १०.०० वाजता घेतला जावा अशी विनंती केली. तिने जलद प्रगती केली. मी पहिल्या वेळेस तिला सेवाकार्यात नेले तेव्हा ती म्हणाली: “मी हे नेहमीच करीन असा विचार करू नकोस!” परंतु ती एक पूर्ण-वेळेची सेविका बनली. ती नंतर गिलीयड प्रशालेसाठी उपस्थित राहिली. तिने पुष्कळ वर्षांसाठी युकेडोरमध्ये सेवा केली. ती आता देखील ट्रेन्टन, न्यू जर्सी येथे पूर्ण-वेळेच्या सेवेत आहे.
माझ्या फ्लॅटमधील काही सोबत्यांची मुले देखील आहेत, व ती सुद्धा यहोवाची गुणग्राहकता बाळगतात व त्याची सेवा करत आहेत. मागील वर्षी, माझ्या खोलीतील आधीच्या सोबतीणीच्या (वर्जीनिया हेंडी रॉबर्टसन) मुलीचे (जोडी रॉबर्टसन सॉकीमा) लग्न झाले. ती सध्या तिच्या पतीसोबत ब्रुकलिन बेथेल येथे सेवा करीत आहे.
माझे २० पेक्षा अधिक खोलीतील सोबती होते. त्या सर्वांबद्दल मला हे सांगण्यास आनंद होतो की, त्या सर्व यहोवाला विश्वासू राहिल्या व त्यांच्यातील पुष्कळ जणी अजूनही पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत.
आमच्या जागतिक कुटुंबाचा आनंद लुटणे
इतर देशातील पुष्कळ साक्षीदारांशी परिचित झाल्यामुळे देखील मला आनंद मिळाला. उदाहरणार्थ, आम्ही संस्थेच्या मुख्यालयाजवळच राहात असल्यामुळे, त्यावेळेस ब्रुकलिन बेथेल येथे असणाऱ्या गिलीयड मिशनरी प्रशालेसाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी सहवास ठेवण्याची आम्हाला सुसंधी होती.
सध्या ऑस्ट्रिया शाखेत सेवा करत असलेल्या गुंटर बुशबेक व जर्मनी शाखेत सेवा करणाऱ्या विली कोनस्टॉन्टी या विद्यार्थ्यांना गिलीयडला उपस्थित राहात असताना, ब्रुकलिन सेंटर मंडळीसाठी नेमले होते. ते उत्तेजनाचा किती मोठा उगम होते! माझ्या खोलीतील सोबत्यांवर त्यांचा इतका सकारात्मक प्रभाव पडला की त्या देखील गिलीयड सेवेबद्दल विचार करू लागल्या.
पुष्कळ वेळा, दूरदेशांना प्रवास केल्यामुळे, आपल्या जागतिक कुटुंबासोबत मैत्री वाढवण्याची सुसंधी मला प्राप्त झाली आहे. मी आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना उपस्थित राहिले आहे. मला आधी परिचित असणाऱ्या पुष्कळ गिलीयड प्रशिक्षितांना मी पुन्हा त्यांच्या नेमणूकींमध्ये पाहिले आहे.
एक पूर्ण जीवन
माझ्या जीवनाकडे मी मागे वळून पाहिले तर, ते अगदी सुंदर—पूर्ण आशीर्वादांनी भरलेले आनंदी जीवन होते असे मी म्हणू शकते. या व्यवस्थीकरणातील सामान्य समस्या मला होत्या. परंतु, माझ्या भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करण्यास किंवा पूर्ण-वेळेच्या सेवेची बुहूमूल्य सुसंधी सोडून देण्यास कोणतीच गोष्ट कारणीभूत ठरली नाही.
लहान वयातच, माझ्या आईने स्तोत्रसंहिता १२६:५, ६ चे हे शब्द माझ्यात बिंबवले: “जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करितात ते हर्षाने कापणी करितील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” ते वचन अजूनही माझ्यासाठी एक मार्गदर्शक आहे. माझ्या समस्या कोणत्याही असल्या तरी, यहोवाने त्यांच्यावर मात करण्यात मार्ग दाखवण्यास व तो आनंद टिकवून ठेवण्यास मदत दिली आहे.
माझे जीवन हे असे आहे जे मला नक्कीच बदलावेसे वाटणार नाही. यहोवासाठी पूर्ण-वेळेच्या सेवेत ५३ वर्षे घालवून मला बिलकुल पश्चात्ताप होत नाही. त्याच्या नवीन जगात अनंतकालापर्यंत त्याची सेवा करण्यासाठी मी वाट पाहत आहे.—मेरी केंडॉलने निवेदित केल्याप्रमाणे. (g94 4/8)
[२३ पानांवरील चित्र]
मेरी केंडॉल