वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/११ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०११
आमची राज्य सेवा—२०११
km ९/११ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरीकरण सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाच्या आवडीचे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? हे माहितीपत्रक देण्याव्यतिरिक्‍त किंवा त्याऐवजी तुम्ही तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले व लोकांना आवडेल अशा विषयाचे कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक देऊ शकता. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. घरात मुले असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक देऊ शकता.

◼ २०१२ सालच्या स्मारक विधीनंतरचे खास जाहीर भाषण २ एप्रिलच्या आठवड्यात दिले जाईल. या भाषणाचा विषय नंतर सांगितला जाईल. कोणत्याही मंडळीत हे भाषण स्मारकविधीच्या आधी दिले जाऊ नये.

◼ मार्च २०१२ दरम्यान सहायक पायनियरींग करू इच्छिणाऱ्‍या प्रचारकांपुढे, त्या महिन्यात ३० तास किंवा ५० तास भरण्याचे पर्याय असतील. तसेच, मार्च महिन्यादरम्यान जर कुठल्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर, सर्व सहायक पायनियरांना, मग ते ३० तास भरणारे असोत अथवा ५० तास भरणारे असोत, विभागीय पर्यवेक्षकांच्या सामान्य पायनियरांबरोबर होणाऱ्‍या संपूर्ण सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जात आहे.

◼ सप्टेंबर महिन्यापासून विभागीय पर्यवेक्षकांनी, “देवाच्या आनंदी लोकांबरोबर एकजूट व्हा,” असा विषय असलेले भाषण द्यायला सुरुवात केली आहे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

“बेअरिंग थरो विटनेस” अबाउट गॉड्‌स किंगडम —मल्याळम, तमिळ

हेल्प टू फेस इश्‍यूज अबाऊट ब्लड—ऑन डीव्हीडी —अमेरिकन संकेत भाषा

सिंग टू जहोवा—वोकल रेंडीशन्स—ऑन कंपॅक्ट डिस्क, डिस्क ३

सिंग टू जहोवा—वोकल रेंडीशन्स—ऑन कंपॅक्ट डिस्क, डिस्क ४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा