ख्रिस्ती सेवा —आपले प्रमुख कार्य
१ आपल्या सर्वांना नाना प्रकारची कामे करावी लागतात. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशी देव अपेक्षा करतो. (१ तीम. ५:८) परंतु, या कामात आपण इतके व्यस्त होता कामा नये, की सर्वात महत्त्वाचे कार्य अर्थात राज्याचा प्रचार व शिष्य बनवण्याचे कार्य याकडे आपले दुर्लक्ष होईल.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
२ ‘पहिल्याने राज्य कसे मिळवावे’ याबाबतीत येशूने आपल्यासाठी एक कित्ता घालून दिला आहे. (मत्त. ६:३३; १ पेत्र २:२१) त्याच्याजवळ भौतिकरीत्या फार कमी होते तरीसुद्धा, तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यात पूर्णपणे गढून गेला होता. (लूक ४:४३; ९:५८; योहा. ४:३४) मिळेल त्या संधीला साक्ष देण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला. (लूक २३:४३; १ तीम. ६:१३) त्याने आपल्या शिष्यांना कापणीच्या कार्यात त्याच्यासारखीच तीव्र आस्था घेण्यास आर्जवले.—मत्त. ९:३७, ३८.
३ येशूचे आज अनुकरण करणे: ख्रिस्ती सेवेवर केंद्रित असलेली साधी राहणी ठेवून आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. आपल्याजवळ जीवनोपयोगी वस्तू असल्यास, जगातील आणखी गोष्टींच्या मागे न लागण्याविषयी असलेल्या बायबलमधील सल्ल्याचे आपण पालन करू या. (मत्त. ६:१९, २०; १ तीम. ६:८) त्याऐवजी प्रचार कार्यात आपला सहभाग वाढवणे खरोखरच किती उत्तम आहे! आपल्यासमोर कठीण परिस्थिती येते तेव्हा, येशूप्रमाणे आपणही राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराच्या प्रमुख कार्यात व्यस्त होऊ जेणेकरून जीवनाच्या चिंतांचे सावट आपल्या जीवनावर पडणार नाही.—लूक ८:१४; ९:५९-६२.
४ अनेक जबाबदाऱ्या असलेले सुद्धा प्रचार कार्याला प्राधान्य देतात. एका बांधवाचे मोठे कुटुंब आहे, त्यांना जबाबदारीची नोकरी आहे, शिवाय ते मंडळीतही वडील या नात्याने सेवा करतात; ते म्हणतात: “मी क्षेत्र सेवेला माझे जीवनध्येय समजतो.” एक पायनियर भगिनी म्हणते: “पायनियरींग, जगातल्या यशस्वी पेशापेक्षा कैकपटीने मूल्यवान आहे.”
५ आपली परिस्थिती कोणतीही असली तरी, येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करू या. ते कसे? ख्रिस्ती सेवेला आपले प्रमुख कार्य बनवण्याद्वारे.