घोषणा
◼ साहित्य सादरीकरण एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमितरीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा बायबल काय शिकवते या पुस्तकाचा उपयोग करून त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकांकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत ज्यांचा साठा उपलब्ध आहे अशा कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करा. पुनर्भेटी घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक किंवा व्यक्तीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा यांपैकी एक माहितीपत्रक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ तुम्ही दुसऱ्या एखाद्या देशास प्रवास करणार असाल व तेथे प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची तुमची इच्छा असेल, तर, jw.org या वेबसाईटवर, Lookup या टॅबखाली Conventions या लिंकवर उपयुक्त माहिती तुम्हाला मिळू शकेल.