ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
३० जून २०१४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.
१. मनोरंजनाची निवड करताना निर्गम २३:२ मधील तत्त्व विचारात घेणे इतके महत्त्वाचे का आहे? [मे ५, टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. १०-११ परि. ३-७]
२. यहोवाला बलिदाने अर्पण करण्याआधी याजकांनी हातपाय धुण्याच्या आज्ञेचे पालन करणे किती गंभीर होते, आणि त्यावरून आज देवाच्या सेवकांना कोणत्या गोष्टीचे स्मरण करून दिले जाते? (निर्ग. ३०:१८-२१) [मे १९, टेहळणी बुरूज९६ ७/१ पृ. ९ परि. ९]
३. सोन्याचे वासरू बनवल्यामुळे अहरोनाला शिक्षा का करण्यात आली नाही? (निर्ग. ३२:१-८, २५-३५) [मे १९, टेहळणी बुरूज०४ ३/१५ पृ. २७ परि. ४]
४. विदेशी लोकांशी लग्न न करण्याची जी आज्ञा देवाने इस्राएल लोकांना दिली होती त्यावरून एका ख्रिस्ती व्यक्तीने लग्नाआधी गाठीभेटी करण्याबद्दल व लग्नाबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? (निर्ग. ३४:१२-१६) [मे २६, टेहळणी बुरूज९० ६/१ पृ. १४-१५ परि. ११-१३]
५. बसालेल आणि अहलियाब यांचा अनुभव आपल्यासाठी विशेष उत्तेजन देणारा का आहे? (निर्ग. ३५:३०-३५) [मे २६, टेहळणी बुरूज१० ९/१५ पृ. १० परि. १३]
६. इस्राएलमधील महायाजक आपल्या मंदिलावर जे “समर्पणाचे पवित्र चिन्ह” लावायचे त्यावरून कशाची आठवण करून दिली जायची, आणि हे चिन्ह समर्पणाबद्दल आपल्याला काय शिकवते? (निर्ग. ३९:३०) [जून २, टेहळणी बुरूज०१ २/१ पृ. १४ परि. २-३]
७. मंडळीतील एखाद्या व्यक्तीने केलेल्या गंभीर अपराधाबद्दल आपल्याला कळते तेव्हा आपली काय जबाबदारी असली पाहिजे? (लेवी. ५:१) [जून ९, टेहळणी बुरूज९७ ८/१५ पृ. २७]
८. इस्राएली लोकांच्या काळात शांत्यर्पणांनी कोणती महत्त्वाची भूमिका निभावली, आणि या तरतुदीचा आज आपल्यासाठी कोणता लाक्षणिक अर्थ होतो? (लेवी. ७:३१-३३) [जून १६, टेहळणी बुरूज१२ १/१५ पृ. १९ परि. ११-१२]
९. अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांच्या पापात काय समाविष्ट असावे, आणि या वृत्तान्तावरून आपण कोणते धडे शिकू शकतो? (लेवी. १०:१, २, ९) [जून २३, टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. २२ परि. ६-८]
१०. प्रसूतीनंतर स्त्रीला “अशुद्ध” का समजले जात होते? (लेवी. १२:२, ५) [जून २३, टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. २३ परि. २]