“चला आपण एक भेटकार्ड पाठवू या”
“तो सप्ताहांत किती आनंददायक होता!” मित्रांना भेटी देऊन आल्यानंतर, त्या विश्रामकारक काळाच्या आनंदी आठवणी तुमच्याकडे आहेत. तुमचे यजमान किती आदरातिथ्य करणारे होते! कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तुम्ही तुमच्या कुटुंबास म्हणता: “चला आपण एक भेटकार्ड पाठवू या.”
एखादे कार्ड आणण्यासाठी त्वरीत तुम्ही तुमच्या स्थानिक दुकानात जाता. तेथे तुम्हाला पुष्कळ, परंतु गोंधळून टाकणारी रचना दिसते. ‘कोणते कार्ड मी निवडावे?’ ‘कोणत्या कार्डामध्ये चांगले शब्द आहेत?’ नक्कीच ती इतकी सोपी निवड नाही! तर मग तुमचे स्वतःचेच एक कार्ड का करू नये?
तुमच्या स्वतःचे कार्ड बनविणे
तुम्ही पहिल्यांदा विचार केलात त्याहून हे फार सोपे आहे. तुम्हाला जे काही लागेल ते म्हणजे केवळ एक कोरा कागद किंवा पातळ कार्ड, लिहिण्याचे साधन, आणि निश्चितच, त्यावर लिहिण्यासाठी संदेश. तुमच्या निवडीप्रमाणे एखादे चित्र, तुमच्या व्यक्तिगत शैलीनुसार करू शकता. ते कसे? येथे दोन सूचना दिल्या आहेत.
(१) तुम्हाला आवडलेले एखादे चित्र निवडा. ते कदाचित मासिकातील एखादे दृश्य असेल, ते तुम्ही कापू शकता आणि तुमच्या कार्डाला जोडा. एका पत्नीने तिच्या पतीला त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवशी नवीन तऱ्हेचे कार्ड देऊन आश्चर्यचकित केले. त्यांच्या दोघांच्या सहभागीत जीवनात तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी, तिने तिचा व तिच्या पतीचा दोन लहान आकाराचा फोटो कापला आणि ते एका साध्या कार्डावर चिटकवून दिले.
(२) फुलांचा उपयोग करा. त्यांची आधीच उत्तमप्रकारे रचना असते. त्यांना दाबून वाळवल्यावर, तुमच्या कार्डाला आणखी सुखकारक आणि रूची आणण्यासाठी चिटकवा.—चौकोन पाहा.
सुशोभित करण्याची कोणतीही पद्धत तुम्ही निवडा, त्यातील संदेश निश्चितच मौल्यवान असेल. स्वतः कार्ड बनवल्यामुळे ते तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना रचण्यास संधी पुरवते.
उचित संदेश
पुरातन राजा शलमोनाने “सत्य व मनोहर वचने शोधण्याचा” प्रयत्न केला. (उपदेशक १२:१०) अशा प्रकारच्या शब्दांची निवड तुमचा लिखित संदेश प्राप्तकर्त्यासाठी “रूपेरी करंड्यात सोन्याची फळे” याप्रमाणे ठरेल.—नीतीसूत्रे २५:११.
सुखकारक परिणाम होईल अशा शब्दांची निवड करा. तुमच्या प्रामाणिक इच्छा व्यक्त करण्यासाठी पवित्र शास्त्राच्या प्रेरित वचनांचा देखील तुम्ही समावेश करू शकता. त्यांना नक्कीच स्वीकारले जाईल.
कार्डावर तुम्ही ज्या पद्धतीने ते शब्द लिहिता त्यातूनही संदेश पाठवला जातो. व्यवस्थित आणि सुवाच्य अक्षर, पाठविणाऱ्याबद्दल म्हणजेच, तुमच्याबद्दल पुष्कळ काही बोलते.
कार्ड पाठवण्याचे प्रसंग
लग्न समारंभ हे आनंदी प्रसंग असल्यामुळे जोडपे त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रण देतात. जर त्यांचा लग्नानंतर समारंभ आहे तर, दूर ठिकाणाहून भेट देण्यासाठी येणाऱ्यांना निमंत्रण कार्ड देताना त्यामध्ये समारंभ कधी चालू व समाप्त होईल हेही लिहावे अशारीतीने ते त्यांच्याबद्दलची काळजी व्यक्त करू शकतात.
मुलाचा जन्म हा सुद्धा आणखी एक प्रसंग कार्ड पाठविण्यासाठी असू शकतो. यामुळे बाळाच्या आगमनाच्या आनंदात तुम्ही देखील सहभाग घेत आहात हे त्याच्या पालकांना कळून येईल.
या प्रसंगासोबतच, लोकांनी तुम्हाला दाखवलेल्या दयाळुपणाबद्दल आभार प्रदर्शित करणे किती विचारीपणाचे ठरेल. तुम्ही आजारी असलेल्यांना व इस्पितळात असणाऱ्यांना तुमच्या प्रेमाचा आणि काळजीचा धीर देऊन त्यांना सांत्वन देऊ शकता. कार्डावरील तुमच्या आनंददायी शुभेच्छा आणि सुखकारक चित्र, खिन्नता आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. खरेच, पुरातन नीतीसूत्र म्हणते त्याप्रमाणे, “समयोचित बोल किती उत्तम!”—नीतीसूत्रे १५:२३.
दूरवर किंवा जवळपास असले तरी, कोणी त्यांच्या प्रिय व्यक्तीला मरणामध्ये गमावले असले तर त्यांच्याबद्दल तुमची सहानुभूती कळवा. पवित्र शास्त्र देते त्या आश्चर्यकारक पुनरूत्थानाच्या आशेची आठवण करून देणे योग्य असेल.
यास्तव, इतरांबद्दल असलेल्या तुमच्या भावना व्यक्त कराव्याशा तुम्हाला वाटतात तेव्हा, त्यांना एखादे कार्ड का पाठवू नये? परंतु शक्य असेल तेव्हा, व्यक्तीशी थेटपणे बोलण्याची जागा कार्ड घेत नाही. उलटपक्षी, ती दयाळू असण्याची आणखी एक संधी आहे. (g93 8/8)
[२१, २२ पानांवरील चौकट]
एक भिन्न सजावट
दबलेल्या फुलांनी सजवल्याने तुमचे कार्ड अधिक सुशोभित होते. तुमच्या कार्डांना भिन्न रचना देण्याचा हा सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. तुम्हाला फार कमी साहित्य लागेल.
फुलांना जमवणे
▫ तुम्हाला हवी असलेली फुले तोडण्याची, तुम्हाला परवानगी आहे का याची खात्री करून घ्या.
▫ पाऊस पडत असताना फुले तोडण्याचे टाळा.
▫ जून झालेली फुले किंवा पाने घेऊ नका.
▫ फुलांना वाया घालवू नका.
काही फुले मांसल असली तर ती व्यवस्थीतपणे दबली जात नाहीत जसे की ब्लूबेल्स (कॅम्पानुला रोटुंडीफोलिया), निषिगंध (लाइलाकाई लिलियम), ऑरकीड (ऑरकीडासिया), किंवा विचित्र आकार असलेले डॅफोडील (नारसिसस सुडोनारसिसस), गुच्छाने येणारी लाइलक फुले (सिरंगा वलगॅरिस), मोठ मोठे गुलाब (रोझा रोझासिया), आणि काटेरी रोपाची फुले (सिरसियम आरवेन्स आणि सिरसियम वलगेर).
फुलांना दाबणे
▫ दोन प्लायवूडचे तुकडे आणि टिपकागदांच्या मध्ये फुले दाबून ठेवा. त्यावर वृत्तपत्राच्या आणखी काही कागदांचा थर ठेवल्याने फुलांमधला ओलावा शोसला जातो. फुले जसजशी वाळत जातात तसा दाब अधिक वाढवा.
▫ दाबून ठेवलेली फुले उघडण्याआधी कमीतकमी एक आठवड्यासाठी तरी थांबा.
▫ फुले व्यवस्थीतपणे वाळलीत की नाही हे पाहण्यासाठी त्यांची हळूच पाहणी करा, आणि आवश्यकता असल्यास, सुकलेल्या कागदांवर त्यांची स्थिती बदला.
▫ आणखी जोरात दाब वाढवा, व फुले काढण्यापूर्वी दोन किंवा तीन आठवड्यांसाठी त्याला उष्ण, सुकलेल्या ठिकाणी ठेवा.
फुलांना बसविणे
▫ थोड्या प्रमाणात डिंकाचा उपयोग करा
▫ कदाचित, एका छोट्या चिमट्याने वाळलेल्या फुलांना सांभाळून हाताळा.