ख्रिस्ती जीवन
हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे
आपण चांगल्या आणि वाईट या दोन्ही परिस्थितीत यहोवावर भरवसा ठेवणं गरजेचं आहे. (स्तो. २५:१, २) इ.स.पू. आठव्या शतकात यहूदी लोकांसमोर असं संकट आलं, ज्यामुळे त्यांच्या देवावर असलेल्या विश्वासाची परीक्षा झाली. जे घडलं त्यातून आपण सर्वच शिकू शकतो. (रोम. १५:४) हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पुढील प्रश्नांची उत्तरं कशी द्याल?
१. हिज्कीया समोर कोणती परीक्षा होती?
२. शहरावर हल्ला होणार असं वाटलं तेव्हा हिज्कीयाने नीतिसूत्रे २२:३ मध्ये दिलेलं तत्त्व कसं लागू केलं?
३. हिज्कीयाने अश्शूरला शरण न जाण्याचं आणि इजिप्तशी संधी न करण्याचं का ठरवलं?
४. हिज्कीया ख्रिस्ती लोकांसाठी चांगलं उदाहरण का आहे?
५. आज कोणत्या परिस्थितींमध्ये, आपल्या यहोवावर असलेल्या विश्वासाची परीक्षा होते?