वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१२ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१२
आमची राज्य सेवा—२०१२
km १२/१२ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

३१ डिसेंबर २०१२ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.

१. योएल २:१-१०, २८ या वचनात सांगितल्यानुसार कीटकांच्या धाडीविषयीची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? [५ नोव्हें., टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ६ परि. ५]

२. आमोस ९:७-१० या वचनांत सांगितल्याप्रमाणे आपण इस्राएलांकडून कोणता धडा शिकू शकतो? [१२ नोव्हें., टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ८ परि. १०]

३. अदोमी लोकांमध्ये कशामुळे गर्विष्ठपणा आला असावा, आणि कोणती गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे? (ओब. ३, ४) [१९ नोव्हें., टेहळणी बुरूज०७ ११/१ पृ. १६ परि. ५]

४. यहोवाने निनवेच्या लोकांवर संकट आणण्याचे जे भाकीत केले त्याबद्दल त्याला अनुताप झाला, तो कोणत्या अर्थी? (योना ३:८, १०) [१९ नोव्हें., टेहळणी बुरूज०७ ११/१ पृ. १७ परि. ६]

५. यहोवाच्या नावाने चालण्याचा काय अर्थ होतो? (मीखा ४:५) [२६ नोव्हें., टेहळणी बुरूज०३ ८/१५ पृ. १७ परि. १९]

६. नहूम २:६-१० मधील भविष्यवाणीच्या पूर्णतेमुळे आपल्याला कोणते आश्‍वासन मिळते? [३ डिसें., टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. ९ परि. २; टे.बु.८९ ८/१ पृ. ३० परि. ८]

७. हाग्गय १:६ या वचनाचा काय अर्थ होतो, आणि आपण यातून कोणता धडा शिकला पाहिजे? [१० डिसें., टेहळणी बुरूज०६ ५/१ पृ. १० परि. १२-१५]

८. “आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका,” हा जो व्यावहारिक सल्ला जखऱ्‍या ७:१० मध्ये दिला आहे तो आपण कसा लागू करू शकतो? [१७ डिसें., टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १५ परि. २]

९. जखऱ्‍या ४:६, ७ मधील शब्द आज यहोवाच्या उपासकांसाठी सांत्वन देणारे का आहेत? [१७ डिसें., टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १४ परि. ७]

१०. मलाखी ३:१६ मध्ये जे म्हटले आहे ते लक्षात घेता यहोवाला विश्‍वासू राहण्याचा आपण नेहमी दृढनिश्‍चय का केला पाहिजे? [३१ डिसें., अभ्यास लेखांचे माहितीपत्रक पृ. ३१ परि. ३]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा