माझ्या कुटुंबाला रोगप्रतिबंधक द्यावे का?
डॉक्टर म्हणतात, “बाळाला लस टोचण्याची वेळ आली आहे.” कदाचित, हे वाक्य एका लहान बालकासाठी अनिष्टसूचक असेल, परंतु पालकांकडून एक आत्मविश्वासाचे स्मित आणि संमती दर्शवणारा भाव दिसतो.
तरीसुद्धा, मुलांच्या आणि प्रौढांच्या रोगप्रतिबंधकाच्या सर्वसामान्य पद्धतींबद्दल अलिकडेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्या लशी खरोखरच आवश्यक आहेत? त्याच्या अवांतर परिणामांबद्दल काय? लशीच्या उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारे रक्त गोवलेले आहे का?
एका काळजी राखणाऱ्या ख्रिस्ती कुटुंबाला विचार करण्यासाठी हे प्रश्न चांगले आहेत. त्यांच्या उत्तरांचा थेट संबंध तुमच्या मुलांचे आरोग्य आणि भविष्य याच्याशी असू शकतो.
त्याची पार्श्वभूमी
एकोणीशे चौपन्न मध्ये एक प्रभावकारी लस तयार केली गेली ज्यामुळे पुष्कळ राष्ट्रांमध्ये, प्रत्यक्षात पोलियोची भीती दूर झाली. प्रभावकारी लसीकरणाच्या कार्यक्रमांमुळे १९८० पर्यंत संपूर्ण जगातून देवीच्या पीडेचे निर्मूलन झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे बेंजामीन फ्रँक्लीन यांच्या “एक औंस काळजी ही एक पौंड बरे होण्याच्या तुलनेची आहे,” या शब्दांना आणखीन बळकटी मिळाली.
आज घटसर्प, पोलियो, धनुर्वात आणि डांग्या खोकला (हूपींग कफ) या सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यात रोगप्रतिबंधक कार्यक्रम प्रभावकारी ठरले आहेत. पुढे, असे दिसून आले आहे की, काही कारणांसाठी रोगप्रतिबंधक देण्यासाठी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तो रोग पुन्हा उद्भवला. एका देशामध्ये डांग्या खोकल्याबद्दल असेच घडले.
ही रोगप्रतिबंधके काय करतात? मुख्यत्वे, दोन प्रकारामधील एकात, ती संसर्ग घडविणाऱ्या जंतू व वानूच्या रोगकारक हल्ल्यांविरूद्ध शरीराच्या प्रतिबंधक शक्तींना बळकटी देतात. पहिल्या पद्धतीला ॲक्टीव्ह रोगप्रतिबंधक असे म्हणतात. याप्रकारच्या रोगप्रतिबंधक लशीमध्ये, दुर्बळ केलेला किंवा मेलेला रोगकारक (किंवा त्याचे विष) असतो ज्यात असा बदल घडवला जातो ज्यामुळे ते शरीरासाठी घातक ठरत नाही. शरीराची स्वतःची प्रतिबंधक शक्ती प्रतिद्रव्ये नावाच्या नाशक पदार्थांना तयार करू लागतात जी रोगजंतू निर्माण झाल्यास त्यांचा नाश करतात. रोगप्रतिबंधक लशीमध्ये रोगकारकाच्या विषाचा (जंतूविषाचा) अर्क असला तर त्याला टॉक्साइड म्हटले जाते. दुर्बल केलेली (कमजोर केलेले) रोगकारके किंवा मेलेल्या जीवांपासून ते तयार करण्यात आले असले तर त्याला लस म्हणतात.
तुम्ही याची कल्पना करू शकता की, या लशी लगेचच रोगप्रतिकारक्षमता निर्माण करीत नाहीत. रक्षण करणारे प्रतिद्रव्ये निर्माण करण्यासाठी शरीराला काही वेळ लागतो. या ॲक्टीव्ह रोगप्रतिबंधकांमध्ये बालकांच्या सर्व लशी आणि इंजेक्शनचा समावेश होतो ज्यांना सामान्यपणे लसीकरण म्हणून ओळखले जाते. एक अपवाद सोडून (नंतर चर्चीलेला), इतरांमध्ये उत्पादनाच्या कोणत्याही क्रियेमध्ये रक्त गोवलेले नाही.
दुसऱ्या पद्धतीला पॅसिव्ह रोगप्रतिबंधक असे म्हटले जाते. ते बहुधा अशा परिस्थितींसाठी राखून ठेवले जाते जेथे एखादी व्यक्ती आलर्क (रेबीज) सारख्या गंभीर रोगाच्या संपर्कात आली असेल. अशा स्थितीत, शरीराला स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्यासाठी वेळ नसतो. म्हणून रोगकारकांचा नाश करण्यासाठी आधीच तयार केलेले, कोणा दुसऱ्याचे प्रतिद्रव्ये संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये अंतःक्षेपित करण्यात येतात. गामा ग्लोब्यूलीन (गामा ग्लोब्यूलीन प्रथिनांचा जंतूरहित द्राव), प्रतिविष, आणि हायपरइंम्यून सेरम ही लशींची इतर नावे आहेत जी निरोगी व्यक्ती किंवा प्राण्यांच्या रक्ताच्या अर्कापासून तयार केली जातात. अशा प्रकारे तयार केलेले किंवा पॅसिव्ह रोगप्रतिबंधके हल्लेखोराचा नाश करण्यासाठी शरीराला ताबडतोब परंतु तात्पुरती मदत देतात. इतरांच्या शरीरातून घेतलेल्या या प्रतिद्रव्यांना परके प्रथिन म्हणून लगेचच शरीरातून काढून टाकले जाते.
माझ्या बाळाला रोगप्रतिबंधक लशी टोचाव्यात का?
ही पार्श्वभूमी देऊनसुद्धा, ‘माझ्या मुलाला कोणते रोगप्रतिबंधक मिळावेत?’ असा काहीजण विचार करतील. जगाच्या पुष्कळ भागांमध्ये जेथे बालकांना दिले जाणारे रोगप्रतिबंधक सर्वत्र उपलब्ध आहेत तेथे बालकांच्या संभाव्य रोगाच्या प्रमाणात उल्लेखनीय घट झाली आहे.
पुष्कळ वर्षांपासून अमेरिकन ॲकेडेमी ऑफ पेडिआट्रिक्सने जगातील अशाच संघटनांच्या सहमतात घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या रोगांसाठी रूटीन रोगप्रतिबंधक घेण्याचा सल्ला दिला आहे. बहुधा या तीन लशींना एकत्र करून—डिपीटी—ही एक लस दिली जाते, त्याबरोबर किमान दोन महिन्यांच्या अंतराने डिपीटी (बळकटी देणारे) लशीच्या तीन बूस्टर मात्रा दिल्या जातात. त्याशिवाय एक वर्ष वयानंतरच्या मुलांना गोवर, गालफुगी आणि ऱ्युबेल्लाच्या (जर्मन मिझलस्) रोगप्रतिबंधकासाठी एमएमआरची एक लस दिली जाते. तसेच, डिपीटीच्या वेळापत्रकाप्रमाणेच पोटात घेण्याच्या पोलियो लशीच्या चार मात्रा पाजल्या जातात.a
जरी दिल्या जाणाऱ्या बूस्टरांची संख्या वेगवेगळी असली तरी पुष्कळ भागांमध्ये ही रुटीन मालिका आवश्यक आहे. अलिकडेच, गोवरच्या पुष्कळ साथींमुळे, गोवरच्या लशीच्या आणखीन बूस्टरना काही परिस्थितींमध्ये घेण्यासाठी सुचवले आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या भागातल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची तुम्हाला गरज भासेल.
त्याशिवाय, हिंवतापात देण्यात येणारी लस देखील आहे. काही कारणांसाठी ज्यांना हिंवतापाचे काही प्रकार चटकन जडतात अशा बालक आणि प्रौढांसाठी ती संपूर्ण आयुष्यासाठी प्रतिकारक क्षमता पुरवते असे दिसून येते.
मुलांसाठी असणाऱ्या आणखीन एका लशीचे नाव हीब लस असे आहे. लहानपणातल्या हेमोफिलस इंफ्लूएंजा या सामान्य रोगकारकाविरुद्ध संरक्षण मिळण्यासाठी ती दिली जाते. हा जंतू लहान बाळांमध्ये मस्तिष्कावरण शोथ (मेनीनजायटीस) या भयंकर रोगाप्रमाणे पुष्कळ रोग निर्माण करतो. ही लस सामान्यपणे सुरक्षित आहे आणि बाळांच्या रोगप्रतिबंधक डोसचा भाग म्हणून तिला मोठ्या प्रमाणावर उपयुक्त अशी समजली जाते.
आतापर्यंत, कांजण्यांवर कोणतेही रुटीन रोगप्रतिबंधक उपलब्ध नाही. आणि देवीच्या रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही कारण अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे या प्राणघातक रोगाला एका जगव्याप्त लसीकरणाच्या कार्यक्रमाद्वारे संपूर्णपणे नाहीसे करण्यात आले होते.
अवांतर परिणामांबद्दल काय?
रोगप्रतिबंधक अवांतर परिणामांच्या विषयाबद्दल काय? अचानक रडणे आणि तात्पुरत्या अश्रूंपलिकडे पुष्कळ लशींचे अवांतर परिणाम—जास्तीतजास्त एक दिवस ताप—बहुधा मर्यादित आणि तात्कालिक असतात. तरीसुद्धा, या लशींच्या धोक्यांबद्दल पुष्कळ पालकांना बऱ्याच चिंता आहेत. एका वैद्यकीय अभ्यासाने मुलांच्या आरोग्याबद्दल असणाऱ्या पालकांच्या चिंतेबद्दल परीक्षण केले आणि असे दिसून आले की मुलाखत घेतलेल्या ५७ टक्के पालकांना रोगप्रतिबंधकाच्या प्रतिक्रियेबद्दल चिंता होती.
अलिकडेच, डांग्या खोकला किंवा हूपींग कफसाठी असणाऱ्या डिपीटी लशीच्या एका घटकाबद्दल बरीच चिंता प्रकट केली गेली. या लशीच्या यशामुळे पूर्वी भय असलेल्या रोगाच्या प्रमाणात उल्लेखनीय घट झाली आहे, जसे की, ही लस वापरण्याआधी प्रत्येक वर्षी या आजाराच्या २,००,००० घटना होत असत परंतु या लशीचा उपयोग सर्व ठिकाणी केल्यामुळे, त्याचे प्रमाण दर वर्षी २,००० इतके झाले आहे. तरीसुद्धा, ही मात्रा दिलेल्या १,००,००० पैकी १ घटनेत झटके किंवा मेंदूला धक्का बसण्यासारखे गंभीर अवांतर परिणाम घडले.
अशी प्रतिक्रिया फारच दुर्मिळ असली तरी, पालकांना निवड करण्यासाठी कमी वाव मिळतो यामुळे त्यांना चिंता वाटते कारण त्यांच्या मुलाला शाळेसाठी लायक ठरण्यास त्यांना लस टोचण्याची अनुमती द्यावी लागते. डांग्या खोकल्याचा रोग असामान्य असला तरी एखाद्या समाजाला पछाडल्यावर तो इतका नाशकारक आहे, ज्याबद्दल तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की साधारण मुलासाठी, ‘रोग होण्याऐवजी रोगप्रतिबंधक टोचणे फारच सुरक्षित आहे.’ हे तज्ज्ञ असा सल्ला देतात की रोगप्रतिबंधक द्यावे परंतु “पूर्वीच्या डोसमुळे आकुंचन, एंकॅफलायटीस, बोलण्यामधील दोष किंवा शक्तिपात” झाला असेल तर ते देऊ नये. “‘फार झोपाळूपणा, अतिशय किंचाळणे (३ किंवा अधिक तासांच्या कालावधीसाठी न थांबता रडणे किंवा किंचाळणे) किंवा १०५ डिग्री फॅरेनहीट (४०.५ डिग्री सेल.) ताप’ असणाऱ्या मुलांना देखील लशीचे अधिक डोस मिळू नयेत.”b
पुष्कळ देशांमध्ये ज्याप्रमाणे सध्या जपानमध्ये दिले जाते व ज्याबद्दल भवितव्यात पुष्कळ आशा आहेत, तेथे ॲसेल्यूलर रोगप्रतिबंधक देणे हा समस्याचा खरा उपाय आहे. ही नवीन आणि सुरक्षित असणारी लस इतर देशांमध्ये देखील उपलब्ध होत आहे.
इतर रूटीन लशीसुद्धा वारंवार प्रभावी तसेच सुरक्षित असल्याचे दिसल्या आहेत.
प्रौढांच्या रोगप्रतिबंधकांबद्दल काय?
एखादी व्यक्ती प्रौढ झाल्यावर थोडक्याच ॲक्टीव्ह (कार्यवाहित) रोगप्रतिबंधकांबद्दल तिने लक्षात ठेवावे. वस्तुतः गोवर, गालफुगी आणि ऱ्यूबेल्ला सारख्या रोगांसाठी सर्व प्रौढजणांना लहानपणी रोगप्रतिबंधक घेतल्यामुळे किंवा ते रोग होऊन गेल्यामुळे प्रतिकारक्षमता असायला हवी. अशा प्रतिकारक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झालाच तर, एखादा डॉक्टर एमएमआरची लस टोचून घेण्यासाठी प्रौढ व्यक्तीला सुचवेल.
