जुलै ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ जुलैने सुरू होणारा सप्ताह
गीत ८ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १११ “ख्रिस्त राज्य-सामर्थ्यासह येतो तेव्हा” या पोटमथळ्यापासून शेवटपर्यंत आणि अध्या. ११२ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहेज्केल ११-१४ (१० मि.)
क्र. १: यहेज्केल ११:१४-२५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: कुटुंबाचे नुकसान करणाऱ्या समस्यांचा अंत—कुटुंब पृ. १५१ परि. २५–पृ. १५२ परि. २६ (५ मि.)
क्र. ३: नम्रता म्हणजे काय आणि हा गुण आपल्याला सकारात्मक मनोवृत्ती राखण्यास कशी मदत करतो?—सफ. २:३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: परिणामकारक पुनर्भेटी घ्या. पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा. (१) पुनर्भेट घ्यायला जातो त्या प्रत्येक वेळी, आपल्या मनात एक उद्देश का असला पाहिजे? (२) सुरुवातीच्या पुनर्भेटींचा अवधी किती असला पाहिजे? (३) आपण जेव्हा पुनर्भेट घ्यायला जातो तेव्हा आपण का आलो आहोत हे कसे सांगू शकतो? (४) घरमालक म्हणतो, की त्याला आपल्याबरोबर चर्चा करण्यात रस नाही, मग आपण काय म्हणू शकतो? (५) आपण एखाद्या व्यक्तिला पत्रिका, माहितीपत्रक किंवा नियतकालिके दिली असतील तर तिची पुनर्भेट घेताना आपण केव्हा आणि कसे, बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास करण्याविषयी तिला सांगू शकतो? (६) पुनर्भेटीच्या वेळी काय बोलायचे याबद्दलची माहिती कोठे मिळू शकेल? (७) एखाद्या व्यक्तीची आपल्याला पुनर्भेट घ्यायची आहे पण ती आपल्याला घरी सापडत नसेल तर आपण तिची आवड कशी वाढवू शकतो? (८) पुनर्भेट कशी घ्यायची याचे प्रशिक्षण आपण कमी अनुभव असलेल्या प्रचारकांना कसे देऊ शकतो?
१५ मि: “तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो?” प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ४ वर चर्चा करताना सर्वांना दर महिन्याला त्यांच्या क्षेत्र सेवेचा रिपोर्ट द्यायची आठवण करून द्या.
गीत ९ आणि प्रार्थना