ख्रिस्ती जीवन
यहोवाला सतत आपल्यासमोर ठेवा
आपल्याला जेव्हा चांगली नोकरी मिळत नाही, तेव्हा देवाच्या राज्याला आणि त्याच्या नीतिमान स्तरांना पहिलं स्थानं देणं कदाचित आपल्याला अवघड जाऊ शकतं. कारण त्यामुळे कदाचित आपण अशी एखादी नोकरी निवडू, ज्यामुळे यहोवाची सेवा करणं आपल्याला कठीण जाईल किंवा त्याच्या स्तरांनुसार आपल्याला जगता येणार नाही. पण आपण याची खात्री बाळगू शकतो की, “ज्यांचं मन पूर्णपणे यहोवाकडे लागलेलं असतं,” त्यांच्यासाठी आपली “शक्ती प्रकट करायला” यहोवा नेहमी तयार असतो. (२इत १६:९) आपल्याला हवी ती मदत पुरवण्यापासून आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट यहोवाला रोखू शकत नाही. (रोम ८:३२) म्हणून, नोकरीची निवड करताना आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे आणि आपलं पूर्ण लक्ष यहोवाच्या सेवेवर लावलं पाहिजे. —स्तो १६:८.
पूर्ण मनाने यहोवाची सेवा करा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
जेसनने लाच का घेतली नाही?
कलस्सैकर ३:२३ आपल्याला कसं लागू होतं?
जेसनच्या चांगल्या उदाहरणाचा थॉमसवर कसा परिणाम झाला?
कोणताही निर्णय घेताना किंवा कोणतंही काम करताना यहोवाला आपल्यासमोर ठेवा
मत्तय ६:२२ आपल्याला कसं लागू होतं?