जबड्याच्या रोगाला टाळण्यासाठी प्रत्येक १० वर्षांनंतर टेटॅनस टॉक्साइडची लस टोचून घेणे ही उत्तम कल्पना म्हणून समजली जाते. वृद्ध व्यक्तींना किंवा जुनाट रोग असणाऱ्यांना शीतज्वराच्या वार्षिक रोगप्रतिबंधकांबद्दल त्यांच्या डॉक्टरांकडे चौकशी करावीशी वाटेल. जगाच्या काही इतर भागात प्रवास करणाऱ्यांनी ते जात असतील तेथे पीत-ज्वर, पटकी, ॲनथ्रॅक्स, विषमज्वर किंवा प्लेगसारखे आजार नेहमीच उद्भवत असतील तर त्यांनी अशा रोगांसाठी रोगप्रतिबंधक टोचून घेण्याचा विचार करावा.
आणखी एका ॲक्टीव्ह रोगप्रतिबंधकाकडे लक्ष देण्याची जरूरी आहे कारण ॲक्टीव्ह रोगप्रतिबंधकामधील या एकालाच रक्ताने तयार करण्यात येते. ती हेप्टावॅक्स-बी नावाची हेपाटायटीस-बी लस आहे. ही रोगप्रतिबंधक लस हेपाटायटीस-बी संसर्गदूषित झालेल्या रुग्णांच्या रक्त पदार्थांच्या चुकून संपर्कात येऊ शकणाऱ्या आरोग्य कार्यकर्त्यांसारख्या व्यक्तींना दिली जाते. ती लस एक मोठी प्रगती मानली जात असली तरी, तिच्या उत्पादनाच्या पद्धतीमुळे पुष्कळांना त्याबद्दल चिंता वाटते.
हेपाटायटीस-बी वानू असलेल्या निवडक वाहकांचे रक्त साठवले जाते आणि कोणत्याही वानूचा नाश करील असा बनवला जातो आणि त्यातून एक विशिष्ट हेपाटायटीस-बी प्रतिजैविक निर्माण केला जातो. हा शुद्ध, निष्क्रिय केलेला प्रतिजैविक लस म्हणून टोचला जाऊ शकतो. तरीसुद्धा, लैंगिकरीत्या व्यभिचारी असणाऱ्या संसर्गदूषित लोकांकडून रक्त पदार्थ टोचून घेण्याच्या धोक्याची भीती वाटत असल्यामुळे पुष्कळ लोक ती लस टोचून घेण्यास नाकारतात. त्याशिवाय, दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तापासून तयार केल्यामुळे काही विवेकी ख्रिश्चनांनी ती लस टोचून घेण्यासाठी आक्षेप घेतला.c
त्या लशी सारखीच गुणकारी हेपाटायटीस-बी लस तयार करण्यात आल्यापासून हेपाटायटीस लशीबद्दल घेतलेले आक्षेप प्रभावीपणाने काढून टाकण्यात आले आहेत. ही लस आनुवंशिक शास्त्राद्वारे तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये तिला किण्व पेशींमध्ये उत्पन्न केली जाते व त्यात मानवी रक्ताचा काही समावेश नाही. तुम्ही आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात काम करत असला किंवा काही इतर कारणांसाठी हेपाटायटीस-बी लस घ्यावी लागत असेल तर या गोष्टीबद्दल तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी बोलावेसे वाटेल.
लशींच्या उत्पादनात रक्ताचा समावेश
रक्ताच्या दुरुपयोगाबद्दल पवित्र शास्त्राच्या मना करणाऱ्या कायद्याची काळजी असणाऱ्या ख्रिश्चनांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतो. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) रक्तापासून तयार केल्या जाणाऱ्या इतर लशी आहेत का?
सर्वसाधारण नियमाप्रमाणे, हेप्टावॅक्स-बी लशीशिवाय ॲक्टीव्ह रोगप्रतिबंधकांना रक्तापासून तयार केले जात नाही. उदाहरणार्थ, त्यामध्ये बाळाला दिल्या जाणाऱ्या सर्व लशींचा समावेश आहे.
त्याच्या विरोधात असणारी गोष्ट पॅसिव्ह रोगप्रतिबंधकांबद्दल खरी आहे. गंजलेल्या खिळ्यावर पाय पडल्यावर किंवा कुत्र्याने चावल्यावर ज्या लशी (रूटीन बूस्टर नाहीत तोपर्यंत) टोचून घेण्यासाठी सल्ला दिला जातो त्या हायपरइंम्यून सेरम आहेत व रक्ताचा उपयोग करून त्यांना तयार केले आहे. ही गोष्ट आरएच इंम्यून ग्लोब्यूलीन (ऱ्होगॅम) बद्दल देखील खरी आहे जे आरएच-पॉसिटिव्ह बाळाला जन्म देताना आरएच-पॉसिटिव्ह रक्ताच्या संपर्कात आलेल्या आरएच-निगेटिव्ह मातांना उपयुक्त म्हणून सुचवण्यात येते.
हे पॅसिव्ह रोगप्रतिबंधक रक्ताच्या विषयाबद्दल चिंतेच्या गोष्टी आहेत, तेव्हा विवेकी ख्रिश्चनांनी त्याबाबतीत कोणती भूमिका घ्यावी? या आणि द वॉचटावर मासिकातल्या पूर्वीच्या लेखांमध्ये एकच दृढ भूमिका दाखवून दिली आहे: एका ख्रिस्ती व्यक्तीने तो उपचार स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी स्वीकारावा की नाही हे त्याच्या पवित्र शास्त्राप्रमाणे शिकवलेल्या विवेकावर अवलंबून आहे.d
माझ्या कुटुंबाला रोगप्रतिबंधके मिळावी का?
ख्रिश्चनांना जीवनाबद्दल मोठा आदर आहे आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वात चांगले करण्यास ते प्रामाणिकपणे इच्छितात. तुमच्या कुटुंबाला रोगप्रतिबंधक देण्यासाठी तुम्ही विवेकबुद्धिनुसार निवड करता तेव्हा तो तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे.—गलतीकर. ६:५.
एका तज्ज्ञाने या परिस्थितीबद्दल थोडक्यात योग्यरीतीने असे सांगितले: “मुलांच्या कोणत्याही वैद्यकीय बाबतीत मध्यस्थी करताना पालकांना कळवले पाहिजे. ते त्यांच्या मुलाच्या कायदेशीर पालकांपेक्षा अधिक काही आहेत. मुले त्यांच्यावर अवलंबून असतात त्या जीवनाच्या कालावधीत ते मुलाचे कल्याण आणि संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहेत.” रोगप्रतिबंधकाच्या या बाबतीत तसेच सर्व इतर वैद्यकीय बाबतीत, यहोवाचे साक्षीदार त्यांची जबाबदारी गंभीरतेने घेतात.—एका तज्ज्ञाच्या सौजन्याने. (g93 8/8)
[तळटीपा]
a जगाच्या पुष्कळ भागातील लहान बालकांसाठी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेपाटायटीस बी विरुद्ध रुटीन रोगप्रतिबंधक देण्यासाठी सुचवत आहे.
b ज्यांच्या कुटुंबात झटके येण्याचा रोग आहे त्याचा प्रतिक्रियेशी परस्पर संबंध असतोच असे नाही. श्वसनक्रियेचे रोग प्रतिक्रिया उत्पन्न करत नसले तरी, मूल किंचित आजारी असल्यास लस देण्याचा काळ लांबवणे अधिक सूज्ञपणाचे ठरेल.
c जून १, १९९० च्या द वॉचटावर मधील “वाचकांचे प्रश्न” पहा.
d जून १५, १९७८ चा द वॉचटावर याची ३०-१ पाने पहा.
[१९ पानांवरील चौकट]
रक्तापासून तयार न केलेली रोगप्रतिबंधके
बाळांसाठी असलेल्या रोगप्रतिबंधक लशी (डिपीटी, ओपीव्ही, एमएमआर)
हीब लस
न्यूमोवॅक्स
टॉक्साइड्स
शीतज्वराच्या लशी
रेकोंबीवॅक्स-एचबी
रक्तापासून तयार केलेली रोगप्रतिबंधके
हेप्टावॅक्स-बी
ऱ्होगॅम
प्रतिविष
विशेषतः प्राणी किंवा किटकांच्या विषासाठी असणारे प्रतिविष (सर्प आणि कोळीच्या विषासाठी)
इंम्यून ग्लोब्यूलीन (विविध रोगांसाठी)
गामा ग्लोब्यूलीन
हायपरइंम्यून सेरमच्या पद्धती (उदाहरणार्थ, ॲन्टीरेबीज सेरम)