ख्रिस्ती जीवन
पालकांनो—देवाला खूश कसं करता येईल ते आपल्या मुलांना शिकवा
यहोवासाठी लहान आणि तरुण मुलं खूप मौल्यवान आहेत. ते आध्यात्मिक प्रगती कशी करत आहेत आणि त्याच्या सेवेत कसे टिकून आहेत याकडे त्याचं लक्ष असतं. (१शमु २:२६; लूक २:५२) ते जरी वयाने लहान असले तरी ते त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे यहोवाचं मन आनंदित करू शकतात. (नीत २७:११) यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे खूप चांगली साधनं पुरवली आहेत. त्यांच्या मदतीने पालक आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची आज्ञा पाळायला शिकवू शकतात.
मुलांनो—तुमच्या धीरामुळे यहोवाला आनंद होतो! हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
गेल्या वर्षांमध्ये यहोवाने कशा प्रकारे मुलांसाठी मार्गदर्शन आणि मदत पुरवली आहे?
पालकांना आपल्या मुलांना शिकवायला मदत व्हावी म्हणून सध्या कोणती साधनं उपलब्ध आहेत?
जर तुम्ही एक तरुण आहात, तर यहोवाने पुरवलेल्या कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत झाली आणि का?