पवित्र शास्त्रीय दृष्टीकोण
बदली मातृत्व ख्रिश्चनांसाठी योग्य आहे का?
प्राचीन रोमी कवी होरास याला बदली मातृत्वासंबंधी काहीही माहीत नव्हते जेव्हा त्याने हे लिहिले: “एखादा मनुष्य गुणवाण असेल तर, तो कोणत्या पालकांद्वारे जन्मला याला तितकेसे महत्त्व राहात नाही.” सतराव्या शतकातील फ्रेंच लेखकाची म्हण, “जेथे सदाचार नाही त्या जन्माला अर्थ नाही,” बदली मातृत्वाची जागा घेण्याची कल्पना कायदेशीर होण्याआधी प्रचारात आली होती. पण मेरी टॉम हीने मिस. या मासिकात कळवले की, नवीन तांत्रिक उत्पादनाद्वारे “अंडे निर्माण करण्याची क्रिया, गर्भापासून मूलं बनविण्यासाठी लागणारे कृत्रिम तऱ्हेने ऊब देणारे अंडपोषण यंत्र, आणि बाळ जन्मल्यानंतर त्याची काळजी घेणारी” अशाप्रकारच्या “मातां”ची दोन किंवा तीन भागात विभागणी होते. यामुळे “गौरव” व “मोठेपणा” कोणाला देणार हा प्रश्न अगदी संदिग्ध व गुंतागुंतीचा बनतो.
बदली मातृत्वाची जागा घेणे ही पद्धत १९७०च्या मध्याला जगाच्या दृश्यासमोर एकाएकी उघड झाली. व त्याने पूर्वी नव्हती अशी सामाजिक, नैतिक, व कायदेशीर समस्या उभी केली. संतती निर्माण करण्यासाठी काही निसंतान जोडप्यांनी रितीला धरुन नसणाऱ्या गोष्टीचा उपयोग करुन घेतला. दुसऱ्या बाजूस पाहता, डॉक्टर, वकील, व कायदेमंडळाचे सदस्य हे दुसऱ्यासाठी मातृत्वाची जागा घेणे ही गोष्ट यामध्ये तांत्रिक गोष्टींची प्रगती करण्यासाठी व मानवी वंशासंबंधीचा व नैतिकतेच्या कोणत्याही वाढत्या प्रश्नाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी प्रयत्नशील होते.
बदली मातृत्व म्हणजे काय?
दुसऱ्यासाठी मातृत्वाची जागा घेणे यात किंवा मातृत्व स्वीकारणे यात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्री करता कृत्रिमरित्या गर्भात वीर्य घेऊन मुलाला जन्म देते. ज्यांनी त्या स्त्रीशी करार केला आहे त्या जोडप्यातील पतीचे वीर्य त्यांच्यासाठी मुलाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या गर्भात कृत्रिमरित्या टाकण्यात येते. अशा या कृत्रिम गर्भधारणेमुळे ती स्त्री त्या बाळाची उत्पत्ती करणारी माता ठरते. बदली गर्भारपण म्हणजे पत्नीमधील अंडबीज व पतीचे शुक्राणू यांचा संयोग गर्भाशयाच्या बाहेर घडविला जातो या कृतीला इन-व्हायट्रो (टेस्ट-ट्यूब) फलीकरण म्हणतात, आणि ते फलीत झालेले अंडबीज बदली मातेच्या गर्भाशयात वाढ होण्याकरता घातले जाते.
बदली मातेची गरज का उद्भवली? एक गोष्ट म्हणजे, स्त्रियांना मुले होण्याकरता उच्च तांत्रिक विज्ञानाने निरनिराळे मार्ग शोधून काढले. काही जोडपी ज्यांना मुले होण्याची तीव्र इच्छा आहे पण वांझपणामुळे, किंवा काही गैरसोयींमुळे, अथवा दत्तक घेण्यासाठी आरोग्यदायी बालकाच्या कमतरतेमुळे त्यांना ते घेता येत नाही. याचकरता बाळ होण्यासाठी ते दुसऱ्याचे शरीर भाड्याने घेतात. यामध्ये पुष्कळ पैशांची गुतंवणूक लागते म्हणून बदली मातृत्वाला “अनैच्छिक सक्तमजुरी आणि गुलामगिरी” तसेच “गरीबांच्या जननक्षमतेला उघड करणे” ह्या नापसंतीदर्शक प्रत्ययांनी संबोधण्यात येते.
अमेरिकेत, न्यू जर्सी सुप्रीम कोर्टाने हे जाणले की यामार्फत गरीबांची श्रीमंताकडून पिळवणूक होण्याची संभाव्यता जास्त आहे आणि बदली मातेच्या प्रकरणाविषयी असे स्पष्ट केले कीः “पैशाच्या जोरावर मजूर, प्रेम किंवा जीवनही विकत घेण्याची क्षमता असली तरी आपला समाज यापेक्षाही इतर मूल्यांना अधिक महत्त्वपूर्ण मानतो.” फ्रान्सच्या सुप्रीम कोर्टाने सांगितले की बदली मातृत्वामुळे मातेचे शरीर भ्रष्टावले जाते तसेच “मानवी शरीर हे कर्जाऊ घेण्यासाठी, किंवा भाड्याने अथवा विकत घेण्यासाठी नाही.”
बदली मातृत्वातील समस्या
बदली मातृत्व हे पुष्कळ समस्यांना सामोरे आणते. बाळाला जन्म देणारी माता बाळाला आपणापाशी ठेवून घेऊ इच्छित असेल तर त्यामुळे कायदेशीर झगडा होण्याचा संभव असतो. प्रश्न येतो की ते बाळ कोणाचे आहे जिने जन्म दिला तिचे की जिने अंडबीज पूरविले तिचे? अशाप्रकारे मुलाचा जन्म ही आनंद देणारी बाब असता, कधीकधी हीच बाब कायदेशीर झगडे निर्माण करते. दुसरी समस्याः काही स्त्रिया ज्या प्रथम बदली मातृत्व स्विकारण्यास तयार असतात पण जसजशी बाळाची वाढ होते तशा त्यांच्या भावनाही बदलतात. हा करार काही महिन्यानंतर स्विकारण्यास त्यांना कठीण होतो. माता व तिच्या गर्भात असलेल्या बाळामध्ये एक घनिष्ठ नाते बनते. एक बदली माता जिला या नात्याला तोडता आले नाही, आपल्या बाळाबद्दलच्या भावना तिने व्यक्त केल्याः “कोणीतरी मरण पावले आहे असे वाटते. माझ्या मुलीसाठी माझे शरीर रडत होते.”
तसेच, बदली मातृत्वाने घडवलेला जन्म त्या स्त्रीच्या, इतर मुलांवर किंवा जे कुटुंब त्याचा स्वीकार करते त्यावर, आणि त्या स्वतः मुलावर याचा काय परिणाम घडवतो? अथवा बदली मातेद्वारे जन्माला येणाऱ्या मुलामध्ये काही व्यंग असेल तर काय? त्याचा पिता त्याचा स्वीकार करील का? जर नाही, तर त्या मुलाला कोण आधार देणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देव अशा बदली मातृत्वाकडे कोणत्या दृष्टीकोणाने पाहतो?
बदली मातृत्व विवाहाचा आदर राखते का?
देवाचे वचन आम्हास सांगते की विवाहास तो अतिशय पवित्र मानतो. उदाहरणार्थ, इब्रीकरास १३:४ म्हणतेः “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरुण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.”a सर्व ख्रिश्चनांच्या बाबतीत देव अपेक्षितो की त्यांनी विवाहास आदरणीय समजावे व त्याप्रकारे वागावे. विवाहास काय बिघडविते? जारकर्म, जे विवाहास आधीच अनादर दाखवितो, व व्यभिचार, जो की विवाहात प्रवेशिल्यावर अनादर दाखविते.
मग बदली मातृत्व विवाहाचा आदर करुन अंथरूण निर्दोष ठेवते का? साधे उत्तर, नाही. सांप्रदायिक बदली मातृत्वामध्ये वीर्य दात्यामार्फत स्त्रीच्या गर्भात वीर्याची स्थापना करण्याची गरज असते. याविषयी पवित्र शास्त्राचा दृष्टीकोन लेवीय १८:२० मध्ये सापडतो, जेथे म्हटले आहेः “तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नको.” समागमाने गर्भात वीर्य स्थापण्यात आणि कृत्रिमरित्या दात्याच्या वीर्याचे आरोपण करणे यात फरक स्पष्ट करणारा कोणताही पवित्र शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे, स्त्रीच्या कायदेशीर पतीला सोडून इतर पुरुषाचे वीर्य तिच्या गर्भात स्थापल्यास ते एक तर जारकर्म होईल अथवा व्यभिचार होईल.
बदली मातृत्वाच्या गर्भारपणाबद्दल काय? यामुळेही विवाहाचे अंथरुण डागाळले जाते. हे खरे आहे की, फलीत झालेले अंडबीज हे पती आणि पत्नीचे असते, पण फलीत झाल्यावर मात्र ते दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात वाढले जाते, आणि त्यामुळे ती गरोदर राहाते. ही गर्भधारणा बदली माता व तिच्या स्वतःच्या पतीच्या लैगिंक संबंधातून झालेली नसते. अशाप्रकारे, तिच्या जननेंद्रिंयाचा उपयोग तिचा स्वतःचा सोबती नव्हे तर कोणी दुसरा करीत असतो. हे स्त्रीने स्वतःच्या पतीसाठी संतान प्रसवावे या पवित्र शास्त्रीय तत्त्वाच्या विसंगतीत आहे. (पडताळा अनुवाद २३:२.) बदली मातेच्या स्वतःच्या पतीऐवजी इतर पुरुषाने तिच्या जननेंद्रिंयाचा वापर करणे हे योग्य नाही. विवाहाच्या अंथरूणाचा हा दुरुपयोग आहे. यास्तव, बदली मातृत्व हे ख्रिश्चनांसाठी नाही. (g93 3/8)
[तळटीपा]
a न्यू स्टेटमेंन्ट वर्ड स्टडीज् चा संदर्भ हे दाखवितो की इब्री १३:४ मधील “अंथरुण” हे केवळ परिस्थितीला नव्हे तर विवाह हाच निर्दोष असावा याला सूचित करते.
[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pastel by Mary Cassatt, The Metropolitan Museum of Art, Gift of Mrs. Ralph J. Hines, 1960. (60.181)