वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. २-३
  • देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे ऐका—कसं वापराल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • आपल्या राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी माहितीपत्रके सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. २-३

देवाचे ऐकण्यास लोकांना मदत करा

१. ‘देवाचे राज्य येवो!’ या प्रांतीय अधिवेशनात कोणत्या दोन नवीन माहितीपत्रकांचे प्रकाशन झाले होते व ही माहितीपत्रके अतिशय उपयुक्‍त का आहेत?

१ ‘देवाचे राज्य येवो!’ या प्रांतीय अधिवेशनात, दोन नवीन माहितीपत्रकांचे प्रकाशन झाले होते. एकाचे शीर्षक होते, देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! आणि देवाचे ऐका हे दुसऱ्‍या सोप्या आवृत्तीचे शीर्षक होते. या दोन्ही माहितीपत्रकांत कमी माहिती असल्यामुळे, त्यांचे भाषांतर पटकन व सहजरीत्या करता आले. खरे तर, देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक इंग्रजीत प्रकाशित झाल्याबरोबर, ४३१ भाषांमध्ये त्याचे भाषांतर करण्याची परवानगी मिळाली.

२. या माहितीपत्रकांचा फायदा कोणाला होऊ शकतो?

२ या माहितीपत्रकांचा फायदा खासकरून कोणाला होऊ शकतो? संपूर्ण जगभरात सर्रास दिसणाऱ्‍या दृश्‍यांचे परीक्षण करा:

• पहिल्या भेटीत किंवा पुनर्भेट घ्यायला गेल्यावर प्रचारकाच्या लक्षात येते, की आपण ज्याच्याबरोबर चर्चा करत आहोत त्या घरमालकाला लिहिता-वाचता येत नाही किंवा येत असले तरी इतके चांगल्या प्रकारे येत नाही.

• एका प्रचारकाला असे लोक भेटतात ज्यांच्या भाषेत, एकतर फार कमी प्रकाशनांचे भाषांतर झाले आहे किंवा कोणतेच प्रकाशन नाही. किंवा, क्षेत्रातील बहुतेक लोकांना बऱ्‍यापैकी समजत असलेली भाषा वाचता येत नाही.

• कर्णबधिर लोकांना प्रचार करण्यासाठी एक प्रचारक संकेत भाषेचा उपयोग करतो.

• एका पालकाला आपल्या लहान मुलाला/मुलीला सत्य शिकवण्याची खूप इच्छा आहे पण त्या मुलाला/मुलीला अजून लिहिता-वाचता येत नाही.

३. देवाचे ऐका या माहितीपत्रकाची मांडणी कशा प्रकारे करण्यात आली आहे?

३ या माहितीपत्रकाची मांडणी कशी करण्यात आली आहे: देवाचे ऐका या माहितीपत्रकात फार कमी माहिती आहे. जसे की एक सोपे वाक्य व प्रत्येक पानाच्या खाली मुख्य मुद्द्‌यांवर जोर देणारे एक शास्त्रवचन. असे का? समजा कोणीतरी तुमच्या हातात एक माहितीपत्रक दिले, पण त्या माहितीपत्रकातील एकही अक्षर तुम्हाला वाचता येत नाही. त्या माहितीपत्रकात कितीही सुंदर चित्रे असली तरी, तुम्हाला ते माहितीपत्रक आवडेल का? कदाचित नाही! तसेच, काही निरक्षर लोक माहितीपत्रकात काहीतरी लिहिलेले आहे पण लिहिता-वाचता येत नाही म्हणून ते लगेच बाजूला ठेवतील. त्यामुळे, कमी माहिती असलेल्या या माहितीपत्रकाच्या प्रत्येक पानावर खूप विचारपूर्वक बनवलेली व उठून दिसतील अशी चित्रे आहेत आणि चर्चा होत असताना एका चित्राकडून दुसऱ्‍या चित्राकडे लक्ष वेधणारी खूण आहे.

४. देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकाची मांडणी कशी केली आहे?

४ देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकात देवाचे ऐका माहितीपत्रकाचीच चित्रे आहेत. ज्यांना कमी लिहिता-वाचता येते किंवा जे वाचायला शिकत आहेत, त्यांच्याबरोबर अभ्यास करण्यासाठी हे माहितीपत्रक बनवण्यात आले आहे. देवाचे ऐका या माहितीपत्रकातून जर कोणी अभ्यास करत असेल तर, प्रचारक, देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकाचा उपयोग करून शिकवू शकतो. प्रत्येक दोन पानांच्या धड्याच्या डावीकडे वर, एक प्रश्‍न दिलेला आहे ज्याचे उत्तर या दोन पानांवर आहे. चित्रांबरोबर टिपणी व शास्त्रवचनेदेखील दिलेली आहेत. बहुतेक पानांवर खालच्या बाजूला, फिकट रंगाच्या चौकोनात, आणखी काही मुद्दे व शास्त्रवचने आहेत. विद्यार्थ्याच्या क्षमेतनुसार यांची चर्चा केली जाऊ शकते.

५. ही माहितीपत्रके आपण लोकांना केव्हा व कशी देऊ शकतो?

५ यांचा उपयोग कसा कराल? महिन्याच्या सादरतेत माहितीपत्रके द्यायची नसली तरीसुद्धा दोन्ही माहितीपत्रकांपैकी कोणतेही एक माहितीपत्रक दिल्याने फायदा होईल, असे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते घरोघरच्या कार्यात देऊ शकता. (“माहितीपत्रके कशी सादर कराल” हा चौकोन पाहा.) आस्थेवाईक व्यक्‍तीची पुनर्भेट घेताना तुम्ही तिला म्हणू शकता, की मी तुमच्यासाठी काहीतरी आणले आहे आणि मग घरमालकाच्या हातात ते माहितीपत्रक द्या.

६. या माहितीपत्रकांचा उपयोग करून आपण बायबल अभ्यास कसा चालवू शकतो?

६ देवाचे ऐका या माहितीपत्रकात छापील प्रश्‍न नसल्यामुळे तुम्ही, बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास घेता तसे प्रश्‍नोत्तराने ही चर्चा करू शकत नाही. पुष्कळ लोकांना, कथा-कहाण्या ऐकायला आवडतात. तेव्हा, माहितीपत्रकातील चित्रांचा उपयोग करून, बायबलमध्ये देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या गोष्टी सांगा. ती चित्रे समजावून सांगा. उत्साहाने सांगा. चित्रात काय दिसत आहे, हे विद्यार्थ्याला विचारा. पानावर खालच्या बाजूला शास्त्रवचने आहेत ती वाचा आणि मग त्या वचनांत काय दिले आहे, ते विद्यार्थ्याला तर्क करून सांगा. प्रश्‍ने विचारून विद्यार्थ्यालाही चर्चेत सहभागी करा आणि त्याला हे नीट समजले आहे याची खात्री करा. विद्यार्थ्याजवळ देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक असेल तर प्रत्येक चित्रावर चर्चा करताना, सोबत दिलेली टिपणी आणि शास्त्रवचने वाचा.

७. आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला मदत कशी करू शकतो?

७ विद्यार्थ्याला प्रगती करायला मदत करा: आम्ही अशी आशा करतो, की या चर्चेमुळे तुमच्या विद्यार्थ्यामध्ये वाचण्यास शिकण्याची इच्छा जागृत होवो जेणेकरून त्याला स्वतःला यहोवाचे ज्ञान घेता येईल. (मत्त. ५:३; योहा. १७:३) त्यामुळे, तुम्ही जर देवाचे ऐका माहितीपत्रकातून चर्चा करत असाल तर तुम्ही विद्यार्थ्याला वाचण्यास शिकायला मदत करू शकता आणि मग देवाचे ऐका व सदासर्वकाळ जिवंत राहा! या माहितीपत्रकातून अभ्यास घ्यायला सुरुवात करू शकता. तुम्ही कोणत्याही माहितीपत्रकातून अभ्यास घेऊन तो संपवला असला तरी, विद्यार्थी लगेच बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरत नाही. तुम्हाला त्याच्याबरोबर बायबल काय शिकवते? पुस्तकातून किंवा इतर उचित प्रकाशनातून त्याचा अभ्यास घ्यावा लागेल जेणेकरून त्याला बायबलची सविस्तर समज मिळेल.

८. सेवेमध्ये वापरता येऊ शकणाऱ्‍या या साधनांबद्दल तुम्ही आभारी का आहात?

८ लोकांना जर सदासर्वकाळ जिवंत राहायचे आहे तर त्यांनी विश्‍वाच्या सार्वभौम देवाचे ऐकले पाहिजे. (यश. ५५:३) आणि सर्व माणसांनी, म्हणजे ज्यांना लिहिता-वाचता येत नाही त्यांनीही देवाचे कसे ऐकले पाहिजे हे शिकून घेतले पाहिजे, अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) देवाचे कसे ऐकायचे हे शिकवण्यास आपण या नवीन साधनांचा उपयोग करू शकतो, म्हणून आपण किती आभारी आहोत!

[३ पानांवरील चौकट]

माहितीपत्रके कशी सादर कराल

घरमालकाला २ व ३ पान दाखवा आणि म्हणा: “अशा सुंदर जगात तुम्हाला राहायला आवडेल का? [उत्तरासाठी थांबा.] शास्त्रवचनांत किंवा या पवित्र पुस्तकात देवाने असे वचन दिले की तो या पृथ्वीला खूप सुंदर बनवणार आहे; तेथे शांती असेल आणि कोणीही गरीब किंवा आजारी नसेल. पण अशा पृथ्वीवर जर आपल्याला राहायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल, ते पाहा. [पान ३ च्या वरच्या बाजूला यशया ५५:३ वचन दिले आहे ते वाचा.] या वचनात आपल्याला देवाच्या जवळ या व त्याचे “ऐका” असे सांगितले आहे. पण आपण देवाचे कसे ऐकू शकतो?” पाने ४-५ काढा आणि घरमालकाबरोबर उत्तराची चर्चा करा. त्याच्याकडे वेळ नसेल तर त्याला ते माहितीपत्रक द्या आणि मग पुढच्या वेळी उत्तराची चर्चा करायला केव्हा यायचे ते घरमालकाला विचारा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा