देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३९-४०
मोशेने सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं
यहोवाने मोशेला उपासना मंडप कसा बांधायचा आणि त्यातल्या वस्तू कशा मांडायच्या याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मोशेने त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं. आजही यहोवा आपल्या संघटनेद्वारे आपल्याला सूचना देतो. कधी कधी आपल्याला त्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत किंवा त्या का दिल्या आहेत ते समजणार नाही. पण तरीही आपण त्या सूचनांचं पालन ताबडतोब आणि मन लावून केलं पाहिजे.—लूक १६:१०.
आपण अशा सूचना ऐकणं आणि त्यांचं काटेकोरपणे पालन करणं का गरजेचं आहे, ज्या . . .
क्षेत्र सेवेच्या सभेत दिल्या जातात?
वैद्यकिय उपचारांच्या बाबतींत दिल्या जातात?
नैसर्गिक विपत्तीपासून वाचण्यासाठी दिल्या जातात?