नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज एप्रिल - जून
हे नियतकालिक येशूबद्दल आदर असणाऱ्यांना द्या. “बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे येशूचा मृत्यू झाला नाही तर त्याने लग्न केले व त्याला मुले झाली असा काही लिखाणे दावा करतात. तुम्ही यांबद्दल ऐकले आहे का? [उत्तरासाठी थांबा.] याबद्दल सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. [योहान १७:३ वाचून दाखवा.] बायबल येशूबद्दल जे सांगते त्यावर आपण विश्वास का ठेवू शकतो त्या कारणांची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.” पृष्ठ २६ वरील लेख दाखवा.