जुन्या नियतकालिकांचा चांगला उपयोग करा
जुनी नियतकालिके जमा करून ठेवली किंवा टाकून दिली तर त्यांचा कोणालाही फायदा होत नसतो; तेव्हा, आपण ती सादर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ एका नियतकालिकामुळेसुद्धा एखाद्याच्या मनात सत्याबद्दल आवड निर्माण होऊन तो यहोवाचा उपासक बनू शकतो. (रोम. १०:१३, १४) जुन्या नियतकालिकांचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकतो यासाठी पुढे काही गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत.
• काही क्षेत्रांत वारंवार कार्य केले जात नाही. अशा क्षेत्रांत कार्य करताना ज्या घरांत कोणीही भेटत नाही अशा घरांत तुम्ही एखादे नियतकालिक टाकू शकता; पण ते येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसणार नाही अशा प्रकारे टाकावे.
• बस-स्टॉपवर किंवा रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक साक्षकार्य करताना, ‘तुम्हाला काही वाचायला दिलं तर चालेल का?’ असे म्हणून तुम्ही लोकांना आपल्या नियतकालिकांचे जुने अंक दाखवू शकता व त्यांपैकी त्यांना जी आवडतील ती त्यांना देऊ शकता.
• तुमच्या मंडळीच्या क्षेत्रात असलेल्या हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये किंवा अशा इतर ठिकाणी तुम्ही नियतकालिकांचे जुने अंक ठेवू शकता. पण, असे करण्याआधी तेथील अधिकाऱ्यांची आपण परवानगी घेतली पाहिजे. तेथे आधीपासूनच आपली नियतकालिके असतील तर आणखी ठेवू नका.
• पुनर्भेटी घेण्याची तयारी करताना तुम्ही ज्या-ज्या लोकांना भेटणार आहात त्या प्रत्येक व्यक्तीला कोणते विषय आवडू शकतील याचा विचार करा. ती विवाहित आहे का? तिला मुलेबाळे आहेत का? तिला प्रवासाची आवड आहे का? तिला बागकाम करायला आवडते का? त्या व्यक्तीला वाचायला आवडेल असा एखादा लेख जुन्या अंकातून शोधून काढा आणि पुनर्भेट घेताना तो तिला दाखवा.
• आवड दाखवलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केल्यावर शेवटी ती तुम्हाला भेटते तेव्हा तिने चुकवलेले काही जुने अंक तिला दाखवा.