वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. ४
  • एप्रिल ७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल ७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ७ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. ४

एप्रिल ७ च्या सप्ताहाचा आराखडा

७ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. १८ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ७-१० (१० मि.)

क्र. १: निर्गम ९:२०-३५ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आत्मिक मंडळी, ख्रिस्तावर उभारली आहे—बायबल विषय ७क (५ मि.)

क्र. ३: अबीशय—आपल्या बांधवांशी एकनिष्ठ राहा व त्यांना मदत करण्यास तयार असा—१शमु २६:६-९; २शमु १६:९-११; १९:२१-२३; २१:१५-१७; २३:१८, १९; १इति १८:१२; १९:११-१५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५०

१० मि: एप्रिल महिन्यात नियतकालिक सादर करा. चर्चा. या पानावर दिलेल्या नमुना सादरीकरणाचा वापर करून एप्रिल-जून टेहळणी बुरूज कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा आणि चर्चेची सुरुवात करा. त्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण नमुना सादरीकरणाची चर्चा करा. शेवटी, सगळ्यांना नियतकालिकातील माहिती चांगल्या प्रकारे वाचण्याचे आणि नियतकालिक उत्साहाने लोकांना सादर करण्याचे उत्तेजन द्या.

१० मि: आदरातिथ्य करण्यास विसरू नका. (इब्री १३:१, २) एका वडिलाचे भाषण. स्मारकविधीसाठी मंडळीत करण्यात आलेल्या योजनांची थोडक्यात चर्चा करा. स्मारकविधीला येणाऱ्‍या नवीन लोकांचे तसेच अक्रियाशील प्रचारकांचे आपण स्वागत कसे करू शकतो याचे काही मार्ग सांगा. दोन भाग असलेले एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. पहिल्या भागात, मोहिमेदरम्यान निमंत्रण मिळालेल्या एका व्यक्‍तीचे कार्यक्रम सुरू होण्याआधी प्रचारक स्वागत करत असल्याचे दाखवा. दुसऱ्‍या भागात, कार्यक्रम संपल्यानंतर तोच प्रचारक त्या व्यक्‍तीची आवड आणखी वाढवण्यासाठी तिला पुन्हा भेटण्याची योजना करत असल्याचे दाखवा.

१० मि: आपण काय साध्य केले? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—संभाषण मधेच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांशी कसे बोलाल?” या लेखातील मुद्दे लागू केल्यामुळे कसा फायदा झाला ते प्रचारकांना विचारा. आणि मग त्यांना कोणते चांगले अनुभव आले तेही विचारा.

गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा