ख्रिस्ताने ख्रिसमसला मान्यता दिलेली आहे का?
पृथ्वीवरील अनेक भागात ख्रिसमस काळात नेटिव्हिटी-ख्रिस्ताच्या जन्मदृश्याची चित्रे चोहोकडे झळकलेली दिसतात. या दृश्यात गोठ्यात, गव्हाणीतील निद्रिस्त येशू बाळ, जवळच मरिया-योसेफ, मेंढपाळ व मागी तसेच काही गाई ओणावून पाहात असल्याचे दिसतात. अशा प्रकारे ख्रिसमसचा देखावा व्हावा याला ख्रिस्ताने मान्यता दिलेली आहे का?
प्रत्यक्षात, ख्रिस्त जन्माचे दृश्य ज्याप्रकारे दाखविले आहे त्यावर कडाक्याची चर्चा झाली, एवढेच नव्हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयांसमोर खडाजंगी वाद झाला. टाईम मासिकाने गतवर्षी डिसेम्बर मध्ये रिपोर्ट दिला: “वर्षाच्या सुरवातीस सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. या मोसमात ख्रिस्त जन्माची दृश्ये सार्वजनिक उद्यानात तसेच ज्यांनी या वादकाळात लावण्याची रहित केली होती त्या महापालिकेच्या इमारतीवरही झळकली आहेत.
पण, प्रत्यक्ष वस्तुस्थितीत, हे ख्रिस्तजन्माचे दृश्य सरकारी इमारतीवर लावणे कायदेशीर ठरेल का हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात,” टाईम मासिकाने हे कबुल केले की, “हे प्रकरण निकालात काढण्यात असमर्थ ठरले.” परत यावर्षीही, न्यूयॉर्क मधील स्कार्सडेल जवळच्या ख्रिस्तजन्माच्या चित्र प्रकरणाचा ४ विरूद्ध ४ असा अनिर्णीत निकाल लागल्यामुळे उच्च न्यायालय स्पष्ट मार्गदर्शन देण्यात असमर्थ ठरले.
ख्रिस्तीत्वास पुरस्करणे?
ख्रिस्त जन्माच्या दृश्याचे विरोधक, ज्यांच्यामध्ये अमेरिकन सिव्हिल लिबरटीज् युनियनही सामील आहे, हा वाद मांडतात की ख्रिसमस हा देशांत धर्मप्रचारास प्रोत्साहन देतो म्हणून सनदेच्या विरूद्धतेत आहे. तेच, स्तंभलेखक, बिल हॉल, सियाटल पोस्ट इंटलीजेनसर पत्रकात लिहिताना हा विरोध मांडतात: “ख्रिसमस हा कोणाही प्रकारे ख्रिस्तीत्वास उज्वल करीत नाही.”
“अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियनला (ए.सी.एल.यू.) ही विचित्र कल्पना कोठून प्राप्त झाली कोण जाणे की ख्रिसमस हा ख्रिस्ती सण आहे? ख्रिसमस मोसमांत अमेरिकेतील कोणाही बाजार भागातून फेरफटका माराल तर ही भावनाच मनातून पार नाहीशी होईल.
“ख्रिसमसचा प्रत्यक्षांत ख्रिस्तीत्वाशी नाममात्र संबंध आहेत. ख्रिसमस हा संपत्ति, हाव आणि अधाशीपणा यांनी भरगच्च असा मूर्तिपूजकांचा सण आहे.
“ख्रिश्चनधर्म हा तुलनात्मकतेत, जो येशू ख्रिस्ताच्या शिकवणूकीवर आधारीत असलेला धर्म लोपीत आहे. तो एक असा धर्म होता ज्याचा उदारता, प्रेम, सहनशीलता आणि अहिंसा यांचेवर अधिक जोर होता.
“तरीही, ए.सी.एल.यू. केवढ्या उचखलपणे या निराधार निर्णयास पोहंचले की, कदाचित नावाच्या साम्यतेमुळे—ख्रिसमस आणि आजची ख्रिश्चन चर्चेस यांचा मूळच्या सत्य आणि आरंभाच्या ख्रिस्तीत्वाशी संबंध असेल.
“ए.सी.एल.यू. सर्वसाधारण चूक करीत आहे की ते समजतात ख्रिसमस हा ख्रिस्ती सण आहे, जो अमेरिकेतील साध्या लोकांतही प्रचलीत आहे तर याऊलट जे आहे ते सत्य आहे. जे सर्व ख्रिसमस सण पाळतात त्यांचेपैकी असंख्य असे आहेत जे चर्चला कधीच जात नाहीत. तो प्रत्यक्षांत असंस्कृत मौजेचा सण आहे.”
ख्रिसमस, “असंस्कृत मौजेचा सण”? हे खरे ठरू शकेल का? ख्रिसमस हा तर ख्रिस्ताचा जन्मदिवस ना?
कोणाचा जन्म दिवस?
नाही, तो ख्रिस्ताचा जन्मदिवस नाही. ख्रिस्ताचा जन्मदिवस न[वा] क[रार]तून किंवा कोणाही उगमापासून निश्चित करता येत नाही; असे सायक्लोपीडीया ऑफ बिब्लिकल थिओलॉजीकल अँड इक्लीझियास्टीकल लिटरेचर स्पष्ट म्हणते. एक गोष्ट तितकीच नक्की की ख्रिस्त डिसेम्बर, २५ ला जन्मला नाही. त्याच्या जन्मवेळी मेंढपाळ रात्रीच्यावेळी त्यांचे कळप शेतांत चारीत होते. हे काम ते डिसेम्बर मधील कडक थंडीच्या रात्री करू शकत नव्हते.—लूक २:६-८.
याशिवाय, लूथेरियन चर्चपाद्री जॉन. सी. मॅककोलीस्टर यांनी द ख्रिश्चन बुक ऑफ व्हाय यांत म्हटले आहे: “त्या काळी सर्वांची हीच भावना होती की, जन्मदिवस (मग तो प्रभूचा असो) पाळणे ही ख्रिस्तेतर पध्दत आहे. म्हणून इतर सर्व मूर्तिपूजक पद्धतीपासून स्वतःस अलिप्त ठेविण्याच्या प्रयत्नांत सुरवातीच्या ख्रिश्चनांनी येशूच्या जन्मतारखेची नोंद ठेविण्यासही स्पष्ट नकार दिला.”
मग डिसेम्बर २५ रोजी ख्रिसमस सण साजरा करण्याच्या पद्धतीस कोठून सुरवात झाली? रॉबर्ट जे. मायर्स लिखीत द सेलिब्रेशन्स—द काम्प्लिट बुक ऑफ अमेरिकन हॉलीडेज् या पुस्तकात म्हटले आहे: “ख्रिसमस सण साजरा करण्यास सुरवात होण्याआधी रोमी जगात डिसेम्बर २५ रोजी, द नतालीस सोलीस इनवीक्टी, म्हणजे अजिंक्य सूर्याचा जन्मदिन साजरा करीत. हा सण, जुलियन पंचागानुसार हिवाळ्यातील सूर्य दक्षिणायन काळात सूर्यदेवता, मिथ्रासचे सन्मानार्थ, साजरा करीत.”
“मिथ्रादैवताचे प्रथेशिवाय,” मायर्स पुढे म्हणतात, “इतर दैवतांचेही समर्थन होई.” रोमी लोक डिसेम्बरच्या शेवटास शनीदेवताचा स्वैराचरणी सण साजरा करीत, व जशी मायर्स स्पष्टता पुरवितात: “अखेरीस, पाद्रीवर्गाने, या शनीच्या जगतास निराळे रुप देऊन चर्च मध्ये खेचले.” मग यांत नवल कोणते की: ख्रिसमस कस्टम्स अराऊंड द वर्ल्ड नामें पुस्तक म्हणते: “प्युरीटीयन पंथी”यांनी या अधर्मीय सणाबद्दल नापसंती व्यक्त केली व त्यादिवशी कष्टांचे काम करणे व ख्रिसमास पाळण्याची मनाई करणारा कायदा मंजूर करू घेण्यात पुढाकार घेतला”!
ख्रिस्ताची मान्यता होती का?
काहीजण आक्षेप घेतील की ‘जसे सुरवातीचे ख्रिस्ती होते तसे प्युरीटीयन फारच कर्मठ होते. ख्रिसमस हा ख्रिस्तास गौरवितो.’ हे खरे का? ख्रिस्ताने नेहमी सत्याची बाजू घेतली पण ख्रिसमस तर असत्यालाही कवटाळतो. (योहान १४:६) शाळेतील प्राध्यापक आणि पाद्रीगटही म्हणतो: “तो ख्रिस्ताचा जन्मदिन आहे.” पण तो नाही. तुम्ही जर चांगले वागाल तर सांताक्लॉज तुमच्याकरिता बक्षीस आणेल; पण तेही खरे नाही. तसेच ख्रिस्त जन्माच्या चित्रास विचारात घ्या.
त्यातील अनेकात मागी किंवा ज्योतीष शास्त्री येशूच्या जन्मानंतर लगेच तेथे आलेले दाखवितात. तरी पवित्र शास्त्र हे स्पष्ट करते, ज्योतीष शास्त्री तेथे पोहचले त्यावेळी येशू तान्हे बाळ राहिलेला नव्हता तर घरी राहत असलेला वाढता बालक बनला होता. (मत्तय २:७-११) मग जो सत्यास एवढ्या विपर्यासतेत सादर करतो अशा सणास ख्रिस्त आपली मान्यता देईल असे तुम्हास खात्रीने वाटेल का?
याहिपेक्षा अधीक गंभीरतेचे, हे आहे की, ख्रिसमसद्वारा ही खोटी समजूत प्रचारात आहे की ख्रिस्त हा एक असहाय्य अवस्थेतील बाळ आहे. ख्रिस्ताच्या जन्माचे चित्र पुढे करून एका छोट्या मुलीने तिच्या आईस विचारले: “येशू कधी मोठा झाला का?” असे तिने का विचारले असावे? ती उत्तरली “तसे पहाता, गेल्यावर्षी मी पाहिल्यापासून तो तेवढाच आहे;” व ख्रिसमसही हीच प्रतिमा उमटवितो की ख्रिस्त आजही एक असहाय्य तान्हे बाळ आहे; ना की तो जसा आहे, एक राज्यकर्ता, बलाढ्य राजा, जो लवकरच पृथ्वीवरून सबंध अधार्मिकतेचा, तिच्या संबंधासोबत समूळ नाश करणार.—स्तोत्र २:९, १२; ११०:१, २; प्रकटीकरण १२:५; १९:१५, १६.
ख्रिसमसच्या दिवशी प्रत्यक्षांत काय करितात हे जर आपण लक्षात घेतले तर त्याला आपली मान्यता कशी देणार? “दारूडे आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता तो मोसम बराच त्रासदायक असतो कारण ख्रिसमस आत्मा म्हणे बाटल्यातून पुरवितात.” टाईम मासिक म्हणते: “या मोसमांत दप्तरात होणाऱ्या पार्टीत चुंबनांच्या वर्षावाने मस्त होऊन, लिपस्टिकचे ठसे उमटलेली स्वारी घरी पोहंचून, घरच्या लोकांना दुःखाच्या खाईत लोटत असते.” होय आजही ख्रिसमस पूर्वीच्या दिवसांतील स्वैराचारापासून सुधारलेला नाही.
क्युरीऑसीटीज ऑफ पॉप्युलर कस्टम्स् हे विल्यम एस. वॉल्श लिखीत पुस्तक म्हणते: “सुज्ञ आणि विचारवंतानी जरी वेळोवेळी धिक्कारले तरी पूर्वीच्या काळात ख्रिसमस मोसमात धमाल, अनीतीची वर्तणूक आणि असभ्यता ही, जणू बकानालिया आणि सटर्नालिया या दैवतांच्या गुणांची प्रतिकृति केवढ्या भयानकतेत करीत आहे.” होय, पूर्वीच्या काळातील ख्रिसमस मोसमांतील रानटी वृतिची चैनबाजी विश्वासास धक्का देणारी होती.
तुम्ही जर त्यांचा गंभीरपणे विचार केला तर गेल्या डिसेम्बर मध्ये द संडे एक्सप्रेस या दक्षिण आफ्रिकेतील पत्रकाने जो अंदाज व्यक्त केला होता, त्याजप्रमाणे आहे: “वर्षातला तो मोसम परतला,” असे म्हणून लेख सुरवातीस म्हणतो: “जेव्हा सणाचे वारे वाहू लागते व त्याची गती वाढू लागते, तेव्हा धार्मिक लोक म्हणतात: ‘चला आपण ख्रिस्ताला परत ख्रिसमस मध्ये लोटू या.’
“ख्रिस्त सुरवातीपासून त्यात नसल्यामुळे हे केवढे उचित ठरेल की, त्याला उद्देशून असे असलेले सर्व संदर्भ समूळ काढावे, आणि ख्रिसमसला कोणा अन्य नावाने संबोधावे.
“सर्व प्रकारचा व्यापार, अधाशीपणा व दारूबाजी, चैनबाजी या सर्व दुर्गुणांनी ख्रिस्ताच्या नामासं कलंकीत का करावे?”
आपण काय कराल?
हे निश्चित की ख्रिसमसला ख्रिस्ताची मंजुरी नाही. तो त्याच्या शिकवणूकीचा व त्याचा अपमान करतो. मग या वर्षी त्या मोसमात आपण काय कराल?
वर उल्लेखित दक्षिण आफ्रिकेतील वर्तमान पत्र सुचविते: “आपण प्रामाणिक बनू व सुरवातीस ज्यांचा होता त्यांना ख्रिसमास परत करू व सर्व प्रकारच्या पार्ट्या, मौजमजा आणि असभ्य मेजवान्या या सर्वांना कायमची काट देऊन, ख्रिस्त जन्माविषयक असे काहींच नाही हे ठाम मत बनवू.”
हे खरे की त्यात कोणतीही दांभिकता नसेल, कारण त्यांत त्याचे नाम गुंतलेले असो वा नसो ख्रिस्त अशा कोणाही स्वैराचारी विदेशीय सणास आपली मंजुरी देत नाही. (२ करिंथकर ६:१४-१८) तर मग आपण जर ख्रिस्ताची मंजुरी प्राप्त करू इच्छिता तर काय कराल? या आधी अवतरीत केलेले स्तंभलेखक बील हॉल उत्तर पुरवितात: “जो कोणी खरा ख्रिस्ती आहे, तसे पहाता, त्यांच्यापैकी फार थोडे आहेत, तो ज्याला ख्रिसमस म्हणतात त्या जगीक, आधुनिक सणापासून स्वतःस दूर ठेवील.”
चोहोकडिल यहोवाचे साक्षीदार हीच गोष्ट करीतात. ते, त्यांचा स्वर्गिय राजा, येशू ख्रिस्त याची मर्जी संपादण्यात ख्रिसमास सणाच्या कोणाही प्रकारांत सहभागी होत नाहीत. तर त्याच्या शिकवणूकीनुसार, केवळ विशिष्ट प्रसंगीच नव्हे तर वर्षभरांतील दर दिवशी जीवन जगण्याच्या प्रयत्नांत असतात. आपणही तेच इच्छिता तर ती पुरी करण्यात, यहोवाचे साक्षीदार आनंदाने आपले सहाय्य करतील.
[पानांवरील चित्र]
नेटिव्हिटीचे दृश्य ख्रिस्ताबद्दलचे सत्य शिकविते का?