मुलांना सभांमधून अधिक लाभ मिळविण्यासाठी मदत द्या
१ तुमची मुले सभांना येतात तेव्हा ती खरीच लक्ष देऊन ऐकतात का? सभेत काय शिकायला मिळाले ते ती नंतर तुम्हाला सांगतात का? तुम्ही त्यांना लक्ष देऊन ऐकण्याचे तसेच काळजीपूर्वक परिक्षणाने मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करण्याचे उत्तेजन देता का? मुले पाहू, ऐकू व अनुसरु शकतील अशाप्रकारचे उदाहरण तुम्ही स्वतः सभांमध्ये आपले विवेचन देताना मांडता का? तुमची मुले तुमच्या विश्वासाचे अनुकरण करतात का? मुलांची वाढ यहोवाचे भक्तीमान सेवक या नात्याने व्हावयाची आहे तर वरील सर्व प्रश्नांना सरळ स्वरुपाची उत्तरे मिळणे महत्त्वाचे आहे.
सभांच्या उपस्थितीचे महत्त्व त्यांजमध्ये बिंबवा
२ मुलाला सार्वकालिक जीवन मिळवावयाचे आहे तर त्याने पवित्र शास्त्रातील शिक्षण घेतलेच पाहिजे. (याहेन १७:३) मुलाला आध्यात्मिक गोष्टींची रसिकता शिकून घेण्यासाठी सभांना उपस्थित राहिले पाहिजे. कधी कधी पालकांना वाटते की, मुले सभेत गडबड करतील म्हणून ते त्यांना सभांना घेऊन येत नाही. काहीजण मुलांना घरी गृहपाठ करण्यासाठी ठेवून सभांना येतात. पण सूज्ञ पालक आपल्या मुलांना आपल्यासोबत सभांना घेऊन येतात.—अनु. ३१:१२.
३ राज्य सभागृहात ऐकण्यासाठी गेले पाहिजे ही गोष्ट मुलाने बालवयातच शिकून घेण्यास हवी. पण सभेतच मुलाला काही गोष्टी करण्यासाठी दिल्या, त्याला खेळणी किंवा खाऊ दिला; तसेच त्याला आपल्या जागेवर बसून खेळू दिले तर मग त्याला शिकून घेण्याची तसेच आपण राज्यसभागृहातील सभांना का येतो याविषयीची रसिकता वाटेल का? हे खरे की काही मुले इतरांपेक्षा अधिक लक्ष देऊन ऐकतात. पण मूल जेव्हा दंगा करू लागते तेव्हा सूज्ञ पालक त्याला वेळीच शिक्षा करून त्याला श्रवण करण्याची प्रेमळ मदत देतील. हे ते, मुलाला काही खाऊ वा खेळणी देण्याद्वारे नव्हे तर, देवाच्या वचनातील सूचनांचा अवलंब करण्याद्वारे करतील.—नीती. १३:२४; इफिस. ६:४.
पालक या नात्याचे तुमचे उदाहरण
४ जानेवारी १५, १९८२ च्या द वॉचटावरने १७ व्या पृष्ठावर असे प्रश्न विचारलेः “तुम्ही पवित्र शास्त्राच्या सभा अगदी गंभीरपणे घेत आहात हे तुमच्या मुलांना माहीत आहे का? त्यांना हे दिसते का की, तुम्हाला या सभा महत्त्वाच्या वाटतात ते केवळ उपस्थित राहण्यापुरतेच नसून जेव्हा विचारणा होते तेव्हा त्यात उत्तर देऊन सहभागी होणे हे त्यात समाविष्ट आहे?” मुलांना हे दिसते की, तुम्हीच स्वतः सभेत इतरांसोबत नको त्या गप्पा मारीत आहात किंवा तुम्ही वा इतर कोणी त्यांच्याशी खेळत बसले तर त्यांना काय वाटू लागेल? सभेच्या वेळेविषयी त्यांच्याठायी कोणता दृष्टीकोण जडेल? मुले उत्तम अनुकरण करीत असतात त्यामुळे तुमचे उदाहरण त्यांच्यावर जबर प्रभाव पाडील.
५ काही पालकांना असे आढळले की, आपल्या अगदी लहान मुलांना देखील सभेत वापरले जाणारे साहित्य देणे बरे ठरते. कदाचित आपल्या कौटुंबिक अभ्यासात ते मुलांना उत्तरे तयार करण्याची मदत देतात. तसेच सभेत जे मुद्दे हाताळण्यात आले त्याची उजळणी करून आणि मुलांना काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे देऊन ते त्यांना मदत करू शकतात. मुलांनी सभेत घेतलेल्या सहभागाविषयी त्यांना शाबासकी देण्याबद्दल पालकांनी दक्ष असले पाहिजे.
६ असे शिक्षण देऊ करण्यात पालकांनी मोठे श्रम घेतले पाहिजे हे खरे आहे. तथापि, सर्व काही देवाच्या मार्गदर्शनानुरुप केल्यास त्याचे चांगले परिणाम उद्भवतील. शास्त्रवचन म्हणते त्याप्रमाणेः “जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो; त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.”—नीती. २०:७.