प्रश्न पेटी
▪ मंडळीतील सभांचे वातावरण शिकण्यास पोषक असे बनवण्यासाठी सर्व जण हातभार कसा लावू शकतात? (अनु. ३१:१२)
यहोवा आणि त्याने आयोजित केलेल्या मंडळीच्या सभा यांबद्दल आदर दाखवण्याकरता सर्वांनी लवकर यावे व त्याच्याकडून शिकण्यास तयार असावे, असे आपल्याला उत्तेजन दिले जाते. आपण सभागृहात पुढे बसलो तर मागच्या आसनांवर, लहान मुले असलेले बंधूभगिनी व कधीकधी उशिरा येणारे बसू शकतात. सभा सुरू होण्याआधी आपल्या जवळचे मोबाईल व पेजर आपण सायलेंट मोडवर करू शकतो जेणेकरून सभा चालू असताना इतरांना त्यांचा त्रास होणार नाही. उपस्थित असलेले सर्व जण सभांदरम्यान आदरणीय मनोवृत्ती दाखवतात तेव्हा विकर्षणे कमी व क्षुल्लक असतील.—उप. ५:१; फिलिप्पै. २:४.
नवीन लोक सभांना येण्यास सुरू करतात तेव्हा त्यांना ओळखत असलेले मंडळीतले कोणीतरी त्यांच्याजवळ बसू शकतात. त्यांची लहान मुले असतील तर हे बंधूभगिनी त्यांना शांत बसण्यास शिकवू शकतात. हे नवीन लोक पूर्वी कधी सभांना उपस्थित राहिले नसावेत. त्यांची मुले आवाज करतात तेव्हा थोडा वेळ त्यांना बाहेर घेऊन जाता यावे व सभागृहात बसलेल्यांना त्रास होऊ नये म्हणून ते कदाचित मागेच बसणे पसंत करतील. (नीति. २२:६, १५) लहान मुले असलेल्या कुटुंबांनी सभागृहाच्या वेगळ्या खोलीत बसू नये; नाहीतर मुलांना वाटेल की तेथे ते दंगा-मस्ती करू शकतात. मुले दंगा करतात तेव्हा त्यांना शिस्त लावण्याकरता किंवा त्यांना काय हवे-नको ते पाहण्याकरता पालकांनी त्यांना सभागृहाच्या बाहेर न्यावे आणि मग पुन्हा सभागृहात घेऊन यावे.
उपासना चालणाऱ्या गृहासाठी योग्य असलेले वातावरण टिकवून ठेवण्याची अटेंडेंट खात्री करतील. ते कुटुंबांना मदत करतील व अधूनमधून उशिरा येणाऱ्यांना जागा मिळवून देतील. सर्वांना जागा मिळाली आहे व कसलीही विकर्षणे नाहीत याची अटेंडेंट हुशारीने व सुज्ञपणे खात्री करतील. ते समंजसपणे अनपेक्षित विकर्षणे हाताळतील. एखादे मूल दंगा करून इतरांना त्रास देत असेल तर अटेंडेंट प्रेमळपणे साहाय्य देतील.
उपासनेसाठी एकत्र येत असलेले सर्व जण, यहोवाविषयी आणि शांतीमय व धार्मिक नवीन जग आणण्यासाठी असलेल्या त्याच्या उद्देशांविषयी शिकण्यास मंडळीत पोषक वातावरण बनवायला हातभार लावू शकतात.—इब्री १०:२४, २५.