वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-4 पृ. ३०
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • युरोपियन न्यायालय ग्रीक साक्षीदारांच्या वतीने निकाल देते
  • निद्रा ऋण
  • इतके वृध्द झाला नाहीत
  • स्त्री कामगारांना जेरीस आणणे
  • जपानी विद्यापीठात पवित्र शास्त्राचे वर्ग
  • एडस्‌ नियंत्रणापलिकडे आहे का?
  • आशियामध्ये बालिकांच्या वेश्‍या व्यवसायाची भरभराट
  • त्वरीत उपासना
  • जनावरांसाठी धार्मिक विधी
  • डोळ्याचा ताण कमी करणे
  • चर्चेस्‌ विक्रीसाठी
  • जॉगींगचा ताण
  • डेंग्यू—चावण्यामुळे संभवणारा ताप
    सावध राहा!—१९९८
  • एडस्‌—मला काही धोका आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • एड्‌सचा संसर्ग होण्यापासून मी स्वतःला सुरक्षित कसे ठेवू शकतो?
    सावध राहा!—१९९४
  • ध्वनी प्रदूषण तुम्ही काय करू शकता
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
gbr13-4 पृ. ३०

जगावरील दृष्टिक्षेप

युरोपियन न्यायालय ग्रीक साक्षीदारांच्या वतीने निकाल देते

मे २५, १९९३ मध्ये, स्ट्रासबर्ग फ्रान्स येथे, युरोपियन कोर्ट ऑफ ह्‍यूमन राइटस्‌ने दिलेल्या निर्णयात, यहोवाच्या साक्षीदारांनी, कायदेशीररीत्या मोठा विजय मिळवला. ह्‍या केसमध्ये ८३ वर्षांचे वृद्ध साक्षीदार, मीनोस कोकीनाकीस गोवलेले होते ज्यांच्यावर बेकायदेशीरपणे धर्मांतर करण्याचा आरोप होता. मार्च २०, १९८६, रोजी त्यांना क्रेत येथील लसिथी गुन्हेगार न्यायालयाने चार महिन्यासाठी कैदेची शिक्षा दिली. तथापि, युरोपियन कोर्टच्या निकालाने त्यांचा दोषारोप सहा न्यायधिशांविरूद्ध तिघे असा उलट फिरवला. अनेक दशकांसाठी ग्रीक सनातन मतवाद्यांच्या चर्चचा जबरदस्त प्रभाव असलेल्या ग्रीसच्या सरकारने, हजारो यहोवाच्या साक्षीदारांना बेकायदेशीर धर्मांतराच्या दोषाखाली अटक केले. ह्‍या दाव्यात युरोपियन कोर्टला असे कळून आले की ग्रीक सरकारने, युरोपियन कन्वेंशन कायद्याखाली असणाऱ्‍या श्री. कोकीनाकीसच्या हक्कांचा भंग केला होता. ग्रीसमध्ये असणारे २६,००० पेक्षा अधिक साक्षीदार अशी आशा बाळगून आहेत की हा निर्णय त्यांच्या छळाचा अंत करील व त्यांची कायदेशीर सेवा शांतीने पुढे चालवण्यासाठी अनुमती देईल. (g93 8/22)

निद्रा ऋण

“निद्रेची उणीव असलेले लोक चालू शकतात, ऐकू शकतात व इतरांप्रमाणे पाहू देखील शकतात. तथापि, संशोधन दाखवते की त्यांच्यामध्ये तर्क करण्याची क्षमता, निर्णय घेण्याचे व जागृत राहण्याचे सामर्थ्य दुर्बल होते,” असे वेझा हे मासिक म्हणते. त्या लेखाने अशा तज्ज्ञांचा संदर्भ घेतला आहे जे, आवश्‍यक असलेली झोप मिळत नसल्यामुळे होणाऱ्‍या धोक्याबद्दलचा इशारा देतात. ब्राझिलियन सोसायटी फॉर स्लिपचे अध्यक्ष डॉ. डेनिस मार्टिनेझ, यांचा याविषयावरचा अभ्यास दाखवतो की “काम करताना होणाऱ्‍या प्रत्येकी १० अपघातामध्ये, २ अपघात, रात्रीच्या वेळी आवश्‍यक ती झोप न मिळाल्यामुळे होतात.” डॉ. मार्टिनेझ, अशी ताकीद देतात की ज्यांना कमी झोप मिळते, “उदाहरणार्थ, तीन तीन ठिकाणी काम केल्यामुळे, ते केवळ त्यांच्या आरोग्याचा त्याग करतात.” (g93 8/22)

इतके वृध्द झाला नाहीत

‘शिकण्यासाठी तुम्ही इतके वृद्ध झाला नाहीत.’ ह्‍या जुन्या म्हणीचे उदाहरण देण्यासाठी, बरनॉबे एवॉनहेलिस्टॉ नावाचे, ९३ वर्षांचे आनंदी वृद्ध, त्यांचे दोन वर्षांचे विद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची वाट पाहत आहेत. वेलेनसिया, स्पेन येथील महाविद्यालयात ते कलेचा अभ्यास करत आहेत, व अभ्यासाच्या त्यांच्या चिकाटीने आधीच त्यांना त्यांच्या उल्लेखनीय विद्यालयीन साध्यतेबद्दल बक्षीस मिळवून दिले आहे. प्रत्येक दिवशी सकाळी आठ वाजता येणारे व बहुतेकवेळा रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत त्यांचा संध्याकाळचा अभ्यास न संपवणारे बरनॉबे स्पष्टपणे सांगतात की, “अभ्यास करणे ही सर्वात उत्तम अशी गोष्ट आहे.” बरनॉबे यांचा असा विश्‍वास आहे की वृद्ध लोकांना अभ्यास करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. “अभ्यास करण्यासाठी जीवनामध्ये हीच वेळ आहे,” असे ते म्हणतात. त्यांच्या पत्नी यात भर घालून म्हणतात की सक्रिय असल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक उद्देश प्राप्त होतो. (g93 8/22)

स्त्री कामगारांना जेरीस आणणे

टोरंटो, कॅनडा येथील टोरंटो हॉस्पिटलमध्ये अलिकडच्या एका अभ्यासाने प्रकट केले की तेथील ७० टक्के स्त्री कामगारांनी, काम करताना लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार केली. द टोरंटो स्टार नुसार, २ टक्के स्त्रियांवर लैंगिक हल्ला झाल्याचा, आणि १ टक्का स्त्रियांना लैंगिक समागम ठेवण्यासाठी धमकी दिल्याचा अहवाल दिला आहे. अनेक स्त्रिया म्हणतात की त्यांना अगदी “अनादरपणे किंवा अयोग्य औपचारीक पद्धतीने संबोधले गेले” व बहुसंख्याक स्त्रियांनी, त्यांच्यासोबत “अनैतिक विनोद” केल्याची तक्रार केली आहे. स्टारने असा अहवाल दिला की जवळ जवळ ६० टक्के स्त्री कामगारांना हॉस्पिटलच्या “काही भागात असुरक्षितता भासली.” (g93 9/8)

जपानी विद्यापीठात पवित्र शास्त्राचे वर्ग

जपानच्या प्रतिष्ठित वॉसेडा विद्यापीठातील साहित्याच्या डिपार्टमेंटमधील विद्यार्थांच्या अलिकडच्या तपासणीत असे दिसून आले की “पुष्कळ विद्यार्थी पुरातन वाङ्‌मयीन कार्य व विशेषकरून पवित्र शास्त्र, जे विदेशी संस्कृतींबद्दलच्या माहितीसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते त्याबद्दल आणखी शिकण्यासाठी उत्सुक होते,” असा अहवाल द डेली योमेउरीने दिला. आधीच साहित्याच्या क्षेत्रात सन्मानदर्शक पदक मिळवलेल्या त्या विद्यापीठाने, पवित्र शास्त्राचा अभ्यासक्रम घेणाऱ्‍या वर्गाची सुरवात १९९३च्या वसंत ऋतुच्या शालेय अर्धवर्षापासून केली. दोन वर्षांआधीच, प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुव्यवस्थित करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठांना अधिक स्वातंत्र्य दिल्यामुळे जपानमधील ही घटना पहिलीच आहे जेथे विद्यार्थांना, शाळेचा कार्यक्रम व्यवस्थितपणे मांडण्यात भाग घेण्यासाठी अनुमती दिली होती. (g93 9/8)

एडस्‌ नियंत्रणापलिकडे आहे का?

एडस्‌चा जगव्याप्त प्रसार नियंत्रणाबाहेर झाला आहे का? अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथील ग्लोबल एडस्‌ पॉलिसी कोआलिशनने संग्रहीत केलेला १००० पानी अहवाल म्हणतो की कदाचित तसे होऊ शकते. द गार्डियन विकलीनुसार, अहवाल असे दर्शवतो की कोणतेही राष्ट्र एडस्‌च्या प्रसाराला थांबवू शकले नाहीत व ह्‍या रोगाने युरोपात शिखर गाठले आहे असे जे म्हणतात ते सर्व चुकीचे आहेत. अहवाल असे म्हणतो: “एचआयव्ही/एडस्‌ साथीचा रोग एक नव्या आणि अधिक घातक स्वरूपात प्रवेश करीत आहे. जसजशी जागतिक भीती वाढत जाते तसे, वाढती आत्मसंतुष्टता, दीर्घ नकार, व सापत्नभाव पुन्हा उत्पन्‍न होण्याची अनेक चिन्हे आहेत.” (g93 9/8)

आशियामध्ये बालिकांच्या वेश्‍या व्यवसायाची भरभराट

“दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही तरूण प्रौढ आहात, विसाव्या वर्षी तुम्ही एक वृद्ध स्त्री आहात, तिसाव्या वर्षी तुम्ही निकामी आहात.” नॅशनल जिओग्रॅफिक ट्रॅव्हलर मासिकानुसार, थायलँड, बँकॉक येथे, वेश्‍या असलेल्या बालिकांबद्दलची ही सामान्य म्हण आहे. आशियामध्ये जवळ जवळ १० लाख वेश्‍या असलेल्या बालिका, कित्येक जणी तर दहा वर्षाखालच्या आहेत. ते मासिक अशी नोंद करते की, पर्यटन, ह्‍या बेकायदेशीर धंद्याला भरभराटीला नेत आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि पश्‍चिम युरोप येथे अनेक अशा संस्था आहेत जेथे लहान मुलांचा अनैतिक कामांसाठी उपयोग केला जातो, त्या संस्था, आशियातील राष्ट्रांमध्ये ‘लैंगिक पर्यटन’ याला चेतवितात. अलिकडेच लंडनच्या द टाईम्स्‌ने असा अहवाल दिला की प्रत्येक वर्षी नेपाळच्या डोंगरातून, भारताच्या मुंबई या ठिकाणी, ५,००० मुलींची “भरती” केली जाते. आता तेथे, जवळ जवळ २,००,००० इतक्या मुली आहेत, ज्यांमधील अर्ध्यांना एचआयव्ही, एडस्‌ला कारणीभूत असलेल्या विषाण्णूची लागण झाली आहे. एखादा उच्च संघटित व्यापार, पश्‍चिम युरोपात व अमेरिकेत मुलींना निर्यात करतो. (g93 9/8)

त्वरीत उपासना

“चर्च सेवा सकाळी ११ वाजताच का चालू व्हावी व एक किंवा त्याही पेक्षा अधिक तासच केवळ का झाली पाहिजे?” टाईम्स वेस्ट वर्जिनियन मध्ये आलेल्या असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, अलिकडेच अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका बॅप्टिस्ट सेवकाने हा प्रश्‍न, विचारार्थ पुढे केला, ज्यामुळे भविष्याच्या उपायाकडे निरविले गेले. तो पाळक “२२ मिनिटांची थोडक्यात छोटीशी उपासना सेवा” सादर करतो. ही सेवा त्यांना “प्रवचन देण्यासाठी, गीत म्हणण्यासाठी, शास्त्रवचन वाचण्यासाठी, प्रार्थना म्हणून त्याच्या मंडळीला घरी जाण्यासाठी पुरेसा वेळ पुरवील” असा त्यांनी दावा केला आहे. प्रवचन केवळ आठ मिनिटांसाठी असेल. “मॅकडॉन्लडने त्वरीत अन्‍नाची जशी व्यवस्था केली त्याप्रमाणे त्या सेवकाला चर्चसाठी त्वरीत सेवा करता येईल” असे असोसिएटेड प्रेस म्हणते. तथापि, तो अहवाल पुढे असे म्हणतो की, “उपस्थित असलेल्या सर्वांकडून, पैसे गोळा करण्यासाठी भरपूर वेळ दिला जाईल.” (g93 9/8)

जनावरांसाठी धार्मिक विधी

अलिकडचे इटालियन पादरी, जनावरांकडे विशेष लक्ष देत आहेत असे दिसते. फ्रॅन्सीस्कन्स्‌च्या धार्मिक व्यवस्थेने अलिकडेच, “प्राणी, प्रेम करण्याजोगे नाहीत” असे म्हटल्यामुळे जेसुईटस्‌वर “पाखंडी” व “सृष्टीचे शत्रु” असल्याचा दोष लावला आहे. कॅथोलिक वरिष्ठ धर्माधिकारी मारीयो कॉनचॉने, हे चर्चच्या दृष्टिकोनाला ह्‍या प्रकारे मांडतात: “कॅथोलिक चर्च सर्व जिवंत प्राण्यांसाठी खुले आहे.” यास्तव, इटालियन वर्तमानपत्र ला रिपब्लिका नुसार, रोममधील चर्चला जाणारे सर्व जण त्यांच्या “लहान प्राणी मित्रांवर” आशीर्वाद मिळवण्याची आशा करीत आहेत. अशा प्रकारच्या प्रसंगाची घोषणा करून ते वृत्तपत्रक पुढे असे स्पष्टीकरण देते, “आशीर्वादासाठी इच्छुक असलेल्या मांजरी, कुत्री, पोपट, ससे आणि सर्व प्रकारची प्राणीजात ज्यांना योग्यपणे ख्रिश्‍चन म्हणता येईल ते सर्वजण धार्मिक विधीला उपस्थित राहू शकतील.” (g93 8/22)

डोळ्याचा ताण कमी करणे

टी.व्ही किंवा संगणकाच्या पडद्याकडे सतत पाहिल्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येत असेल तर, तो टी.व्ही किंवा संगणक थोडासा खाली ठेवून त्याचा पडदा वर केल्यामुळे तुम्हाला कदाचित आराम वाटेल. न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिन कडून आलेली ही शिफारस, लोक समांतर पातळीत बघताना डोळे मोठे करून बघतात व त्यांची उघड झाप कमी होते, पण खाली पाहताना असे होत नसते, या कल्पनेवर आधारित आहे. डोळ्यांची कमी उघड झाप होणे म्हणजे त्यांचा ताण वाढतो आणि ते मोठे करून पाहण्यामुळे ओल्या पटलावरचे बाष्पीभवन घडते. (g93 9/8)

चर्चेस्‌ विक्रीसाठी

इटलीमधील रोमन कॅथोलिक चर्चला त्याच्या मालकीच्या एकंदर किती धार्मिक इमारती आहेत हे माहीत नाही, परंतु एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: ते त्या सर्व इमारतींची काळजी घेऊ शकत नाही. ऱ्‍हास होत चाललेल्या, टाकून दिलेल्या चर्च इमारतींची संख्या दररोज वाढत चालली आहे. यास्तव, काउन्सिल फॉर द कल्चर्ल हेरिटेज ऑफ द इटालियन चर्चचे अध्यक्ष, पेएत्रो, ॲनटोनियो गॉरलॉटो म्हणाले की, धार्मिक विधींसाठी ज्या इमारतींचा उपयोग केला जात नाही अशा विशिष्ट इमारतींना विकावे की नाही याबद्दल चर्च विचार करत आहे. किती चर्चेसची विक्री केली जाईल? इटलीतील ९५,००० पेक्षा अधिक चर्चेस पैकी, “१० टक्के, असा प्राथमिक अंदाज दिसतो” असे एल मेसॉजेरो येथील बिशपांनी स्पष्टीकरण दिले. (g93 9/8)

जॉगींगचा ताण

जर्मनीच्या, बर्लिन येथील ऑरथोपेडिक युनिव्हर्सिटी क्लिनिकच्या अभ्यासानुसार सायकल चालवण्यापेक्षा, जॉगींग केल्याने शरीराच्या सांध्यांवर दहापटीने जास्त ताण पडतो असे मत व्यक्‍त केले गेले. खासपणे या उद्देशासाठी बनवलेल्या कृत्रिम कमरेचा उपयोग करून, विविध कार्य करताना वैयक्‍तिक सांध्यांवर होणाऱ्‍या ताणाचे मापन करण्यात, युनिव्हर्सिटीतील शास्त्रतज्ज्ञांना पहिल्यांदा यश मिळाले. “सामान्यपणे अशी कल्पना जरी केली गेली की सायकल चालवणाऱ्‍यांपेक्षा जॉगींग करणारे त्यांचे स्नायुबंद आणि सांधे यावर जोर देतात, तरी प्रत्यक्षात संशोधकांना इतक्या मोठ्या तफावतीमुळे आश्‍चर्य वाटले,” असा अहवाल सुड्युटस्के झीटुंगने दिला. (g93 9/8)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा