ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२५ फेब्रुवारी २०१३ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.
१. “जे शोक करत आहेत” ते धन्य, असे येशूने का म्हटले? (मत्त. ५:४) [७ जाने. टेहळणी बुरूज०९ २/१५ पृ. ६ परि. ६]
२. “आम्हास परीक्षेत आणू नको” या येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेतील शब्दांचा काय अर्थ होतो? (मत्त. ६:१३) [७ जाने. टेहळणी बुरूज०४ २/१ पृष्ठ १६ परि. १३]
३. येशूने त्याच्या शिष्यांना असे का म्हटले की “मनुष्याचा पुत्र येईपर्यंत” त्यांचे प्रचाराचे क्षेत्र पूर्ण होणार नाही? (मत्त. १०:२३) [१४ जाने. टेहळणी बुरूज१० ९/१५ पृष्ठ १० परि. १२; टे.बु.९० ९/१ पृष्ठ ८ परि. ६]
४. येशूने दिलेल्या मोहरीच्या दाण्याच्या दृष्टान्तातून आपल्याला कोणत्या दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात? (मत्त. १३:३१, ३२) [२१ जाने. टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृष्ठ १७-१८ परि. ३-८]
५. “स्वतःचा त्याग” करणे आणि “आपला वधस्तंभ उचलून” येशूला अनुसरणे याचा काय अर्थ होतो? (मत्त. १६:२४) [२८ जाने. टेहळणी बुरूज०५ ४/१ पृष्ठ ९-१० परि. ७-११]
६. यहुदाला कशामुळे पस्तावा झाला? (मत्त. २७:३-५) [११ फेब्रु. टेहळणी बुरूज०८ १/१५ पृष्ठ ३१]
७. येशूला “शब्बाथाचाही प्रभू” का म्हणण्यात आले आहे? (मार्क २:२८) [१८ फेब्रु. टेहळणी बुरूज०८ २/१५ पृष्ठ २८ परि. ७]
८. येशूने आपली आई व भाऊ यांविषयी जे म्हटले त्यामागचे कारण काय होते आणि त्यातून आपण काय शिकू शकतो? (मार्क ३:३१-३५) [१८ फेब्रु. टेहळणी बुरूज०८ २/१५ पृष्ठ २९ परि. ५]
९. मार्क ८:२२-२५ यातील वृत्तान्तानुसार येशूने एका अंधळ्या माणसाला दोन टप्प्यात का बरे केले असावे आणि यातून आपण काय शिकू शकतो? [२५ फेब्रु. टेहळणी बुरूज०० २/१५ पृष्ठ १७ परि. ७]
१०. मार्क ८:३२-३४ या वचनांत येशूने पेत्राला ज्या प्रकारे उत्तर दिले त्यातून आपण काय शिकू शकतो? [२५ फेब्रु. टेहळणी बुरूज०८ २/१५ पृष्ठ २९ परि. ६]