आजच्या काळातील धावपळीचा सामना करणे
काम करणारा मनुष्य आठवड्याच्या शेवटचे शनिवार-रविवार हे सुटीचे दिवस दूरदर्शनवर फुटबॉलचा सामना पाहण्यात घालवितो व मग कुरकुरतो की, त्याच्या मुलांना पशू संग्राहलयास नेण्यास त्याला वेळ मिळाला नाही. बायको दर आठवडी दूरदर्शनवरील धार्मिक कार्यक्रम बघण्यात वेळ घालविते व मग हळहळते की, घरची कामे उरकण्यास वेळच पुरत नाही. मग, ही समस्या वेळेची आहे की, त्याचा गैरवापर करण्याची?
वेळेवरील व्यवस्थापन सुस्थितीत टिकविण्यासाठी पवित्र शास्त्रामधील फिलिप्पैकरांस १:१० मधील तत्त्वाचे पालन करणे योग्य आहे. ते म्हणतेः “अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची पक्की खात्री करा.”—न्यू.व.
होय, प्रथम अग्रक्रमाच्या गोष्टींची व्यवस्थित मांडणी करा की ज्यायोगे हे ठरविणे सोपे होईल की, जे गाळलेच पाहिजे ते तितक्या महत्त्वाचे नाही. ज्या कामाचा उरक आठवडाभरात करावयाचा आहे त्याची एक यादी तयार करा व त्याची विभागणी या दोन गटात कराः (१) मी काय केलेच पाहिजे आणि (२) मला काय करायला आवडेल.
प्रापंचिक नोकरी, बाजारहाट, घरातील दुरुस्तीची कामे तसेच कुटुंबासोबत वेळ खर्च करणे या गोष्टी पहिल्या गटात मोडतील. खऱ्या ख्रिस्तीजनांकरता सभांना उपस्थित राहणे, इतरांसोबत आपल्या विश्वासाची सहभागी करण्यासाठी वेळ देणे आणि शास्त्राभ्यास करणे यांनाही अग्रक्रम असावयास हवा.—मत्तय ६:३३.
जर यादी वाढतच आहे असे दिसत असले तर काही गोष्टी जरी उरकणे जरुरीच्या असतील तरी त्या तितक्या महत्त्वाच्या नसतील. किंवा कदाचित तुम्ही एकाच वेळेला दोन कामे उरकू शकाल, जसे की, तुम्हाला घरातील कामे करायची आहे तर ती करतानाच मुलांनाही ती कशी करावीत हे का शिकवू नये? यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढेल इतकेच नसून तुम्हाला आपल्या मुलांसोबत घालविण्यासाठी आनंदाचा वेळही मिळेल.
पण मग, ज्या गोष्टी तुम्हाला “करायला आवडतील” अशा यादीविषयी काय? त्याविषयीची शक्यता कदाचित उपलब्ध असेल पण सर्व गोष्टी करणे जमणार नाही. यासाठी अशा कामांचे मूल्यमापन करा. (लूक १४:२८) ही कामे तुम्हावर अधिक भार लादतील किंवा तो कमी करतील? यामुळे घरखर्चाचा बोजा तर वाढणार नाही? शिवाय ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत त्यांच्या आड या येणार नाहीत ना?
तुमची यादी कामांनी भरगच्च करण्याचे टाळा. तसे झाल्यास करावयाची कामे बघून तुम्हाला सतत वेड्यासारखी धावपळ करावी लागेल. आपले काम करण्यास पुरेसा वेळ द्या. एका सेवानिवृत्त इमारत कंत्राटदाराने एका तरुणाला चहापानाला येण्याचे आमंत्रण दिले त्यावेळी एक उत्तम सल्ला दिला. त्या तरुणाने, “मला एके ठिकाणी ४:५० वाजता पोहंचणे आहे,” असे म्हणून ते आमंत्रण नाकारले.
“ती कसली भेट ठरवली आहेस?” कंत्राटदाराने विचारले. “जी भेट ठरवता ती अर्धवट नव्हे तर पूर्ण तासाची ठरवा,” तो म्हणाला. “कारण अर्धवट भेटीमुळे जी धावपळ होते ती मरणप्राय असू शकते.”
सामना देणे इतके मुश्कीलीचे का?
वर नमूद करण्यात आलेले प्रस्ताव कदाचित साहाय्यक ठरतील. पण हे लक्षात असू द्या की, दबाव व घाई ही आम्ही हयात असणाऱ्या या “कठीण” काळाच्या मूर्त गोष्टी आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) आजचे जग खरेच धावपळीचे जग आहे. पण आपसातील मानवी नातेसंबंधाचा होत असलेला ऱ्हास व वाढत असलेल्या जागतिक समस्या यामुळे ही सर्व घाई व धावपळ लोकांना कसलाच फायदा पोहचवीत नाही.
खरे म्हणजे, जग हे उसन्या वेळेवर जगत आहे. कारण पवित्र शास्त्र इशारा देतेः “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथकर ७:२९) आम्ही ज्या काळात आज आहोत त्याच काळाकडे येशूने अंगूली दर्शवून म्हटले होते की, सध्या जगात अस्तित्वात असणारा त्रास हा देवाचे राज्य जवळ आले आहे याचा पुरावा आहे. (लूक २१:१०, ११, २८-३१) दियाबल सैतान, “आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त” झालेला आहे. (प्रकटीकरण १२:१२) त्याचे सबंध जगीक व्यवस्थीकरण नाशाकडे झेप घेत आहे, व तो चुकविण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत!
हे खरे की, नाशाप्रत झेपावणाऱ्या आजच्या जगाबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. तरीपण स्वतःच्या जीवनात शांती व स्थैर्यता आणण्यात तुम्ही पुष्कळसे करू शकता. पण नाही, मादक औषधे हे त्याचे उत्तर नाही. तसेच वेळेच्या व्यवस्थापनेनुसार आखण्यात आलेले तंत्रही प्रत्येकाच्या उपयोगी पडू शकणार नाही. तर पवित्र शास्त्राचे ज्ञान व समज या गोष्टी त्यापेक्षा कैकपटीने अधिक साहाय्यक अशा आहेत. पवित्र शास्त्र?
होय, कारण पवित्र शास्त्रच स्वतः असे म्हणते की, ख्रिस्तीजनांनी “सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.” (१ तीमथ्य २:२) हे शक्य आहे का? होय. कारण जरी तुम्ही या “शेवटल्या काळा”च्या कठीण दबावांचा अनुभव घेत आहात तरी जीवनाविषयीचा ताजा व आल्हाददायी दृष्टीकोण वाढविण्यात ते तुमची मदत करते.
तुम्ही करीत असलेली नोकरीच विचारात घ्या ना. तुमचे जीवन हे जडवादी गोष्टींऐवजी “सुभक्तीने व गंभीरपणाने” वागण्यामध्ये गुंफलेले असल्यास ज्या वस्तु घेणे सध्या परवडणारे नाही त्या जमा करण्याच्या घाईत तुम्ही गुंतणार नाही. “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे,” हे जाणून असल्यामुळे तुम्ही “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यातच तृप्त” राहण्यात समाधानी असाल. (१ तीमथ्य ६:८, १०) शिवाय तुमची नोकरी ही तुमच्या जीवनात दुय्यम पदावर असल्यामुळे जरूर तो आराम व निवांत वेळ तुम्हाला काढता येईल. “कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठीपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.”—उपदेशक ४:६.
काहींना आपल्या कामात काट करता आली. एका मोठ्या उद्योगात संचालक पदी असणारे एक गृहस्थ म्हणतातः “२३ वर्षांच्या परिश्रमानंतर मला चांगला पगार, मोफत वैद्यकीय तपासणी, पेन्शनमध्ये भरपूर वाढ व इतर सोयी मिळू लागतील. पण या सर्व गोष्टींच्या प्राप्तीस्तव तुम्हाला तुमच्या कामावर अधिक वेळ व शक्ती खर्चावी लागते. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. शिवाय दर वेळी, कामाशिवाय दुसरे नवीन असे काही तुम्हापुढे येत राहते. अशावेळी तुम्ही म्हणताः ‘क्षमा असावी, मी बराच कामात आहे.’” या कारणास्तव या गृहस्थांनी आपले प्रतिष्ठित काम सोडून दिले. यामुळे त्यांना साधे राहणीमान पत्करावे लागले हे खरे. पण त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासाठी व ख्रिस्ती कार्यासाठी अधिक वेळ देता येऊ लागला.
योग्य त्या गोष्टींना प्राधान्य देणे
आम्ही ज्या कठीण काळात जगत आहोत त्याच्या दृष्टीने बघता खऱ्या ख्रिश्चनाने आध्यात्मिक गोष्टींत हयगय करून चालणार नाही. जक्कय या पवित्र शास्त्रातील श्रीमंत जकातदारास विचारात घ्या. येशूबद्दलची अधिक जाणीव व्हावी म्हणून तो एकदा, येशू गावातून जात असता त्याला नीट पाहता यावे म्हणून झाडावर चढून बसला. वृत्तांत म्हणतोः “मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणालाः ‘जक्कया, त्वरा करून खाली उतर. कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.’ तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.”—लूक १९:२-६.
येशूचे आदरातिथ्य करून व त्याजबरोबर आध्यात्मिक गोष्टींची चर्चा केल्याने जक्कयला केवढे फायदे झाले असतील त्याची कल्पना करा. येशूने जक्कयाला जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे हे समजाविण्यात मदत दिली, की ज्यामुळे जक्कयने भौतिक गोष्टींवर अधिक जोर देण्याचे सोडून दिले. त्याने म्हटलेः “प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यांस देतो; आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल ते चौपट परत देतो.”—लूक १९:८.
याचप्रमाणे आज खरे ख्रिस्ती आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्याची प्रत्येक संधि साध्य करण्यात उत्सुक आहेत. भौतिक गोष्टींच्या प्राप्तीत त्यांना कोणताही रस राहिलेला नाही. उलटपक्षी, देव व त्याच्या उद्देशांविषयी माहिती देणारी प्रकाशने त्यांच्या हाती पडताच त्याचे मनःपूर्वक वाचन करण्यास प्राधान्य देतात. जेव्हा समविश्वासू ख्रिस्ती बंधूंच्या सहभागितेतील सभा असतात तेव्हा शिक्षण व सहवास यातून उत्तेजक शिक्षण घेण्यात एक क्षणही ते वाया घालवीत नाहीत.
दुसरे उत्तम उदाहरण लोटाचे आहे. देवाच्या दिव्यदूताने त्याला इशारा दिला की, सदोम व गमोराचा नाश करण्यात येणार. लोटास इतरांविषयीची काळजी होती म्हणून तो “आपल्या जावयास म्हणालाः ‘उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण यहोवा या नगराचा नाश करणार आहे.’” पण लोटाने स्वतः काय केले? “तो दिरंगाई करू लागला,” त्यामुळे देवदूत त्याला विलंब न लावता देवाने ठरविलेल्या सुरक्षेच्या स्थळी पळून जाण्यास आर्जवीत राहिला. तो म्हणालाः “त्वरा करा. तिकडे पळून जा; कारण तुम्ही तेथे जाऊन पोहंचेपर्यंत मला काही करता येत नाही.”—उत्पत्ती १९:१४, १६, २२.
आजच्या जगाने सदोम व गमोराचे व्याप्त रुप धारण केले आहे व त्यांच्याप्रमाणेच नाशाला तोंड देऊन आहे. या कारणास्तव पवित्र शास्त्रात पूर्वभाकित करण्यात आलेल्या या येणाऱ्या नाशाची ग्वाही देणे हे यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवनातील प्रथम कर्तव्य आहे. तर मग, या ग्वाहीविषयी संशोधन करणे या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात प्रथम स्थान द्याल का?
निष्फळ उद्योगांच्या मागे धावपळ करीत राहणे हे कोणताही फायदा मिळवून देणार नाही; उलट दुःख व मनोभंगच होणार हे निश्चित! त्यापेक्षा देवाविषयी तसेच एक नवीन व्यवस्थीकरणाची स्थापना करण्याच्या त्याच्या उद्देशाविषयी आत्ताच शिकून घेणे हे फारच बरे ठरेल. कारण त्या नव्या व्यवस्थेत जीवन हे वेडेपणातील धावपळीचे नसणार.—२ पेत्र ३:१३; यशया ६५:१७, २१-२५; स्तोत्रसंहिता ३७:१०, ११.
दरम्यान, वेड्यासारखे नव्हे तर उद्योगी असण्यात मग्न रहा. जेव्हा देवाच्या उद्देशाबाबत शिकण्याचा अवसर येतो तेव्हा त्यात उशीर, दिरंगाई मुळीच करू नका! त्याला तुमचे प्राधान्य द्या. (g87 2/22)
[पानांवरील चौकट]
निष्कारण घाई न करण्यासंबंधीचे सूज्ञ इशारे!
“जो धनवान होण्याची उतावीळ करतो त्याला अद्दल घडल्याशिवाय राहात नाही.”—नीतीसूत्रे २८:२०.
“उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो उतावीळ करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.”—नीतीसूत्रे २१:५.
“बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.”—नीतीसूत्रे २९:२०.
“बोलण्याची घाई करू नको. खऱ्या देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले अंतःकरण उतावळे करू नको.”—उपदेशक ५:२.
[पानांवरील चित्र]
वेळेचा शिस्तबद्ध आराखडा न आखल्यामुळे तसेच एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे समाविष्ट केल्यामुळे घाई होत असते
[पानांवरील चित्र]
जक्कयाने आपल्या जीवनात योग्य गोष्टींना प्राधान्य द्यावे यासाठी येशूने त्याला मदत दिली