नमुना सादरीकरणे
मे महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“देवाला प्रार्थना करायला तुम्हाला आवडते का?” घरमालकाचे उत्तर ऐकून घ्या आणि तो पुढे बोलू इच्छितो, असे तुम्हाला जाणवले तरच संभाषण पुढे चालू ठेवा. “प्रार्थना केल्याने आपण देवाच्या जवळ कसे येऊ शकतो, हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का?” घरमालकाचे उत्तर ऐका. मग त्याच्या हातात टेहळणी बुरूज, एप्रिल - जून नियतकालिक द्या आणि पृष्ठ १८ वरील पहिल्या मथळ्याखालच्या माहितीची व त्यात उल्लेखलेल्या निदान एका वचनाची तरी चर्चा करा. त्याला हे नियतकालिक द्या आणि पुढील प्रश्नाची चर्चा करण्यासाठी वेळ ठरवा.
टेहळणी एप्रिल - जून
“आजकाल नैसर्गिक विपत्तींचा जणू पूरच येऊ लागला आहे, नाही का? तुमच्या मते, असे का घडत आहे? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये अशा एका काळाविषयी सांगितले होते, ज्यात एकापाठोपाठ एक विपत्ती येतील. ती भविष्यवाणी मी तुम्हाला वाचून दाखवली तर चालेल का? [घरमालक ऐकण्यास तयार असेल तर मत्तय २४:७, ८ वाचा.] आजकाल इतक्या विपत्ती का येत आहेत? देव आपल्याला शिक्षा देत आहे का? देव लवकरच सर्व नैसर्गिक विपत्तींचा अंत करेल, असा विश्वास ठेवण्यासाठी काही कारणे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे या नियतकालिकात दिली आहेत.”