मे २५ च्या सप्ताहाचा आराखडा
२५ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १७ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ५२ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १३-१५ (८ मि.)
क्र. १: २ शमुवेल १३:३४-१४:७ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: काम करण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २० परि. १-३ (५ मि.)
क्र. ३: बसालेल—विषय: यहोवा त्याच्या सेवकांना चांगली कामे करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा पुरवतो—निर्ग ३१:३-६; ३५:४-३६:७; २इति १:१-६ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सर्व लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास मदत करा.—१ तीम. २:३, ४.
१० मि: क्षेत्र सेवा गट पर्यवेक्षकाची मुलाखत घ्या. तुमची जबाबदारी सांभाळण्यात काय गोवलेलं आहे? तुमच्या गटात असलेल्या प्रत्येकाची काळजी तुम्ही कशी घेता आणि त्यांना सेवाकार्यात मदत कशी करता? प्रचारकांचा पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलला तर त्यांनी लगेच तुम्हाला कळवणं का महत्त्वाचं आहे? मंडळीतील सर्वांना प्रचार कार्यासाठी एकाच ठिकाणी बोलवण्याऐवजी वडील वेगवेगळे क्षेत्र सेवा गट का तयार करतात?
२० मि: “अंधांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा.” प्रश्न व उत्तरं. एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ४४ आणि प्रार्थना