वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑगस्ट पृ. ५
  • पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • यहोवाची स्तुती करण्याच्या अनेक संधी
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय
    आमची राज्य सेवा—२००७
  • तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल का?
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑगस्ट पृ. ५
एक भाऊ समुद्र किनाऱ्‍यावर एका माणसाला बायबलमधलं वचन वाचून दाखवत आहे.

ख्रिस्ती जीवन

पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा

इस्राएली लोकांजवळ यहोवाची स्तुती करण्याची काही खास कारणं होती. त्याने त्यांना इजिप्तमधून सोडवलं होतं आणि फारोच्या सैन्यापासून वाचवलं होतं! (निर्ग १५:१, २) आजही यहोवा आपल्या लोकांना बरेच आशीर्वाद देतो. मग आपण त्यांबद्दल त्याचे आभार कसे मानू शकतो?—स्तो ११६:१२.

असं करण्याचा एक मार्ग म्हणजे सहायक किंवा सामान्य पायनियर सेवा करणं. तुम्हाला पायनियर म्हणून सेवा करण्याची इच्छा व्हावी आणि ही सेवा करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता. (फिलि २:१३) बरेच जण सुरुवातीला सहायक पायनियरिंग करतात. मार्च आणि एप्रिल महिन्यांत, तसंच विभागीय पर्यवेक्षकांची भेट असते त्या महिन्यात तुम्ही एकतर ३० किंवा ५० तास सेवा करायचं निवडू शकता. सहायक पायनियरिंगचा आनंद अनुभवल्यानंतर तुम्ही आणखी प्रयत्न करून सामान्य पायनियर म्हणून सेवा करायचं ठरवू शकता. पूर्ण वेळेची नोकरी किंवा आरोग्याच्या समस्या असूनही काही जणांना सामान्य पायनियर म्हणून सेवा करणं शक्य झालं आहे. (सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०७ पृ. ८) आपण यहोवाची स्तुती करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे, कारण ही स्तुती मिळवायला तो नक्कीच पात्र आहे!—१इत १६:२५.

मंगोलियातल्या तीन बहिणी  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • मंगोलियातल्या तीन बहिणी या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. तीन पायनियर बहिणींपैकी एक, उन्द्रा बसमध्ये चढायच्या तयारीत आहे.

    पायनियरिंग सुरू करण्यासाठी त्या तीन बहिणींनी कोणत्या अडचणींवर मात केली?

  • मंगोलियातल्या तीन बहिणी या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. तीन पायनियर बहिणींपैकी एक, ओयून बेथेलच्या डायनींग रूममध्ये काम करत आहे.

    त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?

  • मंगोलियातल्या तीन बहिणी या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. तिघी बहिणींपैकी एक, प्रचारकार्यात एका माणसाशी बोलत आहे.

    सामान्य पायनियर म्हणून सेवा केल्यामुळे त्यांना यहोवाची सेवा करण्याच्या आणखी कोणत्या संधी मिळाल्या?

  • मंगोलियातल्या तीन बहिणी या व्हिडिओमधलं एक दृश्‍य. तीन पायनियर बहिणी आणि त्यांची आई.

    त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे इतरांवर कोणता परिणाम झाला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा