वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-1 पृ. २९
  • काळजी वाहणारे लोक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • काळजी वाहणारे लोक
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे लोक संघटित का आहेत?
    देवाकडून आनंदाची बातमी!
  • विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “ऊब घ्या व तृप्त व्हा” असे नुसते बोलण्यापेक्षा करून दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
gbr13-1 पृ. २९

काळजी वाहणारे लोक

यहोवाच्या साक्षीदारांची एक अशी आंतरराष्ट्रिय संघटना आहे ज्यामध्ये जवळजवळ चाळीस लाख पवित्र शास्त्र विद्यार्थी ६९,००० पेक्षा अधिक मंडळ्यामधून संघटित झालेले आहेत. हे साक्षीदार केवळ देवाचा उद्देशच लोकांना सांगण्यासाठी समर्पित नाहीत तर ते येशूने आज्ञा केल्याप्रमाणे एकमेकांवर प्रेमही करतात. (योहान १३:३४, ३५) हे प्रेम व्यावहारिक मार्गाने व्यक्‍त होत आहे.

उदाहरणार्थ, काही दिवसापूर्वी इस्ट सान मारकॉस, कॅलिर्फोनिया, येथील मंडळीतील जवळजवळ ३० साक्षीदार शनिवारी सकाळी सहा वाजता न्याहारीकरता जमले होते. त्यांच्या मनात एक खास योजना होती ती म्हणजे—मंडळीतील ज्यांना कोणाला त्यांच्या घराची काळजी घेण्यास मदत हवी असेल त्यांना ती देणे.

मदतीची गरज असणाऱ्‍यांमध्ये एकपालकीय कुटुंब, विधवा व वृद्ध जोडपी होती. त्यांच्या घराचे छत दुरुस्त करणे, सिलींग (संरक्षणासाठी डांबराचा थर लावणे), सुरक्षिततेसाठी विद्युत दिवे बसविणे, गॅरेजचा दरवाजा लावणे, रंगरंगोटी करणे, झाडांची छाटणी करणे, आणि इतर आणखी कामे करावयाची होती. मदतीची आवश्‍यकता दिसून येण्याच्या एक महिनाआधी तयारी सुरु झाली आणि साहित्यांची जमवाजमव झाली.

ठरवलेल्या शनिवारी, न्याहरीच्या वेळी शेवटची तयारी करण्यात आली. काम करणाऱ्‍याची संघटना बनविण्यात आली. आणि प्रत्येकांना ठराविक कामाची नेमणूक देण्यात आली. त्या घरातील स्त्रीने सर्वांसाठी आल्पोपहाराची व दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली. दिवसभराच्या कामाचा आनंदी परिणाम ज्यांचे घर दुरुस्त केले त्यांच्यावरच नव्हे तर मंडळीतील प्रत्येकांवर झाला. (g93 2/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा