ईश्वरी पालकांची कृतज्ञता बाळगणे
जे पालक त्यांच्या मुलांना जबाबदार आणि ईश्वरी भय असणारे प्रौढ बनवण्यास कठीण परिश्रम घेतात, ते, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्यावर संतुष्ट होतात. जेव्हा त्यांची मुले ह्या चांगल्या उभारणीकरता कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हाही त्यांना आनंद होतो.
पुढील पत्र, एका मुलाने आणि त्याच्या बायकोने, त्यांच्या विवाहानंतर, त्याच्या पालकांना पाठवले होते:
“प्रिय डॅडी व मम्मी:
“आम्हाला कळत नाही आम्ही कोठून सुरवात करावी. आम्हाला वाटते की आम्ही, तुमचे प्रेम, आधार आणि आमच्या विवाहाच्या दिवशी तुम्ही दाखवलेल्या उदारतेची किती कृतज्ञता बाळगतो हे म्हणण्यापासूनच सुरवात करावी. तो खरोखर एक खास दिवस होता, आणि तुमची उपस्थिती अत्यंत मोलाची होती. यासोबतच, इतकेच पुरे नसून, तुम्ही आम्हाला आमचा मधूचंद्र सुखकर होण्यासाठी मदत केली. वरील सर्व गोष्टी, तुम्ही किती उल्लेखनीय, प्रेमळ, तर्कयुक्त आणि खेळकर पालक आहात आणि नेहमी होता याचा पुरावा देतात!
“सरळ आणि अरुंद मार्गावर मी का टिकून राहिलो याचा तुम्ही कधी विचार केला का? कारण, यहोवा देवासाठी असलेल्या माझ्या प्रीती सोबत, तुम्हा दोघांबद्दल मी सतत आदर राखून आहे. तुमच्या शिस्तीसोबत, हा आदर इतका बळकट आहे, की त्याने मला कोणतीही गोष्ट करण्याआधी व निर्णय घेण्याआधी गंभीरपणे त्यावर विचार करण्यासाठी भाग पाडले आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जीवनाच्या यशामध्ये, तुमचे दृढ प्रेम आणि माझ्यासाठी असलेली शिस्त तसेच यहोवासाठी आणि त्याच्या संस्थेसाठी असलेली तुमची चिरंतन भक्ती यांचा यामध्ये मोठा भाग आहे.
“तुमच्या दोघांबद्दलच्या माझ्या लहानपणाच्या सर्व आठवणी गोळा करून एकत्रित करावयाच्या आहेत, तर त्या असेच सांगतील की तुम्ही बोललेल्या सर्व गोष्टी मी आठवू शकत नसलो तरी, मला तुमचे उल्लेखनीय वर्तन, विशेषकरून इतरांसाठी आणि यहोवासाठी असलेले प्रेम आठवते.
“आम्ही तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो.
“तुमचा मुलगा आणि सून,
“एल. व डब्ल्यू.”