नमुना सादरीकरण
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता
“पृथ्वीसाठी देवाचा काय उद्देश असावा, हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] निर्माणकर्त्याने काय करण्याचे उद्देशिले आहे त्याविषयी एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवले तर चालेल का?” घरमालकाने आवड दाखवली तर स्तोत्र ३७:११ वाचा आणि पृष्ठ १६ वरील लेख दाखवा. पहिल्या मुद्द्यावर चर्चा करा आणि लेखातील पुढील विषयावर चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.
टेहळणी ऑक्टोबर - डिसेंबर
“येशूबद्दल अनेक जणांचे वेगवेगळे विचार आहेत. पण तुमचे काय मत आहे? [उत्तरासाठी थांबा.] येशू लोकांसाठी मरण पावला असे अनेक लोक सांगतात पण येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले हे समजण्यासाठी मी एक शास्त्रवचन तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालकाला आवड असल्याचे दिसल्यास प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] येशू ख्रिस्त खरोखर कोण आहे याबद्दल या नियतकालिकात सविस्तर माहिती दिली आहे.”