तुम्ही पुन्हा तो पायनियरचा हुद्दा मिळवू शकता का?
१ मागील पाच वर्षात, जगभरातील हजारो नियमित पायनियरांना पायनियरचा हुद्दा सोडण्याची आवश्यकता भासली. तुम्ही त्यांच्यापैकी एक होता का? असे असल्यास, या विशेषाधिकाराचा त्याग करण्यामागे काही कारण होते यात काही संशय नाही. कदाचित ती अनपेक्षित व तुमच्या नियंत्रणाच्या पलिकडील गोष्ट होती. ते कारण अजूनही आहे का? आरोग्य, आर्थिक समस्या किंवा कुटुंबाच्या काही जबाबदारींमुळे तुम्हाला स्थगित करणे आवश्यक वाटले, तर तुमची परिस्थिती सुधारली आहे का? तुम्ही काही योग्य फेरफार करू शकता का जेणेकरून, नियमित पायनियरींगच्या आशीर्वादांचा आनंद पुन्हा लुटण्यास तुम्हाला अनुमती मिळेल? तुम्ही पुन्हा अर्ज करण्याबद्दल विचार केला आहे का?
२ तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे, तुम्हाला पायनियर या नात्याने यशस्वी व्हावयाचे असल्यास उत्तम संघटन आणि काळजीपूर्वक योजनेची आवश्यकता आहे. सामान्यतः, मनोरंजनासाठी जास्त वेळ नसला तरी, पायनियरला आराम करण्यासाठी मिळणारा अल्प काळ बहुधा, समाधानकारक व फलदायी ठरतो. (नीती. १९:१७; प्रे. कृत्ये २०:३५) सेवेत व्यग्र राहिल्याने, जग पिच्छा करीत असलेल्या आपमतलबी, सुखविलासी जीवनाच्या प्रभावापासून तुम्ही सुरक्षित राहता. यहोवाने अभिवचन दिले आहे की, तुम्ही स्वार्थत्यागी व राज्य आस्थेस प्रथम ठेवत असाल तर, तो तुम्हाला आध्यात्मिकरित्या समृद्ध करील. यहोवाची सेवा पूर्ण हृदयाने केल्याने, तुम्हाला निश्चितपणे खरा हर्ष व संतोष अनुभवण्यास मिळेल.—नीती. १०:२२; कलस्सै. ३:२३, २४.
३ पूर्ण-वेळेच्या सेवेकडे, केवळ विशेष काहींसाठीच उपलब्ध असलेला विशेषाधिकार या दृष्टिकोनातून पाहिले जावे का? नाही. आपल्या समर्पणाच्या प्रतिज्ञेचा विचार करता, परिस्थितींमुळे अशक्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक ख्रिश्चनाने यावर गंभीररित्या विचारविनिमय केला पाहिजे.—मार्क १२:३०.
४ तुमचे आरोग्य किंवा शास्त्रवचनीय जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला सध्या पायनियरींग करण्यास जमत नसल्यास, यहोवा ते जाणतो व समजून घेतो याची तुम्हाला खात्री असू शकते. तुमच्या परिस्थिती ज्याला अनुमती देतात त्यातच तो तुम्हाला तुमच्या विश्वासूपणासाठी आशीर्वादित करील. (१ करिंथ. ४:२; २ करिंथ. ८:१२) तथापि, पुन्हा पायनियरींग करणे अनुकूल असल्यास, अध्यक्षीय पर्यवेक्षकांकडे जाऊन अर्जासाठी विनंती का करू नये बरे?
५ तुमचे कुटुंब मदत करू शकते का? तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करावयाच्या होत्या त्यासाठी तुम्ही कदाचित तो पायनियरचा हुद्दा सोडला असेल. तुम्ही पायनियर कार्यात पुन्हा प्रवेश करू शकता यासाठी कुटुंबाचे इतर सदस्य आता मदत देण्याच्या स्थितीत आहेत का? काहींच्या बाबतीत पाहता, जबाबदाऱ्या सांभाळण्यात मिळालेल्या थोड्याफार मदतीमुळे पायनियरींग पुन्हा साध्य केली जाऊ शकते.
६ कुटुंबाच्या इतर सदस्यांनी चांगला सहयोग दिला आणि थोडासा अधिक प्रयत्न केला तर हे शक्य होऊ शकते. आर्थिकरित्या मदत किंवा वाहतुकीचा खर्च तसेच सेवेमध्ये एकत्र काम करण्याचे नियमितपणे ठरवणे या स्वरुपात मदत असू शकते. त्याचप्रमाणे ते साहाय्य करू शकतील असे इतर मार्ग देखील आहेत. परिस्थिती तुम्हाला हा विशेषाधिकार पुन्हा स्वीकारण्यास परवानगी देत नसेल तर, कुटुंबाच्या दुसऱ्या सदस्याला ही मदत दिली जाऊ शकते की जेणेकरून तो तसे करू शकेल.
७ कुटुंब मिळून या बाबीची चर्चा का करू नये? तुम्ही हा एक एकत्रित प्रकल्प केलात तर, शक्यता चांगली असू शकते. या पायनियरच्या हुद्यावर आणखी एक पायनियर जोडल्यास, संपूर्ण कुटुंब त्यात सहभाग घेत असल्याप्रमाणे त्यांना उचितपणे वाटू शकेल. अशा उदारतेच्या आत्म्यामुळे, केवळ क्षेत्रातील राज्य साक्षीतच भर पडणार नाही तर, त्यामुळे कुटुंब देखील आध्यात्मिकरित्या निकट येईल.—लूक ६:३८; फिलि. २:२-४.