तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो?
१. दर महिन्याच्या शेवटी आपण कोणत्या कारणासाठी आनंदी होतो?
१ दर महिन्याच्या शेवटी जेव्हा आपल्या सर्वांना आपला क्षेत्र सेवेचा रिपोर्ट देण्याची आठवण करून दिली जाते तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो? आपण सेवेमध्ये १३० तासांचा रिपोर्ट देणारे खास पायनियर असोत अथवा मंडळीच्या सेवा समितीने १५-१५ मिनिटांचा रिपोर्ट घालण्याची मान्यता दिलेले प्रचारक असोत; आपण यहोवाची सेवा पूर्ण मनाने करू शकलो, हा आनंद आपल्या सर्वांना झाला पाहिजे.—स्तो. १००:२.
२. यहोवाच्या सेवेत आपण त्याला जे काही देऊ ते सर्वोत्तम का असले पाहिजे?
२ यहोवा या विश्वाचा सार्वभौम प्रभू असल्यामुळे आपण त्याला जे काही देऊ ते सर्वोत्तमच असले पाहिजे. (मला. १:६) त्याच्यावरील प्रेमाखातर व त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपले जीवन त्याला समर्पित केले आहे. त्यामुळे, दिवसाच्या किंवा महिन्याच्या शेवटी आपल्याला जेव्हा ही खात्री असते, की यहोवाच्या सेवेत आपण आपल्या वेळेचे, कौशल्यांचे व शक्तीचे प्रथम फळ दिले आहे तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. (नीति. ३:९) पण जर आपला विवेक आपल्याला बोचत असेल तर मग आपण याबाबतीत सुधारणा कशी करू शकतो त्यावर विचार केला पाहिजे.—रोम. २:१५.
३. इतरांबरोबर तुलना करणे योग्य का नाही?
३ इतरांबरोबर तुलना करू नये: आपण इतरांबरोबर किंवा स्वतःबरोबरही कदापि तुलना करू नये. स्वतःबरोबर म्हणजे, जीवनात एकेकाळी आपण जेव्हा सुदृढ होतो तेव्हा जशी सेवा करत होतो तशी आता होत नाही म्हणून आपण कुढत बसू नये. परिस्थिती नेहमी बदलत असते. प्रत्येकाच्या क्षमतांही वेगवेगळ्या असतात. तुलना केल्यामुळे मनात स्पर्धात्मक किंवा निरुपयोगीपणाच्या भावना बळावतात. (गलती. ५:२६; ६:४) येशूने कधीही तुलना केल्या नाहीत. उलट, एखाद्याव्यक्तीने जेव्हा तिच्या ऐपतीनुसार किंवा शक्तीनुसार काही दिले तेव्हा येशूने तिची प्रशंसा केली.—मार्क १४:६-९.
४. येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांतातून आपण कोणकोणते मौल्यवान धडे शिकू शकतो?
४ येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांतातील प्रत्येक मजूराला “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” रुपये मिळाले. (मत्त. २५:१५) आणि धनी परत आल्यावर त्याने या मजूरांच्या कार्यांचा रिपोर्ट मागितला तेव्हा, ज्या मजुरांनी आपापल्या क्षमतांनुसार व परिस्थितींनुसार मेहनत घेतली होती त्यांचे धन्याने कौतुक केले व ते आपल्या धन्याच्या आनंदात सहभागीही होऊ शकले. (मत्त. २५:२१, २३) आज आपणही स्वतःला राज्याच्या प्रचार कार्यात असे व्यस्त ठेवले तर निश्चित्तच यहोवाची मर्जी प्राप्त करू व अभिमान बाळगू शकू.