शांतीचे स्तुत्य पठण, तरीही युद्धांचे गौरव
यांचे परिणाम काय?
तो १९१४ मधील डिसेम्बर महिना होता. युरोपांत पहिल्या जागतिक महायुद्धाचा जोर वाढत होता. सैनिकांच्या तुकड्या खंदकांतून एकमेकांस बिना अधिकार जागेवर तोंड देऊन होत्या. मग ख्रिसमसचा, डिसेम्बर २५चा दिवस उगवला आणि काहीं तरी उल्लेखनिय घडले.
द वॉर इन द ट्रेंचेस नामे पुस्तकांतील एका चित्रांत दाखविले होते, एकमेकां विरूद्ध निकराने लढणारे मित्रत्वाने एकमेकांना अलिंगन देत आहेत. त्याचा मथळा होता: “१९१४ मधील ख्रिसमसला ब्रिटीश आणि जर्मन सैन्याने सख्य साधले.” लेखक ॲलन लॉईड म्हणतात: “हे सैन्य, प्रत्यक्षांत बक्षिसांचे देवाण घेवाण करण्यास बिना अधिकार भूमिवर आपसांत भेटले . . . जशी मुष्टियुद्ध स्पर्धेंत एका फेरी नंतर मध्यांतर होतो, तसे ते वाटत होते.” एका सहभाग्याने म्हटले: आम्ही सर्वजण एकमेकांशी बोलत होतो, व भेट वस्तु देण्याच्या शोधात होतो.”
लढण्यापासून हा मध्यांतर का? कारण या ब्रिटीश व जर्मन सैनिकांना अशी शिकवण दिली होती की, ख्रिस्त जो शांतीचा अधिपति, त्याचा जन्म २५ डिसेम्बरला झाला होता; आणि त्याच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी असे गायिले नव्हते का: “पृथ्वीवर मनुष्यात शांती”? (लूक २:१४) मग हे तितकेच निश्चित की स्वतःस ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या कोणीही अशा प्रसंगी एकमेकांचा वध करणे उचीत ठरणार नाही.”
तरीही, ख्रिसमस काळात शांती पाळणे हे सर्वांनाच पटत नाही. लॉईड पुढे म्हणतात: “पाश्चिमात्य आघाडीवर जणू दुसरा ख्रिसमस स्थापन झाल्यासमान, बिना अधिकार जागेवर मित्रभावनांच्या मेळाव्याविरुद्धच्या संतापाने, तसे नसावे असा हुकूम असताही, एका एकी उचल खाल्ली त्यात सहभागी होणाऱ्यातील कमीत कमी दोन अधिकाऱ्यांना लष्करी शिक्षा भोगावी लागली.”
चर्चची भूमिका
आपले सदस्य त्यांच्याच समविश्वासूंविरूद्ध लढण्यास इतर देशांत जातात याबद्दल चर्चला काय वाटते? तसे पाहता, ख्रिस्ताच्या जन्मवेळी दिव्यदूतांनी जो शांतीचा संदेश दिला त्याचीच पोपटपंची ख्रिसमस दिनी पाद्रीवर्ग करीतो व सोबत येशूचे शांतीचा अधिपति म्हणून गुणगौरव करीतात. (यशया ९:६) तरीही, त्यांच्या चर्च सदस्याने विरुद्ध फळीच्या खंदकातील त्यांच्याच धर्माच्या लोकांना, मग तो ख्रिसमस दिन असो किंवा वर्षाच्या इतर कोणत्याही दिवशी जरी ठार मारले तरी हे आक्षेप घेत नाहीत.
अमेरिकेने, ज्यावेळी दुसऱ्या जागतिक महायुद्धांत प्रवेश केला त्यावेळी चर्च इतिहासकार रोनॉल्ड एच, बाइंटन म्हणाले: “अमेरिकेतील सर्व विश्वासाचे चर्च सदस्य अशाप्रकारे कधीही एकत्रित झाले नव्हते व राष्ट्राकरिता एवढे एकविचारी कधीही बनले नव्हते. हे एक पवित्र युद्ध आहे. येशूने खाकी गणवेष धारण केला आहे व तो आपल्या बंदुकीच्या नळकांडीतून पाहात असल्याचे दृश्य चित्रीत केले होते. जर्मन लोकांना हूण लोकांसमान दाखविले होते. त्यांचे पतन म्हणजेच पृथ्वीवरून रानटी लोकांचे निर्मूलन करण्यासमान होते.”—ख्रिश्चन ॲटीट्युड टुवर्ड वॉर ॲन्ड पीस, पान २०९, २१०.
होय, चर्चेसमधून शांतीकरिता केवळ ओठ हलविले जातात. पण तेथील व्यासपिठे, युद्ध प्रचारार्थ व इमारती त्या राष्ट्राच्या युद्ध प्रयत्नांची भरती केंद्रे बनतात. ब्रिटीशांचे बिग्रेडीयर जनरल फ्रँक पी. क्रोझीयर पहिल्या जागतिक महायुद्ध परिस्थितीबाबत म्हणाले होते: “आम्हापाशी ख्रिश्चन चर्चेसच्या रुपात रक्तपिपासू तयार करणाऱ्या सर्वोत्तम संस्था आहेत, आणि आम्ही त्यांचा सर्रास उपयोग करून घेतो.”
चर्चेसची भूमिका खरोखरी दांभिकपणाची होती याची दिवंगत प्रॉटेस्टंट पाद्री हॅरी इमरसन यांनी उघडपणे कबुली दिलेली आहे. त्यांनी म्हटले: “आमचा पाश्चिमात्य इतिहास एकानंतर दुसरे युद्ध यांनीच भरलेला आहे. आम्ही युद्धाकरिता लोकांस तयार केले, लोकांना युद्ध शिक्षण दिले. आम्ही युद्धांची प्रशंसा केली. मोठ मोठे योध्दे तयार केले. एवढेच काय पण, चर्चेसमध्ये युद्ध-झेंडेही फडकाविले . . . तोंडाच्या एका बाजूने आम्ही शांतीच्या अधिपतिचे स्तुतिगान करतो आणि दुसऱ्या बाजूने युद्धाचे गौरव करतो.”
दुसऱ्या जागतिक महायुद्ध काळात, या परिस्थीतीत काहीच बदल झालेला नाही. त्या महायुद्धाच्या पहिल्याच महिन्यात, न्यूयॉर्क टाईम्स मध्ये जो स्तंभलेख प्रकाशित झाला होता तो या पानावर तसाच दिला आहे, कृपया तो वाचणे. त्यात व्हिएना विश्वविद्यालयाचे इतिहास प्राध्यापक फ्रेड्रिक हीर, स्वतः रोमन कॅथोलिक असताही, याच गोष्टीवर भर दिल्याचे दिसते. कारण नंतर त्यांनी गॉड्स फर्स्ट लव्ह या पुस्तकात पुष्टी देताना म्हटले:
“जर्मन इतिहासातील भावनाशून्य सत्य हे स्पष्ट करते की क्रुस आणि स्वस्तिक ही तोवर एकमेकांच्या निकट येत होती जोवर स्वस्तिकने जर्मन कॅथोलिक चर्चच्या मनोऱ्यावरून विजय घोषीत केला नव्हता. मग चर्च व्यासपिठासभोवताली स्वस्तिक झेंडे फडकले, आणि कॅथोलिक व प्रॉटेस्टंट वेदांतीय पाद्रीगट व राजकीय नेते एकमुखाने हिटलर बरोबरील मैत्रीची प्रशंसा करू लागले.”—पान २४७.
परिणाम
चर्चने आपआपल्या राष्ट्रांच्या युद्धांना जो अंतःकरणपूर्वक पाठींबा दिला त्याचा एक परिणाम हा झालेला आहे की खिस्तेतर राष्ट्रांत ख्रिस्ती धर्म हा युद्धपिपासू धर्म आहे असे कोट्यावधी मानतात व ते त्यांच्या बरोबर कोणताहि सबंध ठेऊ इच्छीत नाहीत. त्यांच्या या दृष्टीकोनास आजही जो सबळ पुरावा आहे तो असा की चर्चेसने केवळ गतकाळात युद्धांना असा पाठींबा दिला एवढेच त्यात नाही तर आजही ते युद्धाबाबत तोच दृष्टीकोन बाळगून आहेत. द ख्रिश्चन सेंचुरी नामक पत्रक अहवाल देते:
“युद्धाबाबतच्या, गेल्या २० वर्षातील दृष्टीकोनाचा आढावा पाहता आजही अमेरिका, कॅनडा व पश्चिम जर्मनी मधील ख्रिस्ती युद्धाकडे, इतर देशातील ख्रिस्तेत्तर लोकांपेक्षा अधिक आपुलकीने पाहतात . . . जो आढावा घेण्यात आला त्यानुसार या राष्ट्रांतील ख्रिस्ती समाजात असे काही आहेत जे स्वतः ख्रिस्ती विश्वासास अनुसरण्यात कर्मठ असल्याचा दावा करत असताही, त्यांच्यात जे अधीक उदार वृत्तीचे त्यांच्याहीपेक्षा कैक पटीने अधीक युद्धास पाठींबा देण्याच्या वृतीकडे कललेले आढळले.”—डिसेंबर ३१, १९८०; पान १२८९.
युद्ध विषयांवर चर्चेसने जी भूमिका स्विकारली तिचा, स्वतःस ख्रिस्ती संबोधून घेणाऱ्या राष्ट्रातील अनेकांवर अंतर्गत परिणाम काय झाले असावेत असे तुम्हास वाटते? द ख्रिश्चन सेंचुरी नामक पत्रकात राजकीय शास्त्राचे प्राध्यापक रीओ. एम. ख्रिश्चनसन, हे चर्चासत्रात म्हणतात: “ख्रिस्ती, जसे एका हाताने नम्र तारकाच्या विश्वासास अंगिकारतात तसेच दुसऱ्या हाताने, तेवढयाच उत्साहाने धार्मिक किंवा राष्ट्रीय युद्धाना पाठींबा देतात.” ते पुढे लिहितात: “ते विश्वासाचे पतन करण्यात एवढे पुढे गेलेत की आज अनेक शतके विचारवंत, ज्या धर्म विचाराकडे एवढ्या व्यापकतेत पाहात होते त्यातही उपहासवृत्ती तसेच दोष दाखविणे सुरू झाले आहे.”—मे २५, १९८३.
धर्माबाबतची ही उपहासात्मक वृत्ती, काही वेळा अगदी बोचकमार्गी संवादीत होत आहे. उदाहरणार्थ, गत वर्षी एका मुस्लीम युवकाने आपण मुस्लीम असल्यामुळे मुस्लीमांची कत्तल करण्यास लेबननला जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी माईक रॉयको या स्तंभलेखकाने काही कठोर ताशेरे ओढले होते. त्यांनी म्हटले: “हा खलाशी पुरातन काळातील युद्धाचे नियम व प्रथा उपसत आहे” तसे पहाता ख्रिस्ती, “दुसऱ्या ख्रिस्तीवर युद्ध पुकारण्यात कधीच चोखंदळ नव्हते.” पुढे म्हटले “ते जर असते तर युरोपातील अलिकडील युद्धे कधीच झाली नसती.”
इतिहासातील सत्याकडे अंगुली दर्शवून रॉयको पुढे म्हणाले: “जर्मनीत सर्वच पंथीय ख्रिस्ती खच्चून भरले आहेत. पण अनेकदा तिला फ्रान्स, पोलंड सारख्या व इतरही ख्रिस्ती देशावर हल्ला करावासा वाटला. फ्रान्सने नेपोलियनच्या काळात युरोपातील इतर सर्व ख्रिस्ती राष्ट्रांना पायाखाली तुडविण्यात खंत मानली नाही.
“जर तसे काही असते तर विश्वासाने कधी ना कधी त्यांच्या रक्तदाबास उसळविले असते. जरी हा संशय मनी असला तरी, की ख्रिस्ताने त्याचा संदेश या मार्गी उपयोगात आणण्याच्या मनोदयाने दिला का? . . . व जर प्रत्येकाने त्या खलाशासमान विचार मनी बाळगले असते तर, ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांची कत्तल करणारी, व ज्यामध्ये सर्वकाळचा ऐतिहासीक उच्चांक गाठला, ती दोन जागतिक महायुद्धे कधीच घडली नसती.”
“प्रत्यक्षात” रॉयको उपहासाने पुढे म्हणतात: “समविश्वासू लोकांबरोबर लढण्यात बरेच फायदे आहेत. एक, जर युद्धात पकडला गेला व कैदेत मेला तर ख्रिस्ती दफन विधी मिळेल, याची खात्री बाळगू शकाल. मग हे त्यापेक्षा कितीतरी चांगले की कचरातळावर शव फेकून देणे. दुसरे, धार्मिक सणाचे दिवशी, त्या दिवसाच्या आत्म्याने खुशीत असल्यामुळे कैदखान्याच्या पहारेकऱ्याची एखादी, लाथ खाणे कमी होईल.”
या विधानातील मर्मभेदी विनोदाबद्दल तर काही संशय नाही. पण त्यातील सत्य तुम्ही नाकारू शकाल का? शिवाय आपण, जो शांतीचा अधिपति त्या येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहोत असा दांभिक भाव निर्माण करून असलेल्या चर्चेसकरिता अशी निर्भत्सना रास्त असल्याचे तुम्ही मान्य करणार नाही का?
पण आम्ही या आधुनिक जगात ख्रिस्ताच्या शिकवणूकीनुसार जगू शकत नाही असा दावा कदाचित पाद्रीवर्ग करेल. तरीही, अशा आक्षेपांच्या चर्चेत प्राध्यापक ख्रिश्चनसन या आधीच्या उल्लेखित लेखात लिहितात: “येशूच्या शिकवणी आणि युद्धाबाबतची—खासकरून आधुनिक युद्धाबाबतची जी उदाहरणे दिली, त्यांचे बद्दलची आम्हाला जी माहिती आहे ती, व्यवहारात आणणे गैरवाजवी ठरेल असे मला तरी मुळीच वाटत नाही.”
“येशू त्याच्या शत्रुंवर हातबॉम्ब फेकत आहे, मशीनगन चालवीत आहे, आगीचे डोंब फेकणारी शस्त्रे उपयोगात आणीत आहे, किंवा अणुबाँब टाकीत आहे, किंवा कोणा दूरक्षेपणीय शस्त्रांचा बसल्या जागेवरून असा मारा करीत आहे ज्यामुळे हजारों स्त्रिया, मुले मरत आहेत, जखमी, अपंग होत आहेत. असे विचार तरी कोणी, तेवढ्याच गंभीरतेने मनात आणू शकेल का? हा प्रश्न मुळात एवढा विवेकशून्य आहे की त्याच्या उत्तराची अपेक्षा नको. जर येशूला असे काही करता येत नाही व ते त्याच्या व्यक्तित्वाचे सत्य आहे तर त्याजशी एकनिष्ठ आहोत असे म्हणतो, मग हे सर्व आम्ही कसे करीत आहोत?”
तुम्ही जेव्हा अशा प्रश्नांना प्रामाणिकपणे तोंड द्याल त्यावेळी तुम्हास याची जाणीव होईल की: द टोरँटो स्टार पत्रकाच्या धार्मिक स्तंभ लेखकाने ख्रिसमसच्या सायंकाळच्या आवृत्तीत असे का लिहिले: “अमेरिका आणि रशियाने अणु शक्तिचे जे एवढे प्रचंड भांडार उभारले आहे याकडे कानाडोळा करणे म्हणजे ख्रिसमसचे विडंबन करण्यासमान आहे व ती ख्रिस्त आणि मानव जातीविरूद्धची अत्यंत घृणित विटंबना आहे.
या सोबतच या जगास ज्या सर्व समस्यांनी वेढले आहे त्या अत्यंत गुंतागुतीच्या बनल्याचे सर्वश्रुत आहे. मग याचा अर्थ हा की: पृथ्वीवर खरी शांती कधीच स्थापित होणार नाही? देवदूताने ‘पृथ्वीवर शांती’ ही जी घोषणा केली तिची पूर्तता निव्वळ एक स्वप्नच ठरणार का? असा काही निश्चित मुळाधार आहे का जो हा विश्वास बाळगण्यास पुरेसा आधार पुरवील, की सर्व वंशाचे व राष्ट्राचे लोक युद्धांच्या भयानक धोक्यांचा परत कधीही अनुभव न घेता एकमेकांच्या संगतीत खऱ्या शांतीत राहतील?
[पानांवरील चौकट]
न्यूयॉर्क टाईम्स
सोमवार, सप्टेंबर २५, १९३९
जर्मन सैनिकांना चर्चने परत एकत्रित केले
प्रॉटेस्टंट आणि कॅथोलिकांनी जर्मन रिचच्या विजयार्थ व यथार्थ शांतीकरिता प्रयत्न करण्यास बजाविले.
तारेने न्यूयॉर्क टाईम्सकरिता
फ्रँकफट-ऑन-द-मेन, जर्मनी, सप्टेंबर २४—जर्मनीतील प्रॉटेस्टंट व कॅथोलिक पाक्षिके आज अनेक प्रक्षोभक लेख प्रकाशित करून सैनिकांना, त्यांच्या राष्ट्राच्या संरक्षणार्थ लढा देण्यात कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व जर्मन सैनिकांनी सेंट मायकलच्या आत्म्याने लढा देत राहून जर्मनीला विजय व हक्काची शांती मिळवून देण्याचे, बजाविले जात आहे. एका कॅथोलिक पत्रिकेच्या मुखपृष्ठावर एका आद्य देवदूताचे चित्र दिले आहे, जो तलवार पाजळीत समोर येऊन एका अग्नीज्वलीत सर्पास भोसकतो व पवित्र भाल्याने जागीच ठार करतो.
पश्चिम व दक्षिण जर्मनीत आर्चबिशप आणि बिशप यांच्या अध्यक्षतेखाली कॅथोलिक धर्मसभा चालते, जी, पश्चिमेकडील सरहद्दीकडून जे शरणार्थी आश्रयार्थ येथे येतात त्यांच्या व्यवस्थापणात हिरिरीने मग्न असते. अनेक मठांचे रुपांतर रुग्णालयांत केले व मठवासी पुरूष आणि नन स्रिया रेड क्रॉसच्या मार्गदर्शनाखाली सेवा करीत आहेत.
जर्मनच्या कॅथोलिक बिशपने धर्मसभेमार्फत एक पत्र जाहीर करून त्यात म्हटले:
या निर्णायक घटकेत आम्ही आमच्या कॅथोलिक सैनिंकांना हा सल्ला देतो की त्यांनी फ्युररशीची एकनिष्ठ सेवा करावी आणि आपले सर्वस्व पणास लाविण्यास तयार असावे.
“आम्ही, सर्व विश्वासूंना अपील करतो की त्यांनी सर्वसमर्थ देवास, या युद्धांत आमच्या पूर्वजांचे राष्ट्रास आशीर्वादीत यश द्यावे व शांती प्रदान करावी, म्हणून, ईश्वरीय सहाय्य देण्याच्या प्रार्थनेत सहभागी व्हावे.”
याशिवाय प्रत्येक बिशपने आपआपल्या धर्मसभेस खास संदेश पाठविले. त्यातच व्टेनबर्गमधील रॉटनबर्ग येथील बिशपचा संदेशही होता; ज्याला गतवर्षी राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक निवडणूकीत मत देण्याचे नाकारल्यामुळे त्यांच्या धर्मसभेतून काढून टाकण्यात आले.
कार्डीनल आर्चबिशप बेरताम, जे जर्मनीतील एपिस्कोपल मंडळीचे मुख्य होते, त्यांनीही त्यांच्या मंडळीला राष्ट्रीय भक्तिपर संदेश दिला होता: “सर्व समर्थ देवावर विश्वास ठेविणाऱ्या तुम्ही सर्वांनी आपआपल्या अंतःकरणात भक्कम रहावे.”
[पानांवरील चित्र]
शांतीच्या अधिपतीची पाद्रीगट स्तुति करतो, तरीही युद्धावर आशिर्वाद मागतो
[चित्राचे श्रेय]
El Comercio, Quito, Ecuador
[पानांवरील चित्रं]
आपल्या व्यक्तित्वाशी खरे राहण्यात जर येशू हे करू शकत नव्हता, तर आम्ही कसे ते करून त्याजशी खरे राहू शकतो?
[चित्राचे श्रेय]
U.S. Army photo
[पानांवरील चित्राचे श्रेय]
From U.S. Army photos