आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट
१. ख्रिस्ती सेवेला येशूने महत्त्व कसे दिले?
१ येशूने त्याच्या जीवनात ख्रिस्ती सेवेला खूप महत्त्व दिले. संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालून त्याने शक्य तितक्या लोकांना प्रचार केला. सेवेत अधिक वेळ खर्च करता यावा, सेवेकडे लक्ष देता यावे म्हणून त्याने आपली जीवनशैली साधी ठेवली. (मत्त. ८:२०) आपल्या आजारी नातेवाईकांना किंवा मित्रांना बरे करावे म्हणून लोकांनी येशूला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”—लूक ४:४३.
२. येशूने ख्रिस्ती सेवेला इतके महत्त्व का दिले?
२ पण येशूने ख्रिस्ती सेवेला इतके महत्त्व का दिले? कारण, त्याला यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणाची जास्त चिंता होती. (मत्त. ६:९) त्याचा स्वर्गीय पिता यहोवा याच्यावर त्याचे खूप प्रेम होते व म्हणूनच त्याला त्याची इच्छा पूर्ण करायची होती व त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करायचे होते. (योहा. १४:३१) शिवाय, त्याला लोकांची खरोखर काळजी होती व तो त्यांना मदत करू इच्छित होता.—मत्त. ९:३६, ३७.
३. ख्रिस्ती सेवा करण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित केले आहे हे आपण कसे दाखवून देऊ?
३ येशूच्या पदचिन्हांवर चाला: येशूने सेवेला खूप महत्त्व दिले. पण तसे करणे कधीकधी आपल्याला कठीण वाटू शकेल. कारण, आजच्या धावपळीच्या जगात वेळ काढणे सोपे नाही, शिवाय आपले लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी देखील आहेत. (मत्त. २४:३७-३९; लूक २१:३४) त्यामुळे, श्रेष्ठ अर्थात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे आधी आपण ठरवले पाहिजे, त्या करण्यासाठी एक आराखडा बनवून वेळ ठरवली पाहिजे आणि नियमित रीत्या प्रचार कार्यात भाग घेतला पाहिजे. (फिलिप्पै. १:१०) तसेच, आपण आपली जीवनशैली साधी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जगाचा पुरेपूर उपयोग करण्याचे टाळतो.—१ करिंथ. ७:३१.
४. योग्य गोष्टींना आत्ताच प्राधान्य देणे महत्त्वाचे का आहे?
४ एका सुज्ञ व्यक्तीच्या हातात कमी वेळ असतो तेव्हा ती, अधिक महत्त्वाच्या गोष्टी आधी करते. जसे की, तिला जर कळले की ती राहत असलेल्या भागात विनाशकारी वादळ येणार आहे तर ती आपल्या वेळेचा व शक्तीचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी आणि आपल्या शेजाऱ्यांना वादळाविषयीचा इशारा देण्यासाठी करेल. कमी महत्त्वाच्या गोष्टी नंतरही केल्या जाऊ शकतात. हर्मगिदोनाचे वादळ येण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. (सफ. १:१४-१६; १ करिंथ. ७:२९) स्वतःचा व आपला संदेश ऐकणाऱ्यांचा बचाव करण्याकरता आपण स्वतःकडे आणि मंडळीच्या बाहेर अथवा आत आपल्या शिकवण्याच्या पद्धतीकडे सतत लक्ष दिले पाहिजे. (१ तीम. ४:१६) होय, सेवेला आपण प्राधान्य दिले तरच आपला बचाव होऊ शकतो!