वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ५
  • जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?
    आमची राज्य सेवा—२०११
  • “मी नवीन ठिकाणी स्थलांतर करावे का?”
    आमची राज्य सेवा—२०००
  • यहोवाकडून शिकून घेण्याच्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेत आहात का?
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ५
“तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्‍वासाने प्रवेश करा—गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा” या व्हिडिओवर आधारित असलेली चित्रं. कोलाज: १. अभिषेक संशोधन करत आहे. २. तो वडिलांशी शाखा कार्यालयाला संपर्क करण्याबद्दल बोलत आहे. ३. तो खास प्रचार मोहिमेत त्याच्या मित्रासोबत प्रचारकार्य करत आहे.

ख्रिस्ती जीवन | येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा

जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा

आपली सेवा वाढवण्यासाठी, राहतं ठिकाण सोडून एका नवीन ठिकाणी जायला भक्कम विश्‍वासाची गरज आहे. (इब्री ११:८-१०) जर तुम्हीसुद्धा जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायच्या विचारात असाल, तर तुमच्या मंडळीतल्या वडिलांशी चर्चा करा. कोणत्या ठिकाणी जावं आणि तिथे जाऊन राहणं आपल्याला खरंच शक्य होईल का हे ठरवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? यासाठी जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याबद्दल माहिती देणारे लेख आणि व्हिडिओ पाहा. जे आधीच दुसऱ्‍या मंडळीत जाऊन सेवा करत आहेत त्यांच्याशी चर्चा करा. (नीत १५:२२) यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा. (याक १:५) तुम्ही जिथे जायचा विचार करत आहात त्या ठिकाणाबद्दल माहिती काढा. आणि शक्य असेल तर हा निर्णय घेण्याआधी काही दिवसांसाठी तिथे जाऊन राहा.

तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्‍वासाने प्रवेश करा—गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

  • यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करण्यासाठी या व्हिडिओत दाखवलेल्या भावाला त्याच्या विचारसरणीत कोणते बदल करावे लागले, आणि यासाठी त्याला कशामुळे मदत झाली?

जवळपासच्या कोणत्या मंडळ्यांमध्ये प्रचारकांची गरज आहे याबद्दल माहिती हवी असेल, तर तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांसोबत याबद्दल बोला. जर तुम्हाला लांबच्या मंडळ्यांबद्दल माहिती हवी असेल तर तुमच्या मंडळीच्या सेवा समितीद्वारे तुम्ही शाखा कार्यालयाला पत्र लिहू शकता. जर त्या मंडळ्या तुमच्या शाखा कार्यालयाच्या क्षेत्राबाहेर असतील, तर त्या देशाचं काम पाहणाऱ्‍या शाखा कार्यालयाला पत्र लिहा. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट भागात जायची इच्छा असेल तर तुम्ही पत्रात तसा उल्लेख करू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा