तुम्ही थांबवलेच पाहिजे का?
सेवाकार्य करताना काही प्रचारक सवयीप्रमाणे विशिष्ट वेळी जसे की दुपारी सेवाकार्य करण्याचे थांबवतात. हे बरोबर आहे की प्रचारकांना त्यांच्या परिस्थितीमुळे विशिष्ट वेळी सेवाकार्य थांबवावे लागते. पण तुमच्या गटातील इतर जण किंवा तुमच्या भागात एका विशिष्ट वेळी सेवाकार्य थांबवण्याची सवय आहे फक्त याकरता तुम्ही तुमचे सेवाकार्य थांबवता का? तुम्ही आणखी काही मिनिटे सार्वजनिक साक्षकार्य जसे की रस्त्यावरील साक्षकार्य करून सेवाकार्य वाढवू शकाल का? तुम्ही घरी जाता-जाता एक किंवा दोन पुनर्भेटी घेऊ शकता का? तुम्हाला जर आवड दाखवणारी व्यक्ती परत घरी भेटली किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही नियतकालिके दिलीत तर तुम्हाला किती आनंद होईल! तुम्हाला सेवाकार्य थांबवण्याची गरज नसेल तर तुम्ही आणखी काही मिनिटे सेवेत घालवून “स्तुतीचा यज्ञ” चढवू शकता.—इब्री १३:१५.