वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-4 पृ. २८
  • जादूटोणा करण्यात धोका आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जादूटोणा करण्यात धोका आहे का?
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जादूचा संपूर्ण इतिहासभर प्रभाव
  • तीन प्रकारांची जादू
  • ख्रिश्‍चनांसाठी धोका आहे का?
  • जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • सुखी कुटुंबामुळे लोक खऱ्‍या देवाकडे आकर्षित होतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • पवित्र शास्त्र सत्य भूतविद्येपासून मुक्‍तता देते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
gbr13-4 पृ. २८

पवित्र शास्त्रीय दृष्टिकोन

जादूटोणा करण्यात धोका आहे का?

‘सगळे वातावरण जादुई कल्पनेने भरले होते. अचानक, ढोलाचा आवाज शांततेचा भंग करतो. सर्वांचे डोळे, दोन पुरुष ज्यांनी सारखा पेहराव घातला होता व ज्यांच्या हातात चापाच्या बंदुकी होत्या त्यांच्यावर खिळून राहिले. त्यांच्या बंदुकी खांद्यावर ठेवून, ते पुरुष, भपकेबाज पोषाख केलेल्या एका चिनी जादूगारावर नेम धरतात. तो त्याच्या छातीसमोर चिनी मातीची एक थाळी धरतो. थोड्याच वेळात बंदुकीतून गोळीबार होतो. ताबडतोब तो जादूगार, रक्‍तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळतो. थाळी त्या गोळ्यांना थोपवून धरेल या भ्रमाचा शोकांतिकेत बदल होतो.’ दोन्हींतील एका बंदुकीच्या यांत्रिक सदोषामुळे गोळ्या सुटल्या व जादूगाराच्या छातीत घुसल्या. असे हेन्री गॉर्डनस्‌ वर्ल्ड ऑफ मॅजिक हे पुस्तक कथन करते.

अशा प्रकारच्या जादूमध्ये, पुढे काय होणार याबद्दलच्या अनिश्‍चिततेमुळे वाटणाऱ्‍या आतुरतेसाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठीच केवळ जीवनाच्या देणगीला किती वाया घालवले जाते. तुमची देखील याच प्रकारची प्रतिक्रिया आहे का? किंवा असा खेळ प्रदर्शित करताना तो केवळ धोक्याचा एक भाग आहे असे तुम्हाला वाटते? तुमची प्रतिक्रिया काहीही असली तरी, हा भ्रम निष्फळ ठरला तेव्हा तो अतिशय धोकादायक होता. ते आम्हाला असे विचारण्यास प्रवृत्त करते की: जादूटोणा यासोबत युक्‍तीबाज धोका आहे का? याच्या उत्तरासाठी, आपण ह्‍या प्राचीन कलेच्या मुळांकडे वळू या.

जादूचा संपूर्ण इतिहासभर प्रभाव

इतिहासाच्या आरंभापासून, जादूच्या गुढार्थामुळे मानवामध्ये कुतूहल निर्माण झाले आहे व त्याच्यावर छाप बसवली गेली. “जादू” [मॅजिक] हा शब्द, धार्मिक पूजा पद्धतींमध्ये तज्ज्ञ असणाऱ्‍या प्राचीन पर्शियन याजकीय जातीच्या “मॅजी,” या शब्दापासून निघतो. त्याच्या मूळ अर्थामध्ये, जादू म्हणजे, मानवाची सेवा करण्यासाठी नैसर्गिक किंवा अद्‌भुत शक्‍तींवर ताबा किंवा काही करण्यास भाग पाडणे. इ.स.पूर्व १८व्या शतकाच्या इजिप्त (मिसर) राष्ट्राने जादू करणाऱ्‍या याजकांचा उपयोग केला. इ.स.पूर्व आठव्या शतकातील प्राचीन बॅबिलोनिया (बाबेल) मधील खाल्डियाच्या (खास्दी) धर्मश्रद्धेत देखील जादूचा मुख्य भाग होता. (उत्पत्ती ४१:८, २४; यशया ४७:१२-१४; दानीएल २:२७; ४:७) याचा प्रभाव प्राचीन ग्रीक आणि रोम्यांपासून मध्य युगापर्यंत आणि थेट आमच्या २० व्या शतकापर्यंत प्रचलित झाला आहे.

जादूच्या विविध प्रकारांचे अनेक मार्गात वर्गीकरण करता येते. रॉबर्ट ए. स्टेबिन्स्‌ त्यांच्या द मॅजिशियन ह्‍या पुस्तकात जादूची तीन गटात वर्गवारी करतात.

तीन प्रकारांची जादू

गूढार्थ जादू “गहन गोष्टींची अभिव्यक्‍ती” आहे. ती असा दावा करते की “ज्या घटना किंवा पद्धती व्यावहारिक ज्ञान किंवा वैज्ञानिक ज्ञानाच्या विरूद्ध आहेत” त्या “सत्य आणि अर्थपूर्ण” आहेत. स्टेबिन्स्‌ पुढे असे विवरण देतात की “जादूटोणा . . . चेटूक, तीन-चारशे वर्षांपूर्वीचे रसायन शास्त्र (ॲल्कमी) आणि काही विशिष्ट परिस्थितींमध्ये धर्म यासर्व गोष्टी गूढार्थ जादूला साहाय्य देणाऱ्‍या आहेत.”

जाहीरपणे दाखविण्यात येणारी जादू, “यात जादूगार त्यांच्या स्वतःच्या वाढीसाठी पाहणाऱ्‍यांच्या वास्तविकतेच्या आकलनाचा अयोग्य फायदा घेतात किंवा त्यांच्यावर छाप पाडतात.” त्यांना माहीत आहे की ते लोकांना फसवत आहेत, परंतु स्टेबिन्स्‌नुसार, “प्रत्यक्षात जादू पाहणाऱ्‍या लोकांना तसा विश्‍वास करण्यास ते उत्तेजन देतात किंवा असा विश्‍वास करण्यास भाग पाडतात की जादूगार या नात्याने, त्यांच्याकडे अलौकिक शक्‍ती आहे किंवा ज्यांच्याकडे अशी अलौकिक शक्‍ती आहे अशांबरोबर त्यांचा खास संबंध आहे.”

मनोरंजक जादू, कुतूहल निर्माण करून फसवणूकीद्वारे आश्‍चर्य चेतवण्याचा प्रयत्न करते. तिचे पाच मूलभूत व एका पेक्षा एक वरचढ ठरेल अशा पद्धतींमध्ये विभाग होतात: “व्यासपीठ किंवा नाट्यगृहात दाखवण्यात येणारी जादू, थोड्याच प्रेक्षकांसमोर जादूचे प्रयोग, हस्तकौशल्य, हातचलाखीचे खेळ, व कोणत्याही साधनाशिवाय एकाच्या मनातील विचार एकदम दुसऱ्‍याच्या मनात उमटवणे.”

ख्रिश्‍चनांसाठी धोका आहे का?

पहिल्यांदा आपण गूढार्थ जादूचे परीक्षण करू या. गूढार्थ जादू अनेक मार्गांनी आवाहन करते. उदाहरणार्थ, अस्तित्वात असणारे सैतान मतवादी “काळी” कला व “पांढरी” कला, जादू आचारतात. “काळी” जादू यात, जारणमारण, मूठ मारणे, एखाद्याच्या शत्रूचे अनिष्ट साधायचे ह्‍या गोष्टी समाविष्ट आहेत. दुसऱ्‍या बाजूला पाहता, “पांढऱ्‍या” जादूचा हेतू, चांगले परिणाम आणण्यासाठी जारणमारण निष्फळ ठरविणे, व मारलेली मूठ रद्द करण्यासाठी असतो. तरीही, ह्‍या दोन्ही जादू गूढ किंवा गूढार्थ जादूच्या अभिव्यक्‍ती आहेत. प्रसंगी चांगली कापणी मिळण्यासाठी किंवा ॲथलेटिक खेळांमध्ये जिंकण्यासाठी देखील गूढार्थ जादूचा उपयोग केला जातो. तरीही, अशा प्रकारच्या भूताटकीच्या जादू संबंधाने, पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे म्हणते: “तुम्ही काहीही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.”—लेवीय १९:२६; अनुवाद १८:९-१४; प्रे. कृत्ये १९:१८, १९.

जाहीरपणे दाखविण्यात येणारी जादू यात कोठे धोका दडून बसला आहे का? थोडक्यात सांगायचे म्हणजे हस्तरेषा पाहणारे, भविष्य सांगणारे, विश्‍वासाने बरे करणारे, त्यांच्या स्वतःची उन्‍नती करून घेण्यासाठी जाहीरपणे दाखविण्यात येणाऱ्‍या जादूचा उपयोग करतात. त्यांच्या ह्‍या व्यवसायाने ते एक खोटे जीवन जगत नाहीत का? देवाचे वचन म्हणते: “एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.”—लेवीय १९:११.

द एनसायक्लोपिडीआ अमेरिकाना म्हणतो: “काही प्रसंगात, जादूचे प्रयोग आत्म्यांची सेवा करण्यास भाग पाडते.” तर मग आम्ही अशा क्षेत्राचा अप्रत्यक्षपणे अभ्यास करून आत्म्यांकडून त्रासाला आमंत्रण देऊ इच्छितो का? संधी दिल्यास, भूते आमचा फायदा घेतील व घेऊ शकतील. ते ‘संधींची’ वाट पाहतात आणि अविश्रांत प्रयत्न करतात.—लूक ४:१३; याकोब १:१४.

फसवणूकीच्या कलेचा व भ्रमाचा जनक दुसरा कोणी नसून दियाबल सैतान हा आहे. तो त्याच्या ह्‍या कलेचा पहिला प्रयोग एदेन बागेतील मनुष्यासमोर करत आला आहे. (उत्पत्ती ३:१-१९) कोणत्या ख्रिश्‍चनाला त्याच्यासारखे व्हावेसे वाटेल? उलटपक्षी, ख्रिश्‍चनांना, “देवाचे अनुकरण करणारे व्हा” व “देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा” असा सल्ला देण्यात आला आहे.—इफिसकर ५:१; याकोब ४:७.

तथापि, अनेक लोक, जादू या शब्दाचा संबंध मनोरंजनासोबत करतात. एखादी व्यक्‍ती असा विचार करेल की, डोळ्यांपेक्षा हात अधिक लवकर कार्य करतात म्हणून तो हस्तकौशल्य करत असेल. यासाठी कोणतेही शास्त्रीय बंधन नाही. तथापि, तो जर जादूचा बहाणा असेल, तर एखादी ख्रिश्‍चन व्यक्‍ती अलौकिक किंवा अवर्णनात्मक शक्‍ती बाळगतो असे भासवू इच्छिल का? किंवा जर इतरांची “जादूच्या” खेळाने चुकीची समज झाली आहे, तर एखादा ख्रिश्‍चन दुसऱ्‍याला अडखळण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या मनोरंजनाला सोडून देण्यास तयार होणार नाही का? (१ करिंथकर १०:२९, ३१-३३) यासोबतच, जादूच्या खेळांमध्ये आणखी खोलवर जाण्यासाठी एखादी व्यक्‍ती मोहित होऊन धोक्यात पडण्याची शक्यता असते.

यास्तव, जादूचा थेटपणे संबंध भूतविद्येसोबत येतो तेव्हा, खरे ख्रिश्‍चन सुज्ञपणे ती टाळतात. याही पलिकडे, एका ख्रिश्‍चनाच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत, मग त्यामध्ये काम, करमणूक, किंवा मनोरंजन गोवलेले असले तरी, देव किंवा मनुष्याविरूद्ध पाप न करणारा विवेक, एक “चांगला विवेक” बाळगण्याची त्याची इच्छा असेल.—१ पेत्र ३:१६; प्रे. कृत्ये २४:१६. (g93 9⁄8)

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Bettmann Archive

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा