अभ्यासासाठी टीप
दररोज बायबल वाचायला कशामुळे मदत होऊ शकते?
कदाचित तुम्हाला दिवसभर बरीच कामं करावी लागत असतील. मग या कामांमुळे दररोज बायबल वाचणं तुम्हाला कठीण जातं का? (यहो. १:८) जर असं असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या काही गोष्टी करून पाहू शकता.
फोनवर आलार्म लावा. दररोज बायबल वाचनाची आठवण व्हावी, म्हणून तुम्ही तुमच्या फोनवर आलार्म लावू शकता.
बायबल दिसेल अशा ठिकाणी ठेवा. जर तुम्ही छापलेल्या बायबलमधून वाचत असाल तर ते दिसेल अशा ठिकाणी ठेवा.—अनु. ११:१८.
ऑडिओ बायबल ऐका. रोजची कामं करताना बायबल ऑडिओ ऐकण्याची सवय लावा. तारा नावाची बहीण पायनियर म्हणून सेवा करते, आपल्या मुलांना सांभाळते आणि रात्रपाळीत कामसुद्धा करते. ती म्हणते: “घरातली कामं करताना मी ऑडिओ बायबल ऐकते. त्यामुळे मला न चुकता दररोज बायबल वाचता येतं.”
हार मानू नका. अचानक काही काम निघाल्यामुळे एखाद्या दिवशी जर तुम्हाला बायबल वाचता आलं नाही, तर झोपण्याआधी कमीतकमी काही वचनं वाचण्याचा प्रयत्न करा. दररोज काही वचनं वाचल्यामुळेसुद्धा तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो.—१ पेत्र २:२.