तुम्ही पूर्वी सामान्य पायनियर होता का?
१. अनेकांनी कोणत्या सुहक्काचा आनंद लुटला आहे, पण काहींना काय करावे लागले आहे?
१ अनेक वर्षांपासून, पूर्ण वेळचे सेवक यानात्याने हजारो बंधुभगिनींनी ‘शिकवण्याच्या व सुवार्ता गाजविण्याच्या’ सुहक्काचा आनंद लुटला आहे. (प्रे. कृत्ये ५:४२) पण काहींना विविध कारणांमुळे पायनियरिंग मध्येच सोडावी लागली आहे. जर तुम्ही पूर्वी सामान्य पायनियर होता, तर तुम्ही तुमच्या आताच्या परिस्थितीचा विचार करून पुन्हा एकदा पायनियरिंग सुरू करू शकाल का?
२. ज्यांनी पूर्वी पायनियर सेवा केली होती त्यांनी त्यांच्या आताच्या परिस्थितीचा विचार का केला पाहिजे?
२ परिस्थिती बदलणे: ज्या कारणामुळे तुम्हाला पायनियर सेवा सोडावी लागली होती ते कारण आता उरलेले नाही. उदाहरणार्थ, महिन्याला ९० तास पूर्ण करण्याची मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नव्हता म्हणून कदाचित तुम्ही पायनियर सेवा सोडली असेल. पण, आता फक्त ७० तास करण्याची मागणी आहे. मग तुम्ही पुन्हा पायनियरिंग सुरू करू शकाल का? पायनियरिंग सोडावी लागली तेव्हा कदाचित तुम्हाला अधिक काम करावे लागत असेल किंवा तुमच्यावर बऱ्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील पण आता तसे नसेल. अलिकडेच तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात का? एका बहिणीने तिच्या तब्येतीमुळे पायनियरिंग करण्याचे बंद केले होते. पण वयाच्या ८९ व्या वर्षी तिने पुन्हा पायनियरिंग सुरू केली कारण तिला निदान एक वर्षापासून तरी हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही. त्यामुळे ती पुन्हा पायनियरिंग करू शकते असे तिला वाटले.
३. कुटुंबातील सदस्य त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला पायनियर बनण्यास सहकार्य कसे करू शकतात?
३ तुम्ही कदाचित पूर्वी पायनियर नसाल पण, तुमच्या कुटुंबातील एखाद्याने घरच्या जबाबदारीमुळे जसे की वयस्कर पालकांची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे पायनियरिंग करण्याचे सोडले असेल. (१ तीम. ५:४, ८) असे असल्यास, तुम्ही किंवा घरातील इतर जण ज्याने पायनियर सेवा सोडली आहे त्याला मदत करू शकता का? कुटुंबातील सर्वजण मिळून या विषयावर चर्चा करू शकता. (नीति. १५:२२) जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना सहकार्य करतात तेव्हा घरातील एकाला पायनियरिंग करता येऊ शकेल. मग घरातील बाकीच्यांनाही पायनियर सेवेत भाग घेतल्यासारखे वाटेल.
४. तुम्हाला पुन्हा पायनियर सेवा सुरू करता येत नसल्यास काय?
४ तुमची सध्याची परिस्थिती पुन्हा पायनियरिंग करण्यास अनुकूल नसल्यास निराश होऊ नका. सेवा करण्याची तुमची तयारी पाहून यहोवा खूश होईल. (२ करिंथ. ८:१२) पायनियर असताना तुम्ही मिळवलेल्या कौशल्यांचा सध्याच्या सेवेत उपयोग करा. तुमची इच्छा प्रार्थनेत ठेवा आणि परिस्थितीत फेरबदल करण्याच्याबाबतीत नेहमी सतर्क राहा. (१ योहा. ५:१४) कालांतराने यहोवा तुमच्यासाठी “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” उघडेल जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा सामान्य पायनियरिंगचा आनंद लुटू शकाल!—१ करिंथ. १६:९.