जून १५ च्या सप्ताहाचा आराखडा
१५ जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३५ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा भाग ४, कथा ५६ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल २२-२४ (८ मि.)
क्र. १: २ शमुवेल २२:२१-३२ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: काइन—विषय: मिळालेल्या सल्ल्यास आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो यावरून आपण कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे कळते—उत्प ४:१-१५; गल ५:१९, २०; इब्री ११:४; याको १:१४, १५ (५ मि.)
क्र. ३: प्रेम आणि आज्ञाधारकता दाखवल्यामुळे आनंद मिळतो—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २२ परि. ४-६ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: जुने दिवस आठवा.—अनु. ३२:७.
१२ मि: बायबलमधली कोणती व्यक्ती तुम्हाला आवडते? मुलाखत आणि भाषण. सुरुवातीला, मंडळीतल्या दोन किंवा तीन लहान मुलांच्या मुलाखती घ्या. त्यांना विचारा: ‘बायबलमधली कोणती व्यक्ती तुला आवडते? काय सांगितलं आहे त्या व्यक्तीबद्दल बायबलमध्ये? तुला तिचा कोणता गुण आवडला? तू कसं दाखवशील तो गुण?’ त्यानंतर, इंग्रजीतील लर्न फ्रॉम द ग्रेट टिचर, बायबल कथांचं माझं पुस्तक आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकांतील व्यक्तींच्या उदाहरणांचा, लहान मुलांना कसा फायदा होऊ शकतो त्यावर भाषण द्या. लहान मुलं असलेल्या पालकांना या पुस्तकांचा वापर करून “पुरातन” काळातील यहोवाच्या सेवकांविषयी शिकवण्याचं उत्तेजन द्या.—अनु. ३२:७.
१८ मि: “अनुभवी प्रचारकांकडून शिका.” चर्चा. परिच्छेद २ वर चर्चा करताना, सेवेदरम्यान अनुभवी प्रचारकांकडून काय शिकायला मिळालं ते श्रोत्यांना विचारा.
गीत ४ आणि प्रार्थना