वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. ६
  • आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२०१०
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या
    आमची राज्य सेवा—२०१४
  • येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • अनौपचारिक साक्ष देऊन यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. ६

आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत

१. येशूने विहिरीजवळ एका स्त्रीला जी साक्ष दिली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१ अनेक तास पायी प्रवास करून येशू थकला होता व त्याला तहान लागली होती. त्याचे शिष्य जेवण विकत घेण्यासाठी गेले तेव्हा तो शोमरोन शहराच्या बाहेर एका विहिरीजवळ विश्रांती घेण्यासाठी बसला. येशू शोमरोनात प्रचार करायला आला नव्हता. तो गालीलात जाऊन आपले प्रचार कार्य चालू ठेवणार होता. शोमरोन शहरातून तो गालीलला चालला होता. तेथे पाणी भरायला आलेल्या एका स्त्रीला त्याने साक्ष देण्याची संधी सोडली नाही. (योहा. ४:५-१४) का? कारण तो सर्व वेळी यहोवाचा “विश्‍वसनीय व खरा साक्षी” होता. (प्रकटी. ३:१४) आपण सर्व वेळी यहोवाचे साक्षीदार असल्याचे शाबीत करून येशूचे अनुकरण करू शकतो.—१ पेत्र २:२१.

२. अनौपचारिक साक्ष देण्यासाठी आपण कशी तयारी करू शकतो?

२ तयार असा: आपल्यासोबत साहित्य ठेवल्याने आपण अनौपचारीक साक्ष देण्यास तयार असतो. अनेक प्रचारक स्वतःसोबत पत्रिका, नियतकालिकाचे अंक ठेवतात. दुकानात, पेट्रोल पंपावर काम करणारे, व दिवसभरात त्यांच्या संपर्कात येणाऱ्‍या प्रत्येकाला ते हे साहित्य देतात. (उप. ११:६) पण आपल्या क्षेत्रातील लोक अतिसंवेदनशील असतील तर आपण खरोखर आस्था असणाऱ्‍या लोकांनाच प्रकाशने देण्याची खबरदारी बाळगू.

३. आपण संभाषण कसे सुरू करू शकतो?

३ संभाषण सुरू करणे: अनौपचारीक साक्ष देताना आपण सुरूवातीलाच बायबलचा एखादा विषय घेऊन त्यावर बोलायची गरज नाही. येशूने विहिरीजवळ त्या स्त्रीला साक्ष दिली तेव्हा मी मशीहा आहे, असे बोलून संभाषणाची सुरूवात केली नाही. तर त्याने तिला फक्‍त प्यायला पाणी मागितले व त्यामुळे तिची उत्सुकता वाढली. (योहा. ४:७-९) एका बहिणीला अशाच प्रकारे संभाषण सुरू करणे शक्य झाले. सण कसा झाला असे लोक तिला विचारतात तेव्हा “मी एक यहोवाची साक्षादार असल्यामुळे तो सण पाळला नाही” असे उत्तर देण्याऐवजी “मी स्वतःच तो सण पाळायचा नाही असे ठरवले आहे” असे उत्तर ती देते. यामुळे प्रश्‍न विचारणारे त्याचे कारण विचारतात व तिला साक्ष देण्याची संधी मिळते.

४. मत्तय २८:१८-२० हे वचन तुम्हाला का प्रेरणादायक वाटते?

४ येशूने जरी पृथ्वीवरील त्याचे आवेशी सेवा कार्य संपवले असले तरी आज चालू असणाऱ्‍या आवेशी कार्यात त्याला खूप आस्था आहे. (मत्त. २८:१८-२०) त्यामुळे आपल्यासाठी आदर्श असणाऱ्‍या येशूप्रमाणेच आपणही आपल्या विश्‍वासाची जाहीर घोषणा करण्यासाठी नेहमी तयार असतो.—इब्री १०:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा