पृथ्वीवर शांती—केवळ एक स्वप्न का?
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या कंपायमान अनुभवातून बचावून राहिल्यानंतर चोहोकडिल लोकांनी शांतीची उत्कंठा प्रदर्शित केली. “आम्हास ही शेवटली संधी आहे” असे अमेरिकन सेनानी डग्लस मॅकआर्थर यांनी घोषीत केले: “आम्ही जर आताच कोणत्या मोठ्या प्रमाणातील आणि न्याय्य योजना आंखल्या नाही तर हर्मगिद्दोन आमच्या दाराशी आहे हे नक्की!”
त्याचवर्षी संयुक्त राष्ट्र सभेच्या सनदेवर सह्या झाल्या. या सनदेचे आश्वासन आहे: “आम्ही, जे या संयुक्त राष्ट्र सभेचे सदस्य आहोत ते हा निश्चय जाहीर करतो की भावी पिढीला युद्धाच्या भयानक आपत्तीपासून बचावून ठेवू . . . शिवाय आंतरराष्ट्रीय शांती व सुरक्षितता टिकवून ठेविण्यात आमचे सर्व बळ संघटीत करू.”
तेव्हापासून राजकीय तसेच धार्मिक नेते संयुक्त राष्ट्र सभेचे सतत गुणगान गात आहेत. १९६१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपति जॉन एफ. केनडी यांनी तिला: “या युगातील आमची अंतिम व उत्तम आशा” असे संबोधून पुढे म्हटले: “येथे युद्ध सामुग्रीला दूरवर लोटून शांतीची उपकरणे जोपासली आहेत.” तसेच १९६५ मध्ये पोप पॉल सहावे, यांनी म्हटले: “पृथ्वीवरील लोक संयुक्त राष्ट्र सभेकडे एकवाक्यता आणि शांती प्राप्तिची शेवटची आशा म्हणून वळत आहेत.”
तथापि आजतागायत, शांती तर नाही! उलट, तेव्हापासून जगात जागोजागी जी युद्धे झाली व चाललीत त्यात करोडोंची प्राणहानी झाली. शिवाय संयुक्त राष्ट्र सभेतील गोंधळात अधीक भर पडली. युनोने अलिकडेच १९८६ वर्षास आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष घोषीत केले होते. पण अनेकास आजही हा प्रश्न भेडसावितो की: “शांती, कधी खऱ्या अर्थाने अनुभविण्यास मिळेल का?”
दुसरी आशा
पण ख्रिस्ताच्या जन्मवेळी देवदूतांनी घोषीत केलेल्या “पृथ्वीवर शांती,”च्या घोषणेबाबत काय? (लूक २:१४) धार्मिक स्तंभलेखक टॉम हारपर यांनी आपल्या लेखात म्हटले: “देवदूतांनी गायिलेल्या शांतीबद्दल पाहता, ती काही वैयक्तित स्वरूपांतील; येशूच्या बाहूंत अगदी सुरक्षित, अंतर्गत विचाराना समाधान देणारी अशी नव्हती तर तिचा अर्थ अशी शांती जी न्याय वर्चस्वाखाली राज्य करेल, भयास दूर करील, तसेच युद्धांना विचारातही येऊ देणार नाही.
मानवी दृष्टीकोनातून पाहता हे सत्य अशक्य कोटीतले वाटेल. तरीही ज्याच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी गायन केले त्याजबद्दल पवित्र शास्त्र अभिवचन देते: “त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल.”—स्तोत्रसंहिता ७२:७, ८.
होय, येथे जे काही भाकीत आहे ते देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या पृथ्वीव्याप्त अधिपत्याबद्दलचे आहे. त्याची पूर्णता, मरीयेस, तिचे बाळ येशू याजबद्दल देवदूताने जे अभिवचन दिले होते त्याच्या पूर्णतेत घडण्याची हमी आहे: “तो . . . युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३२, ३३.
आपण कदाचित पृच्छा कराल, जेव्हा की ख्रिस्ती लोक युद्धास जाण्यास व एकमेकांची हानी करण्यास कचरत नाहीत तर हे कसे शक्य होणार? अशी ही खरी शांती, खरोखरी स्थापित होईल, हा विश्वास बाळगण्यास आम्हापाशी कोणता आधार आहे?
“ख्रिस्ती” जे मुळात ख्रिस्ती नाहीत
प्रथम ही स्पष्टता होणे जरूरीचे आहे की खरे ख्रिस्तीत्व हे काय आहे व काय नाही. स्वतः येशूने म्हटले आहे: कोणीही व्यक्ति, तो स्वतः म्हणवितो म्हणून ख्रिस्ती नाही. प्रत्यक्षांत, तर त्याने हा इशारा दिला: “खोट्या संदेष्ट्यांविषयीं जपा ते मेंढरांच्या वेषाने तुम्हाकडे येतात.” येशूने पुढे म्हटले:
“त्या दिवशी मला बहुत म्हणतील: प्रभूजी, प्रभूजी, आम्ही . . . तुमच्या नामाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यास स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अधर्म करणाऱ्यांनो, मजपुढून निघून जा.”—मत्तय ७:१५, २१-२३.
येशूने हा नियम दिला: “तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांस ओळखाल.” (मत्तय ७:१६) खरोखरी, हा केवढा साधा सरळ नियम आहे, किंवा सत्य आहे. कॅनडातील, द व्हॅनक्युवर सन नामे पत्रकांत स्तंभलेखक, स्टीव्ह व्हायसॅल यांनी हा मुद्दा स्पष्ट केला: “ख्रिस्तीत्वाच्या नावाखाली हे किंवा ते कसे घडले किंवा केले व तसे करणे केवढ्या चुकीचे होते, वगैरे वगैरे; असे वेळोवेळी आपण लोकांकडून ऐकत असतो. होय ते चुकीचे होते . . . पण जे सर्व तसे म्हणतात तेही, ज्यांनी चुका केल्या त्यांच्यासारखेच ख्रिस्ती होते.
“अहो, ते तर स्थिरावलेल्या चर्चेसचे म्हणणे आहे, असे तुम्ही म्हणाल. बरे, पण, यांना कोणी कधी म्हटले आहे की, ही स्थिरावलेली चर्चेस ख्रिस्ती आहेत?
“इकडे पोपने मुसलोनीला आशिर्वाद दिले, व असेही पुरावे उपलब्ध आहेत की या आधीच्या काळात असे अनेक पोप झाले ज्यांनी वेळोवेळी केवढी घृणित कृत्ये केली. तर मग कोण म्हणू शकेल की ते ख्रिस्ती होते?
“तुम्हास वाटेल की कोणी जर पोप आहे म्हणून तो ख्रिस्ती असावा. केवळ, कोणी तोंडाने म्हणतो, मी ख्रिस्ती आहे म्हणून याचा अर्थ तो तसा आहे असा होत नाही—जसे की कोणी दाव्याने म्हणेल, मी मेकॅनिक आहे पण तो कदाचित नसेल.
“ही खरोखरी आश्चर्याची गोष्ट आहे की अनेकास वाटते, उत्तर आयर्लंडमध्ये चालू असलेले युद्ध पवित्र युद्ध आहे. ती साक्षात लबाडी आहे.
“कोणताही ख्रिश्चन दुसऱ्या ख्रिश्चनाविरुद्ध युद्ध पुकारू शकत नाही, ते तर असे होईल की तो मनुष्य स्वतःबरोबर लढत आहे. खरे ख्रिस्ती, येशू ख्रिस्ताच्या शिकवणूकीनुसार एकमेकांचे बंधु व भगिनी आहेत . . . ते जाणून बुजून एकमेकांची कधी प्राणहानी करणार नाहीत.”
पवित्र शास्त्र या विषयास अगदी स्पष्टतेत समोर मांडताना म्हणते: “यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड होतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवापासून नाही. व जो आपल्या बंधुवर प्रीति करीत नाही, तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीति करावी. जसा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधुचा वध केला तसे आपण नसावे.”—१ योहान ३:१०-१२.
मग हे स्पष्ट आहे की पृथ्वी-व्याप्त शांती स्थापीत करू शकतील असा कोणताही आधार चर्चेस पुरवू शकत नाहीत. त्यांचा इतिहास काय दाखवितो? तो हे स्पष्ट करतो की त्यांचेच सदस्य, जी दोन महान जागतिक महायुद्धे झाली त्यातील युद्ध प्रवीण होते. त्यांनी आपसात केवळ एकमेकांचीच नव्हे तर निरपराध स्रिया मुलांचीही प्राणहानी केली.
मग, असे आहे तर चिरकाल शांती अनुभवास येण्याची आशा बाळगण्यास आधार आहे का?
युद्धास अशक्य बनविणे
आपले खरे अनुयायी कसे असतील याचे वर्णन स्वतः येशूने केले आहे. तो म्हणाला: ते “शांती करणारे,” असतील. (मत्तय ५:९) त्याने त्यांचे ओळखपत्रही दिले: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” याला जोडून येशूने म्हटले: माझे अनुयायी “जसा मी जगाचा (भाग) नाही, तसे तेही जगाचे नाहीत.”—योहान १३:३५; १७:१६.
या शिकवणूकीचा विचार करता सुरवातीचे ख्रिस्त अनुयायी कोणाही राष्ट्राच्या युद्धात सहभागी होत असतील हे खरे मानाल का? या विषयावरील वादविवादात प्राध्यापक रिओ एम. ख्रिश्चनसन, द ख्रिश्चन सेंचुरी पत्रिकेत लिहितात: “सुरवातीचे ख्रिस्ती लष्करात नोकरी करीत नसत.” रोनॉल्ड बेन्टन यानी नोंद केली की: “नवीन कराराच्या समाप्ति काळापासून ते इ.स १७०-१८० पर्यंतच्या कोणत्याही दशकांत कोणी ख्रिस्ती लष्करांत होते असा कोणताही पुरावा नाही . . . ओघाओघाने लष्कराचा हा विरोध ख्रिस्ती लोकांनी पूर्णपणे त्यागला.”
अशाप्रकारे ख्रिस्तींनी आपल्या समविश्वासू ख्रिस्तींविरूद्ध युद्धास उठावे अशी कोणतीही गोष्ट उल्लेखित नाही. ख्रिस्ताचे अनुयायी आपल्या आध्यात्मिक बंधुचा संहार करुन दियाबलाची मुले बनू इच्छिणार नाहीत. ते अधिपति या नाते मनुष्यापेक्षा देवाला अधिक मानतात. (प्रे. कृत्ये ५:२९) यास्तव सबंध पृथ्वीवर जर केवळ खऱ्या ख्रिस्तीजनांची वस्ती असती, तर युद्धाची शक्यता नव्हती!
आनंदाची गोष्ट ही आहे की, पवित्र शास्त्र भाकीत करते की तशी परिस्थिती प्रत्यक्षात येणार. ते म्हणते: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील. आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही. ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) हे शब्द न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्र सभेची जी टोलेजंग इमारत उभी आहे, तिच्या समोरील हमररस्त्याच्या पलिकडिल एका दगडी भिंतीवर कोरलेले आहेत, पण हे उघड दिसत आहे की युनोच्या सदस्यांनी त्यांची पूर्णता केलेली नाही. परंतु सुरवातीच्या ख्रिश्चनांनी केली होती.
मशहूर चर्च इतिहासकार सी.जे. कॉडोक्स स्पष्ट करतातः “सुरवातीचे ख्रिस्ती येशूचे शब्द जसेच्या तसे पाळीत . . . त्यांचा धर्म शांतीच्या निकट संबंधात आहे हे ते लक्षपूर्वकतेत सिद्ध करीत होते. ज्यात रक्तपात संबंधित आहे अशा युद्धांचा ते आग्रहाने धिक्कार करीत. ते स्वतःस जुन्या करारातील त्या भविष्यवादाशी जुळवून घेतात जो हे भाकीत करतो की युद्ध शस्त्रांचे रूपांतर शेतीच्या अवजारात केले जाईल.”—यशया २:४.
यास्तव, पृथ्वीवर शांती, हे काही असाध्य स्वप्न नाही. ख्रिस्ताच्या शिकवणूकीस चिटकून राहिल्याने सुरवातीच्या त्याच्या अनुयायांत युद्ध हे जसे अशक्यप्राय बनले होते. तसेच सबंध पृथ्वीवर अखेरीस शांतीची स्थापना होणार या आशेलाही आधार पुरविला होता. आजही, पृथ्वीवर शांती स्थापित होण्याची आशा बाळगण्यास तसाच आधार आहे का?
