वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. ७
  • यहोवाची स्तुती करण्यासाठी जगा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची स्तुती करण्यासाठी जगा!
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • यहोवासाठी तुम्ही जे काही करू शकता त्यातून आनंद मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • देवाची सेवा करण्यास तुम्हाला काय प्रवृत्त करते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्हाला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो?
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

यहोवाची स्तुती करण्यासाठी जगा!

जीवन ही आपल्याला मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे. आपण या देणगीचा जसा वापर करतो, त्यावरून आपण दाखवून देतो की आपल्याला तिची किती कदर आहे. जीवनाची देणगी देणाऱ्‍या यहोवाचा गौरव आणि आदर करण्याची आपली इच्छा आहे. आणि म्हणून यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण आपल्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा त्याची स्तुती करण्यासाठी पुरेपूर उपयोग करतो. (स्तो ३६:९; प्रक ४:११) पण, या दुष्ट जगात आपल्याला दररोजच्या ज्या चिंतांचा सामना करावा लागतो, त्यांमुळे आध्यात्मिक गोष्टींकडे सहजच आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. (मार्क ४:१८, १९) म्हणून आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे: ‘मी यहोवाला खरोखर आपलं सर्वोत्तम देत आहे का? (होशे १४:२) कामाचा किंवा करियरचा माझ्या सेवेवर कसा परिणाम होत आहे? माझी आध्यात्मिक ध्येयं काय आहेत? मी माझं सेवाकार्य आणखी कसं वाढवू शकतो?’ परीक्षण केल्यावर जर तुमच्या लक्षात आलं की काही सुधारणा करण्याची गरज आहे, तर यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा आणि योग्य ते फेरबदल करा. यहोवाची दररोज स्तुती केल्यामुळे आपलं जीवन खरोखरच समाधानी आणि आनंदी बनतं यात काहीच शंका नाही.—स्तो ६१:८.

एडगार्डो फ्रँको स्टेजवर गाताना; एडगार्डो फ्रँको प्रचार करताना

तुम्ही तुमची कौशल्यं कोणाला अर्पण करत आहात?

आपल्या कौशल्यांचा वापर यहोवासाठी करा हा व्हिडिओ पाहा आणि मग पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपल्या कौशल्यांचा वापर सैतानाच्या जगासाठी करणं सुज्ञपणाचं का ठरणार नाही? (१यो २:१७)

  • जे लोक यहोवाला त्यांचं सर्वोत्तम देतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

  • तुम्ही कोणत्या प्रकारच्या पवित्र सेवेत तुमच्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा वापर करू शकता?

कौटुंबिक उपासनेसाठी काही पर्याय:

  • एका अशा प्रचारकाला त्याचा अनुभव विचारा, जो कदाचित यहोवाची बऱ्‍याच वर्षांपासून पूर्णवेळेची सेवा करत आहे. यहोवाला सर्वोत्तम देण्यासाठी त्याने कोणते त्याग केले आहेत? यहोवाने त्याला कोणकोणते आशीर्वाद दिले आहेत?

  • JW ब्रॉडकास्टिंगवर INTERVIEWS AND EXPERIENCES या टॅबखाली पाहा. त्यात तुम्हाला अशा बऱ्‍याच बंधुभगिनींचे अनुभव पाहायला आणि ऐकायला मिळतील, ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र सेवेचा आनंद अनुभवला आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा