प्रश्न पेटी
◼ प्रांतीय अधिवेशन लेपल बॅज कार्ड कोणाला द्यावेत?
अधिवेशनाच्या लेपल बॅज कार्डामुळे आपल्याला आपल्या भाऊबहिणींना ओळखायला मदत होते. तसेच, बाहेरच्या लोकांनाही आपल्या अधिवेशनाची माहिती मिळते. आपण हे कार्ड लावतो तेव्हा लोक असाच विचार करतात, की आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीचे सदस्य आहोत आणि मंडळीमध्ये आपला चांगला नावलौकिक आहे. त्यामुळे, या बॅज काड्र्सचे विचारपूर्वक वितरण करावे.
या कार्डावर आपले आणि मंडळीचे नाव लिहायचे असते. आणि ज्या मंडळीचे नाव आपण कार्डवर लिहितो त्या मंडळीशी आपण नियमितपणे सहवास राखतो हे सिद्ध होते. त्यामुळे हरएक बाप्तिस्माप्राप्त आणि बाप्तिस्मारहीत प्रचारकाला एक कार्ड देणे उचित राहील. या शिवाय, नियमितपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहणाऱ्या आणि क्षेत्र सेवेत सहभाग घेण्याच्या दिशेने प्रगती करणाऱ्या मुलांना आणि इतर लोकांना देखील हे कार्ड दिले जाऊ शकते. पण, मंडळीतून बहिष्कृत केलेल्या व्यक्तीला मात्र अधिवेशन लेपल कार्ड देऊ नये.
संस्थेकडून मंडळीला बॅज काड्र्स मिळतात तेव्हा वडिलांनी वरील गोष्टी लक्षात ठेवून काड्र्सचे वितरण करावे.