आज आशेला आधार आहे
एनसायक्लोपिडीया कॅनडा हा शब्दकोश निरिक्षितोः “आमच्या समान शकाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकात येशू व त्याच्या शिष्यांनी जे ख्रिस्तीयत्व अनुसरिले त्याचे पुनरूज्जीवन आणि पुनर्स्थापना आज यहोवाचे साक्षीदार जी कामे करीत आहेत त्यांच्या द्वारा झाली आहे . . . ते सर्व आपसात भाऊ भाऊ आहेत.”
हे वास्तविक सत्य आहे की ज्या काळांत राष्ट्रे दुसऱ्या जागतिक महायुद्धात गुंतलेली होती तेव्हा यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ताच्या शिकवणूकीमधील त्या आज्ञा पाळून चालत होते: “एकमेकांवर प्रीति करावी,” आणि “शांती करणारे” बनावे.—योहान १३:३४; मतय ५:९.
होय, ते तसे करीत. द नाझी परसीक्युशन ऑफ द चर्चेस, १९३३-४५, नामे पुस्तकात लेखक जे.एस. कॉनवे स्पष्ट करतात: “त्यांचे प्रकरण पवित्र शास्त्रातील आज्ञेवर आधारित असून त्यांनी (यहोवाच्या साक्षीदारांनी) शस्त्रे उचलण्यास स्पष्ट नकार दिला.” ख्रिस्ताच्या शिकवणूकीना निष्ठा व्यक्त करण्यातील त्यांची भूमिका इतरांच्या कृतीशी परस्परविरोधक कशी होती हे पाहण्यात, सेंट ॲथनी मेसेंजर, हे रोमन कॅथोलिक पत्रक म्हणते: “यहोवाचे साक्षीदार ‘प्रस्थापित चर्च’ कक्षेबाहेर राहतात व धर्मी वा निधर्मी सरकार जे काही निर्णय घेतात त्यावर आशीर्वाद मागण्याची कोणतीही जबाबदारी स्विकारीत नाही. राजकारण व अर्थशास्त्र यांचेपासून ही जी अलिप्तता पाळली जाते ती हजारो सदेच्छूंना सध्या काहीवेळा चर्च आणि सरकार यांचे मध्ये ज्या सोईस्कर तजवीजी होतात त्याहून अधीक नवीन कराराच्या आत्म्याकडे नेणारी वाटते.
चोहोकडील यहोवाचे साक्षीदार त्यांच्याठायीची शांतीची आशा, संयुक्त राष्ट्रसभा किंवा इतर कोणाही मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे, तर शांतीचा अधिपती येशू ख्रिस्त याच्या राज्याधिकाराखाली पूर्ण होईल ही खात्री बाळगून आहेत.
जर सर्वांनी तेच केले तर काय? होय, कल्पना करा की प्रत्येकजण, “एकमेकांवर प्रेम करा,” आणि “शांती करणारे” असा या ख्रिस्ताच्या शिकवणूकीस अनुसरतील तर केवढे निराळेच असेल!
पृथ्वीवर खरी शांती—लवकरच!
‘पृथ्वीवर शांती’ हे शब्द गव्हाणीत झोपलेल्या बाळाच्या प्रतिमेसह अनेकदा ख्रिस्मस सणाच्या काळात कानावर पडतात. पण, हे ख्रिस्ताच्या पदाचे खरे चित्र आहे का? कधीच नाही. ख्रिस्त आज बाळ कुमारापेक्षा केवढ्या थोर पदी आहे—त्याला आज पवित्र शास्त्र मधील पुरातन भविष्यवादाच्या पूर्ततेत, अधिपत्य व सत्ता ही देण्यात आली आहे: “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला . . . शांतीचा अधिपति म्हणतील.”—यशया ९:६.
सबंध पृथ्वीचा देवाने नेमिलेला अधिपति या नात्याने ख्रिस्त पृथ्वीवर शांती आणील. पण हे कदाचित अनेक जसे अपेक्षितात तसे घडणार नाही. कृपया, आपले पवित्र शास्त्र उघडा व प्रकटीकरणाचे पुस्तक काढून १९वा अध्याय काढा, त्यांतील ११ ते १६ वचने वाचा. यांत ख्रिस्ताला देवदूतांच्या सैन्य आघाडीवरील एक बलाढ्य अधिपति असे चित्रित केले आहे. हे लक्षांत घ्या की शास्त्रवचने, ख्रिस्त जो “देवाचा शब्द” आहे तो लोहदंडाने राष्ट्रांचा मोड करील आणि त्यास वळवील की ज्यायोगे त्यासर्वांचे निर्मूलन होऊन शांतीदायक देवराज्याला मार्ग मोकळा होईल.
याप्रकारे, पृथ्वीवर शांती अनुभवास येईल. ती, संयुक्त राष्ट्र सभा किंवा कोणाही मानवी शांती संस्थेकरवी येणार नाही. तर केवळ देवराज्याच्या सरकारकरवी ती साकार होईल. आम्ही अशा काळात जगत आहोत ज्यात पवित्र शास्त्रातील तो भविष्यवाद पूर्ण होणार: “त्या राजाच्या अमदानीत स्वर्गिय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; . . . तर ते (राज्य) या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानिएल २:४४.
पूर्व भाकीत दैवी नाश, जो सध्याच्या सर्व सरकारांचा व त्यांना संपूर्ण पाठींबा देणाऱ्या सर्व धार्मिक संस्थाचा नाश करणार त्याचा विचार करता आम्ही आमची सद्य परिस्थिती काय आहे याचे परिक्षण करणे महत्वाचे ठरेल. आपण जर या मताशी सहमत आहात की युद्धांचा काहीच अर्थ होत नाही व तुम्ही पृथ्वीवर त्याकाळात जीवंत राहू इच्छिता जेव्हा विश्वशांती स्थापीत असेल, तर यहोवाच्या साक्षीदाराबरोबर संपर्क साधा. देवराज्य आम्हाला खाली लवकरच कशाप्रकारे पृथ्वीवर शांतीचे वास्तव्य स्थापित होणार हे शिकण्यात ते तुमचे आनंदाने सहाय्य करतील.
[पानांवरील संक्षिप्त आशय]
“आपण एकमेकांवर प्रीती करावी . . . काईन . . . ज्याने आपल्या बंधूचा वध केला तसे आपण नसावे.”
[पानांवरील चौकट]
हत्या करणारा जेव्हा शांतीकारक बनतो
दक्षिण अमेरिकेतील राज्यात सेवा करणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांतील प्रवासी देखरेखे एका वृद्ध जर्मन साक्षीदारासोबत घरोघरची सेवा करीत होते. एका दारी, आपण चर्च सदस्य आहोत असे म्हणणारी एक बाई म्हणाली: “मला यहोवाच्या साक्षीदारासोबत कोणतेही संबध ठेवावयाचे नाहीत, कारण ते आपल्या देशांकरिता लढत नाहीत.” दुसऱ्या जागतिक महायुद्धात तिने आपला एक पुत्र गमाविला होता, आणि तिला वाटे की साक्षीदारांनीही युद्ध प्रयत्नांत सामील असावे.
ते दोघे तेथून जाण्यास उठत असता, त्या वृद्ध जर्मन साक्षीदाराने त्या स्रीशी बोलण्याची परवानगी मागितली, ते म्हणाले: ‘मी त्या युद्धात आघाडीवर होतो, पण त्यावेळी मी अमेरिकनांच्या बाजूने लढलो नाही तर जर्मनीच्या बाजूला होतो. आणि ३३ अमेरिकन जवानांना स्वहस्ते ठार केल्यामुळे स्वतः हिटलरने मला मानपत्र दिले. त्यांच्यापैकी एखादा कदाचित तुझा मुलगा असावा. नक्की तर मी सांगू शकत नाही. पण त्या काळात, जेव्हा की तुमच्या धर्माचा सभासद होतो त्यावेळी मी यहोवाचा साक्षीदार असतो तर बरे झाले असते अशी प्रार्थना तुम्ही करण्यास हवी होती.’
त्या विधानाने त्या स्त्रीला एक निराळा दृष्टीकोन दिला. खरेच, एखादी व्यक्ति आपल्या समविश्वासूंना, केवळ तो वेगळ्या वंशाचा व राष्ट्राचा म्हणून ठार करूनही खरा ख्रिस्ती कसा असू शकेल?
[पानांवरील चित्र]
संयुक्त राष्ट्र सभेच्या प्रांगणातील भिंतीवर कोरलेला हा पवित्र शास्त्रामधील भविष्यवाद कोण पुरा करीत आहे?